Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुणेकरांसाठी खुशखबर! आता मेट्रोची तिकिटे मिळणार ‘या’ App वर; रांगेत उभा राहण्याची कटकट मिटली

‘उबर’ने पुण्यात आपल्या अ‍ॅपवर मेट्रो तिकिटाची सेवा सुरू केली आहे. त्यामुळे तिकिटाच्या रांगेत उभे राहण्याची किंवा कोणतेही वेगळे अ‍ॅप वापरण्याची गरज राहणार नाही.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: May 23, 2026 | 05:58 PM
पुणेकरांसाठी खुशखबर! आता मेट्रोची तिकिटे मिळणार 'या' App वर; रांगेत उभा राहण्याची कटकट मिटली

पुणेकरांसाठी खुशखबर! आता मेट्रोची तिकिटे मिळणार 'या' App वर; रांगेत उभा राहण्याची कटकट मिटली

Follow Us
Close
Follow Us:

पुणे : ‘उबर’ने पुण्यात आपल्या अ‍ॅपवर मेट्रो तिकिटाची सेवा सुरू केली आहे. ‘उबर’तर्फे आज ही घोषणा करण्यात आली. ‘ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स’च्या (ओएनडीसी) माध्यमातून उपलब्ध करण्यात आलेल्या या सुविधेमुळे पुणेकरांचा दैनंदिन प्रवास अधिक सोपा आणि सुलभ होणार आहे. आजपासून प्रवाशांना ‘उबर’च्या अ‍ॅपमधून मेट्रो प्रवासाचे नियोजन करता येणार असून, क्यूआर-आधारित तिकीट थेट खरेदी करता येणार आहे. त्यामुळे तिकिटाच्या रांगेत उभे राहण्याची किंवा कोणतेही वेगळे अ‍ॅप वापरण्याची गरज राहणार नाही.

 

दिल्ली, मुंबई, बंगळुरू आणि चेन्नई यांच्यानंतर उबरने मेट्रो तिकीट सेवा सुरू केलेले पुणे हे भारतातील पाचवे शहर ठरले आहे. पुणे शहरात प्रवासाच्या अधिक वेगवान, स्मार्ट आणि एकात्मिक पर्यायांची मागणी वाढत असताना ही सेवा सुरू करण्यात आली आहे. उबरच्या अ‍ॅपवरून मेट्रोचे तिकीट बुक करणाऱ्या प्रवाशांना मर्यादित कालावधीसाठी तिकिटावर ५० टक्के सूट मिळणार असून, कमाल १० रुपयांपर्यंत सवलत दिली जाणार आहे.

‘उबर’चे मुख्य कार्यकारी अधिकारी दारा खोस्रोशाही यांनी नुकत्याच झालेल्या आपल्या भारत दौऱ्यात सांगितले की, देशभरात उबर अ‍ॅपच्या माध्यमातून आतापर्यंत १ कोटींहून अधिक मेट्रो प्रवास बुक करण्यात आले आहेत. यामुळे सार्वजनिक वाहतुकीच्या एकात्मिक सेवांची वाढती लोकप्रियता दिसून येते. ‘ओएनडीसी’च्या नेटवर्कवर आधारित या सुविधा सार्वजनिक वाहतूक आणि लास्ट-माइल प्रवास सेवा एकत्र आणण्याच्या ‘उबर’च्या प्रयत्नांचा भाग आहेत. पुण्यातील प्रवाशांना आता उबर अ‍ॅपवरून ‘यूपीआय’च्या माध्यमातून थेट मेट्रो तिकीट बुक करता येणार आहे. तसेच पुढील प्रवासासाठी ‘उबर ऑटो’, ‘बाईक’, ‘गो’ अशा प्रवासाच्या इतर पर्यायांचाही वापर करता येणार आहे.

‘उबर’च्या भारतातील व दक्षिण आशियातील स्ट्रॅटेजिक इनिशिएटिव्ह्ज विभागाच्या प्रमुख नेहा कपूर म्हणाल्या, “उबरवर मेट्रो तिकीट सेवा उपलब्ध झाल्याने सार्वजनिक वाहतूक आणि लास्ट-माइल मोबिलिटी या गोष्टी एका प्लॅटफॉर्मवर आणल्या गेल्या आहेत. त्यातून पुणेकरांचा दैनंदिन प्रवास अधिक सोपा होणार आहे. ही सेवा सुरू झालेले पुणे हे पाचवे शहर ठरले आहे. अधिकाधिक प्रवाशांना अखंड आणि सुलभ प्रवासाचा अनुभव देताना आम्हाला आनंद होत आहे. देशभरात उबरच्या माध्यमातून आतापर्यंत १ कोटींहून अधिक वेळा मेट्रो प्रवासाची तिकिटे बुक करण्यात आली आहेत. शहरांमध्ये अधिक वेगवान आणि कनेक्टेड अशा प्रवासाच्या पर्यायांची मागणी सातत्याने वाढताना दिसत आहे. ‘डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर’ व्यवस्थेमुळे शहरातील वाहतुकीचा अनुभव मोठ्या प्रमाणावर कसा बदलत आहे, याचे हे प्रभावी उदाहरण आहे.”

‘महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन’चे व्यवस्थापकीय संचालक श्रवण हर्डीकर (आयएएस) म्हणाले, “उबरसोबतची ही तिकीट सुविधा प्रवाशांच्या सोयीची असून सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढवण्यास तिने मदत होईल. ‘उबर’च्या अ‍ॅपवर थेट मेट्रोचे तिकीट सुविधा उपलब्ध झाल्यामुळे पुण्यातील प्रवाशांसाठी प्रवासाचे नियोजन अधिक सोपे आणि सुलभ होणार आहे.”

‘ओएनडीसी’चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विभोर जैन म्हणाले, “एका वर्षापेक्षा कमी कालावधीत ‘उबर’ने पुणे मेट्रो तिकीट सेवा सुरू केलेले हे पाचवे शहर ठरले आहे. यामुळे ‘ओएनडीसी’चे खुले नेटवर्क सार्वजनिक वाहतूक सेवांचा विस्तार किती वेगाने घडवून आणू शकते, हे स्पष्ट होते. पुणे मेट्रोच्या प्रवाशांना आता उबर अ‍ॅपवरील क्यूआर कोड स्कॅन करून तिकीट बुक करता येईल. अतिरिक्त प्रक्रिया टाळून त्यांना अधिक सुलभ असा अनुभव मिळणार आहे. पुणे मेट्रोला ‘राष्ट्रीय डिजिटल ट्रान्झिट नेटवर्क’शी जोडल्यामुळे प्रवास अधिक अखंड होणार असून, प्रवासी संख्या वाढवणे आणि संचालनाचा खर्च कमी करणे यालाही मदत होईल. सुलभ आणि शाश्वत सार्वजनिक वाहतूक अधिक व्यापक करण्याच्या आमच्या सामायिक उद्दिष्टाच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल आहे.”

हे सुद्धा वाचा : कट्टर राजकीय वैर विसरून ‘चाय पे चर्चा’; इंदापुरात राजू शेट्टी-सदाभाऊ खोत पुन्हा एकत्र

उबर अ‍ॅपवरून पुणे मेट्रो तिकीट कसे बुक कराल?

  • उबर अ‍ॅप उघडा
  • होम स्क्रीनवरील ‘मेट्रो’ पर्याय निवडा
  • प्रवास सुरु करण्याचे आणि गंतव्याचे स्थानक निवडा
  • ‘यूपीआय’च्या माध्यमातून क्यूआर तिकीट खरेदी करा
  • क्यूआर स्कॅन करून सहजपणे प्रवास करा
भारतभरातील आणखी काही शहरांमध्ये मेट्रो तिकीट सेवा सुरू करण्याच्या शक्यता ‘उबर’कडून तपासल्या जात आहेत.

Web Title: Uber has launched metro ticketing service on its app in pune

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 23, 2026 | 05:57 PM

Topics:  

  • metro news
  • Pune Metro
  • uber

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.