Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 20 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बाणेरमधील दोन मेट्रो स्थानके डिसेंबरमध्ये प्रवाशांच्या सेवेत? सीएमआरएसच्या सुरक्षा तपासणीनंतरच अंतिम मुहूर्त

'पुणेरी मेट्रो'च्या (माण-हिंजवडी ते शिवाजीनगर) प्रवाशांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. या मार्गावरील बाणेर गाव (पीएमआर-१५) आणि बाणेर-पाषाण लिंक रोड (पीएमआर-१६) ही दोन स्थानके येत्या डिसेंबर महिन्यात प्रवाशांसाठी खुली होण्याची दाट शक्यता आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Nov 20, 2026 | 06:58 PM
बाणेरमधील दोन मेट्रो स्थानके डिसेंबरमध्ये प्रवाशांच्या सेवेत? सीएमआरएसच्या सुरक्षा तपासणीनंतरच अंतिम मुहूर्त

बाणेरमधील दोन मेट्रो स्थानके डिसेंबरमध्ये प्रवाशांच्या सेवेत? सीएमआरएसच्या सुरक्षा तपासणीनंतरच अंतिम मुहूर्त

Follow Us
Follow Us:
  • बाणेरमधील दोन मेट्रो स्थानके डिसेंबरमध्ये सुरू होण्याची शक्यता
  • सीएमआरएसच्या सुरक्षा तपासणीनंतर अंतिम निर्णय
  • जानेवारी २०२७ पर्यंत संपूर्ण मार्ग सुरू करण्याचे उद्दिष्ट
पिंपरी : हिंजवडी आयटी हब आणि शिवाजीनगरला जोडणाऱ्या महत्त्वाकांक्षी ‘पुणेरी मेट्रो’च्या (माण-हिंजवडी ते शिवाजीनगर) प्रवाशांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. या मार्गावरील बाणेर गाव (पीएमआर-१५) आणि बाणेर-पाषाण लिंक रोड (पीएमआर-१६) ही दोन स्थानके येत्या डिसेंबर महिन्यात प्रवाशांसाठी खुली होण्याची दाट शक्यता आहे. मात्र, ही स्थानके सुरू होणे हे मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांच्या (सीएमआरएस) तपासणीवर आणि त्यानंतरच्या तांत्रिक पूर्ततेवर अवलंबून असणार आहे.

 

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातील (पीएमआरडीए) वरिष्ठ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोन्ही स्थानकांचे बांधकाम पूर्ण झाले असून सध्या सीएमआरएस तपासणीपूर्वीचे अंतर्गत मूल्यमापन सुरू आहे.

सुरक्षा तपासणीनंतरच हिरवा कंदील

सीएमआरएसचे पथक याच आठवड्यात या मार्गाची पाहणी करणार आहे. मात्र, पाहणी झाल्यानंतर लगेचच सेवा सुरू होणार नाही. तपासणीदरम्यान पथकाने काही त्रुटी नोंदवल्यास त्या दूर करण्यासाठी संबंधित सवलतकारांना (कन्सेशनर) आणखी १० ते १२ दिवसांचा कालावधी लागू शकतो. प्रवासी वाहतुकीसाठी आवश्यक असलेले सुरक्षा प्रमाणपत्र मिळाल्यानंतरच प्रवाशांना या स्थानकांवरून प्रवास करता येईल.

जानेवारी २०२७ पर्यंत संपूर्ण मार्ग कार्यान्वित होणार

सध्या या २३.३ किलोमीटरच्या मार्गिकेवरील १७ स्थानके कार्यरत आहेत. बाणेरमधील ही दोन स्थानके सुरू झाल्यास कार्यरत स्थानकांची संख्या १९ वर पोहोचेल. या मार्गावरील उर्वरित चार स्थानके (पीएमआर-१३, पीएमआर-१४, पीएमआर-२० आणि पीएमआर-२२) टप्प्याटप्प्याने जानेवारी २०२७ पर्यंत सुरू करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. ही सर्व २३ स्थानके सुरू झाल्यानंतरच प्रवाशांना पूर्ण क्षमतेने या मार्गाचा लाभ घेता येईल.

स्थानकांजवळच्या ‘पार्किंग’ समस्येवर प्रशासनाचे लक्ष

मेट्रोचे टप्पे सुरू झाल्यानंतर प्रवाशांची संख्या वाढली असून, त्यासोबतच स्थानकांजवळ वाहनतळांची (पार्किंग) मागणीही मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. सध्या वाहनतळांची पुरेशी सोय नसल्याने प्रवासी रस्त्याच्या कडेला किंवा उन्नत मेट्रो मार्गाखालीच वाहने उभी करत आहेत, ज्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडत आहे.

जागेची मागणी: पीएमआरडीएने माण-सिव्हिल कोर्ट या मार्गासह मेट्रो मार्गिकांलगत आठ ठिकाणी वाहनतळांसाठी जागा मागितली आहे. यातील बहुतांश जागा बाणेर आणि बालेवाडी परिसरातील आहेत.

महापालिकेचा प्रतिसाद : पुणे महानगरपालिकेने (पीएमसी) या जागांबाबतच्या अटी-शर्ती आणि जमिनींच्या मोबदल्याचे पर्याय पीएमआरडीएकडे सादर केले असून, त्यावर पुढील कार्यवाही सुरू आहे.

सद्यस्थिती : मेट्रो स्थानकांजवळ वाहनतळांसाठी एकूण २० जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. त्यापैकी पाच ठिकाणी वाहनतळे बांधून पूर्ण झाली असून उर्वरित जागांची प्रक्रिया सुरू आहे. खासगी जमीनमालकांशीही यासंदर्भात चर्चा सुरू असली, तरी महापालिका आणि सरकारी जागांना प्राधान्य दिले जाणार आहे.

हे सुद्धा वाचा : पिंपरी-चिंचवड महापालिकेतील स्वीकृत नगरसेवकांची नावे जाहीर; तब्बल नऊ महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर घोषणा

पुणेरी मेट्रो आणि पार्किंग आकडेवारी

एकूण मार्ग : २३.३ कि.मी. (एकूण २३ स्थानके)
सध्या कार्यरत स्थानके : १७
डिसेंबरमध्ये अपेक्षित स्थानके : २ (बाणेर गाव आणि बाणेर-पाषाण लिंक रोड)
उर्वरित ४ स्थानकांचे उद्दिष्ट : जानेवारी २०२७
महापालिकेची आरक्षित पार्किंग भूखंड स्थिती : एकूण १३७ पैकी केवळ ३१ विकसित (१०६ अद्याप कागदावरच)

💡

Frequently Asked Questions

  • Que: बाणेर परिसरातील कोणती मेट्रो स्थानके डिसेंबरमध्ये सुरू होण्याची शक्यता आहे?

    Ans: बाणेर गाव (पीएमआर-१५) आणि बाणेर-पाषाण लिंक रोड (पीएमआर-१६) ही दोन स्थानके डिसेंबरमध्ये सुरू होण्याची शक्यता आहे.

  • Que: ही दोन्ही स्थानके सुरू करण्यासाठी कोणती प्रक्रिया बाकी आहे?

    Ans: सीएमआरएसकडून सुरक्षा तपासणी होणार आहे. तपासणीत त्रुटी आढळल्यास त्या दूर केल्यानंतर आवश्यक सुरक्षा प्रमाणपत्र मिळाल्यावरच प्रवासी सेवा सुरू होईल.

  • Que: पुणेरी मेट्रोचा संपूर्ण मार्ग कधीपर्यंत सुरू करण्याचे उद्दिष्ट आहे?

    Ans: २३.३ किलोमीटरच्या मार्गावरील उर्वरित चार स्थानके टप्प्याटप्प्याने सुरू करून जानेवारी २०२७ पर्यंत संपूर्ण मार्ग कार्यान्वित करण्याचे उद्दिष्ट आहे.

Web Title: Two metro stations in baner are likely to become operational in december nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 20, 2026 | 06:58 PM

Topics:  

  • maharashtra
  • Pune Metro
  • pune news

संबंधित बातम्या

FICCI Executive Committee: राष्ट्रीय उद्योग क्षेत्रात महाराष्ट्राचा ठसा; रवींद्र माणगावे यांची FICCI कार्यकारी समितीवर निवड
1

FICCI Executive Committee: राष्ट्रीय उद्योग क्षेत्रात महाराष्ट्राचा ठसा; रवींद्र माणगावे यांची FICCI कार्यकारी समितीवर निवड

Football: फुटबॉल मैदानावर सडनडेथचा थरार! स्निग्मय पुणे एफसीचा ९-८ ने रोमांचक विजय
2

Football: फुटबॉल मैदानावर सडनडेथचा थरार! स्निग्मय पुणे एफसीचा ९-८ ने रोमांचक विजय

Pune News: पुण्यातील स्टार्टअप  ‘क्वप्रयोग’ने अवघ्या सात महिन्यांत विकसित केले स्वदेशी अणुघड्याळ
3

Pune News: पुण्यातील स्टार्टअप  ‘क्वप्रयोग’ने अवघ्या सात महिन्यांत विकसित केले स्वदेशी अणुघड्याळ

Karjat Municipal Council: कर्जत नगरपालिकेच्या घनकचरा प्रकल्पाचा बोजवारा! प्रकल्प बंद पडल्याने परिसरात दुर्गंधी
4

Karjat Municipal Council: कर्जत नगरपालिकेच्या घनकचरा प्रकल्पाचा बोजवारा! प्रकल्प बंद पडल्याने परिसरात दुर्गंधी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.