Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 1 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tukaram Mundhe यांच्या विभागाचा कारवाईचा बडगा; १२ हजार २७८ लिटर दूध नष्ट, अन्न परवाने निलंबित

पुण्यातील ताथवडे येथील 'गुड फूड रोल हाऊस तंदुरी हाऊस' या आस्थापनात गंभीर त्रुटी आढळून आल्याने त्याचाही अन्न परवाना तात्काळ निलंबित करण्यात आला.

  • By तेजस भागवत
Updated On: Jul 01, 2026 | 02:35 AM
Tukaram Mundhe यांच्या विभागाचा कारवाईचा बडगा; १२ हजार २७८ लिटर दूध नष्ट, अन्न परवाने निलंबित
Follow Us
Follow Us:
  • पुणे विभागात अन्न व औषध प्रशासनाची धडक मोहीम
  • १३.७१ लाखांचा मुद्देमाल जप्त
  • अनेक आस्थापनांचे अन्न परवानेही निलंबित
पुणे: ‘सेफ फूड, सेफ ड्रग, सेफ महाराष्ट्र’ मोहिमेअंतर्गत अन्न व औषध प्रशासनाने पुणे विभागात राबविलेल्या विशेष तपासणी मोहिमेत अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या (FDA) दूध व दुग्धजन्य पदार्थ उद्योगांसह हॉटेल आस्थापनांवर कारवाई करत सुमारे १३.७१ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करून नष्ट केला. या कारवाईदरम्यान अनेक आस्थापनांचे अन्न परवानेही निलंबित करण्यात आले.

२५ ते २७ जूनदरम्यान पुणे आणि सोलापूर जिल्ह्यात ही मोहीम राबविण्यात आली. शिरूर तालुक्यातील गगनगिरी मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्स येथे भेसळीचा संशय आल्याने १२ हजार २७८ लिटर दूध नष्ट करण्यात आले, तसेच संबंधित आस्थापनाचा अन्न परवाना निलंबित करण्यात आला.

आंबेगाव तालुक्यातील उमिया मिल्क प्रॉडक्ट्स येथे अस्वच्छ वातावरणात उत्पादन सुरू असल्याचे आढळून आल्याने १ हजार १५५ किलो एडिबल केसिनेट आणि कोयागुलम जप्त करण्यात आले. या आस्थापनाचाही अन्न परवाना निलंबित करण्यात आला.सोलापूर जिल्ह्यातील रामदेव डेरीमध्ये विनापरवाना आणि अस्वच्छ ठिकाणी मिठाईचे उत्पादन सुरू असल्याचे निदर्शनास आल्यानंतर १ हजार ८०७ किलो मिठाईचा साठा जप्त करून नष्ट करण्यात आला. माळशिरस तालुक्यातील शेतकरी राजा दूध संकलन केंद्रातील ८० लिटर दूधही निकृष्ट आढळल्याने नष्ट करण्यात आले आणि संबंधित परवाना निलंबित करण्यात आला.

Mumbai News: कपातील चहाचा रंग कृत्रिम! एफडीएच्या कारवाईत ९०० किलो चहा, १७ किलो रंग जप्त; गुन्हा दाखल

पुण्यातील ताथवडे येथील ‘गुड फूड रोल हाऊस तंदुरी हाऊस’ या आस्थापनात गंभीर त्रुटी आढळून आल्याने त्याचाही अन्न परवाना तात्काळ निलंबित करण्यात आला. अन्न व औषध प्रशासनाने अन्न व्यवसायिकांनी अन्न सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले आहे. तसेच ग्राहकांनी दूध व दुग्धजन्य पदार्थ खरेदी करताना उत्पादनावरील लेबल, उत्पादन दिनांक, वापरण्याची अंतिम तारीख आणि एफएसएसएआय (FSSAI) परवाना क्रमांक तपासूनच खरेदी करावी, असेही प्रशासनाने म्हटले आहे.

फडीएच्या कारवाईत ९०० किलो चहा

सकाळच्या चहाच्या कपातून ताजेपणा नव्हे तर रासायनिक भेसळ पोटात जात असल्याचे धक्कादायक वास्तव अंधेरीत उघड झाले आहे. चहा अधिक आकर्षक दिसावा यासाठी त्यात रंग मिसळून विक्रीसाठी तयार केला जात असल्याचा प्रकार अन्न व औषध प्रशासनाच्या धाडीत समोर आला. या कारवाईत ९०० किलो चहा पावडर आणि १७ किलो संशयित रंगासह तब्बल २.१८ लाख रुपयांचा साठा जप्त करण्यात आला आहे

Web Title: Tukaram mundhe fda take action against dairy products pune and solapur

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 01, 2026 | 02:35 AM

Topics:  

  • FDA
  • pune news
  • Tukaram Mundhe

संबंधित बातम्या

प्रभाग 25 मधील स्वच्छता अन् सफाईची कामे तातडीने पूर्ण करा; राघवेंद्र बाप्पु मानकर यांच्या प्रशासनाला सूचना
1

प्रभाग 25 मधील स्वच्छता अन् सफाईची कामे तातडीने पूर्ण करा; राघवेंद्र बाप्पु मानकर यांच्या प्रशासनाला सूचना

पुण्यातील वाकड चौकातून आता रस्ता ओलांडता येणार; मेट्रो 60 मीटरचा पादचारी पूल बांधणार
2

पुण्यातील वाकड चौकातून आता रस्ता ओलांडता येणार; मेट्रो 60 मीटरचा पादचारी पूल बांधणार

आईच्या मृत्यूच्या धक्क्याने तरुणाने उचलल टोकाच पाऊल; गळफास घेऊन संपवलं जीवन
3

आईच्या मृत्यूच्या धक्क्याने तरुणाने उचलल टोकाच पाऊल; गळफास घेऊन संपवलं जीवन

पुणे जिल्ह्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स एफडीएच्या रडारवर; ‘या’ तारखेपासून धडक तपासणी मोहीम
4

पुणे जिल्ह्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स एफडीएच्या रडारवर; ‘या’ तारखेपासून धडक तपासणी मोहीम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.