Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Swargate Case: “दोषी अधिकाऱ्यांची त्याच ठिकाणी नियुक्ती…”; स्वारगेट प्रकरणात सरनाईकांना वरिष्ठांना फटकारले

Pune News: मंत्री प्रताप सरनाईक यांनी लोणावळा, शिवाजीनगर व स्वारगेट बसस्थानकांची पाहणी केली. प्रवासी प्रतीक्षालय, स्वच्छतागृह, चालक-वाहक विश्रांतीगृह आदी सुविधा तपासल्या.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 16, 2025 | 09:49 PM
Swargate Case: "दोषी अधिकाऱ्यांची त्याच ठिकाणी नियुक्ती..."; स्वारगेट प्रकरणात सरनाईकांना वरिष्ठांना फटकारले

Swargate Case: "दोषी अधिकाऱ्यांची त्याच ठिकाणी नियुक्ती..."; स्वारगेट प्रकरणात सरनाईकांना वरिष्ठांना फटकारले

Follow Us
Close
Follow Us:

प्रताप सरनाईक यांनी दिली स्वारगेट स्थानकाला भेट
स्वारगेट बलात्कार प्रकरणात सरनाईक यांनी व्यक्त केली नाराजी
सरनाईक यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना फटकारले

पुणे:  स्वारगेट बलात्कार प्रकरणात दोषी आढलेल्या अधिकाऱ्यांच्या निलंबनानंतरही त्यांची पुन्हा स्वारगेट आगारात नेमणूक झाल्याचे उघड झाल्यावर राज्याचे परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. “आम्ही विधानसभेत उत्तर देतो, कारवाईनंतर सुधारणा होईल अशी अपेक्षा असते. मग दोषी आढलेल्या अधिकाऱ्यांची पुन्हा त्या ठिकाणी नेमणूक कशी होते,” असा सवाल करत सरनाईक यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना फटकारले.

अशा गंभीर चुका करणाऱ्यांवर कोणतीही गय केली जाणार नसल्याचे स्पष्ट करत त्यांनी संबंधितांवर तात्काळ कारवाईचे आदेश दिले.पुणे दौऱ्यावर असताना सरनाईक यांनी लोणावळा, शिवाजीनगर व स्वारगेट बसस्थानकांची पाहणी केली. प्रवासी प्रतीक्षालय, स्वच्छतागृह, चालक-वाहक विश्रांतीगृह आदी सुविधा तपासल्या. प्रवासी व कर्मचाऱ्यांच्या तक्रारी ऐकून संबंधित अधिकाऱ्यांना योग्य ते निर्देश दिले.

मंत्री सरनाईक म्हणाले की फेब्रुवारी २०२५ मध्ये स्वारगेट बसस्थानकावर घडलेल्या दुर्दैवी घटनेनंतर सर्व राज्य हादरुन गेले होते. अशावेळी एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली. स्वारगेट बसस्थानकावरील वरिष्ठ आगार व्यवस्थापक,कनिष्ठ आगार व्यवस्थापक व दोन सहायक वाहतूक अधीक्षकांना निलंबित करण्यात आले आणि त्यांची विभागीय चौकशी लावण्यात आली. याबाबतचे निवेदन विधानभवनात मी स्वतः केले. त्यानंतर निलंबित अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी करून ते दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करणे अपेक्षित होते.

🗓 १५ सप्टेंबर २०२५ | 📍पुणे पुणे दौऱ्यादरम्यान स्वारगेट बसस्थानकाला भेट दिली व तेथील व्यवस्थेचा आढावा घेतला.
फेब्रुवारी – २०२५ मध्ये स्वारगेट बसस्थानकावर घडलेल्या दुर्दैवी घटनेनंतर सर्व राज्य हादरुन गेले होते. अशावेळी एस टी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली.… pic.twitter.com/MIvQpWlDK4
— Pratap Baburao Sarnaik (@PratapSarnaik) September 15, 2025

तत्पूर्वी  खात्यांतर्गत विभागीय  चौकशी नि; पक्षपाती होण्यासाठी त्यांची बदली अन्यत्र करणे गरजेचे होते. असे असताना प्रादेशिक व्यवस्थापक यांनी त्यांच्या बदल्या अन्यत्र न करता तेथेच त्यांची नियुक्ती केली. हे नियमाला धरून नाही. त्यामुळे दोषींना आपण पाठीशी घालतोय, असा संदेश समाजात गेला.या पार्श्वभूमीवर संबंधित प्रादेशिक व्यवस्थापकांना कारणे दाखवा नोटीस देण्यात येणार असून निलंबनानंतर स्वारगेट बसस्थानकावर नियुक्ती केलेल्या अधिकारी व पर्यवेक्षकांची तातडीने बदली करण्यात येत असल्याचेही सरनाईक यांनी जाहीर केले.

Web Title: Transport minister pratap sirnaik visit swargate bus stand pune news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 16, 2025 | 09:49 PM

Topics:  

  • pratap sarnaik
  • pune news
  • Swargate Case

संबंधित बातम्या

नीट पेपरफुटी प्रकरणी मॉडर्न महाविद्यालयाची मोठी कारवाई; मनीषा मांढरेचं अखेर निलंबन
1

नीट पेपरफुटी प्रकरणी मॉडर्न महाविद्यालयाची मोठी कारवाई; मनीषा मांढरेचं अखेर निलंबन

Pune : पुण्यात संग्रहालयांविषयी वाढतेय जागरूकता; वारसा जपण्याकडे नव्या पिढीचा कल
2

Pune : पुण्यात संग्रहालयांविषयी वाढतेय जागरूकता; वारसा जपण्याकडे नव्या पिढीचा कल

ST Bus Fare Hike : एसटी बसचा प्रवास महागणार की नाही? परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्टच सांगितलं…
3

ST Bus Fare Hike : एसटी बसचा प्रवास महागणार की नाही? परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्टच सांगितलं…

Maharashtra Govt Scheme : पुरस्कार विजेत्यांसाठी एसटी प्रवास पूर्ण मोफत; पुणे विभागातून २०१ जणांनी घेतला लाभ
4

Maharashtra Govt Scheme : पुरस्कार विजेत्यांसाठी एसटी प्रवास पूर्ण मोफत; पुणे विभागातून २०१ जणांनी घेतला लाभ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.