Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sunil Shelke: “…ही लोकांच्या जिवाशी थट्टा”; रस्त्यांच्या दुरावस्थेवर आमदार शेळके आक्रमक; केली ‘ही’ मोठी मागणी

निविदा प्रक्रियेचा कालावधी लक्षात घेता, नागरिकांचे जीव धोक्यात येऊ नयेत यासाठी तात्काळ डागडुजीचे काम सुरू करावे, अशी ठाम मागणी आमदार सुनील शेळके यांनी केली.

  • By तेजस भागवत
Updated On: Jul 16, 2025 | 03:26 PM
Sunil Shelke: "...ही लोकांच्या जिवाशी थट्टा"; रस्त्यांच्या दुरावस्थेवर आमदार शेळके आक्रमक; केली 'ही' मोठी मागणी

Sunil Shelke: "...ही लोकांच्या जिवाशी थट्टा"; रस्त्यांच्या दुरावस्थेवर आमदार शेळके आक्रमक; केली 'ही' मोठी मागणी

Follow Us
Close
Follow Us:

वडगाव मावळ:  तळेगाव-चाकण-शिक्रापूर रस्त्याची झालेली दयनीय अवस्था, अपघातांचे वाढते प्रमाण आणि सामान्य जनतेला भोगावे लागणारे हाल यावर आमदार सुनील शेळके यांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर ठाम भूमिका घेत निदर्शने केली. त्यांच्या सोबत आमदार बाबाजी काळे (खेड) व माऊली कटके (शिरूर) यांनी देखील सहभाग घेत रस्त्याच्या डागडुजीसाठी तातडीची कारवाई करण्याची मागणी केली.

आमदार सुनील शेळके म्हणाले की, या रस्त्यांसाठी सुमारे ३२०० कोटी रुपयांची निविदा प्रक्रिया सुरू आहे. मात्र त्याला किमान तीन ते चार महिने लागणार असून काम पूर्ण होण्यासाठी किमान दोन ते अडीच वर्षांचा कालावधी जाईल. या दरम्यान, रस्त्यावरील खड्डे बुजवणे, साईडपट्ट्यांचे मुरमीकरण करणे, आणि अपघात प्रवण ठिकाणी सूचना फलक लावणे ही तातडीची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

शेळके पुढे म्हणाले की, “दररोज हजारो कामगार, विद्यार्थी आणि शेतकरी या रस्त्यांवरून प्रवास करतात. अपुऱ्या देखरेखीतून अपघात होत असून कोणी जबाबदारी घेत नाही. केवळ मोठ्या टेंडर काढून सरकार जबाबदारी झटकत आहे, ही लोकांच्या जिवाशी थट्टा आहे.”

निविदा प्रक्रियेचा कालावधी लक्षात घेता, नागरिकांचे जीव धोक्यात येऊ नयेत यासाठी तात्काळ डागडुजीचे काम सुरू करावे, अशी ठाम मागणी त्यांनी केली.

आमदार बाबाजी काळे यांनी यावेळी सांगितले की, या रस्त्यावर वर्षभरात दीडशेहून अधिक अपघात घडले असून अनेकांचे प्राण गेले आहेत. मोठ्या प्रमाणावर ट्राफिक आणि रस्त्यांची दुरवस्था यामुळे सामान्य जनतेला नाहक त्रास सहन करावा लागत आहे. चाकण, शिक्रापूर आणि तळेगाव चौकात अनेक तास ट्राफिकमध्ये अडकून नागरिक त्रस्त झाले आहेत.

Sunil Shelke Conspiracy: आमदार सुनील शेळके यांच्या हत्येचा कट उघड; एसआयटी स्थापन

आमदार माऊली कटके यांनीही सांगितले की, हा रस्ता तळेगाव, चाकण व शिक्रापूर एमआयडीसी आणि मुंबईशी जोडणारा महत्वाचा महामार्ग आहे. अरुंद रस्त्यांमुळे दररोज अपघात होत आहेत. रिंगरोड आणि पर्यायी महामार्गांची गरजही त्यांनी अधोरेखित केली.

या तिघाही आमदारांनी सरकारला साकडे घालत सांगितले की, मोठ्या औद्योगिक क्षेत्रांना जोडणारे हे रस्ते असून, कामगार आणि शेतकरीवर्गाच्या सुरक्षिततेसाठी तातडीने पावले उचलली जावीत. शासन या तिघा आमदारांच्या ठाम भूमिकेला किती गांभीर्याने घेऊन पुढील कृती करते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

आमदार सुनील शेळके यांच्या हत्येचा कट उघड

पिंपरी चिंचवडमध्ये एका भयानक कटाचा पर्दाफाश झाला असून मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या संभाव्य हत्येचा कट रचल्याचे तपासात समोर आले आहे. यासंदर्भात आमदार शेळके यांनी महाराष्ट्र विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडत गंभीर प्रश्न उपस्थित केले. त्यांच्या या सूचनेला उत्तर देताना गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी या प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी विशेष तपास पथक (SIT) नेमण्याचा निर्णय सात दिवसांत घेण्याची ग्वाही दिली.परंतु प्रकरणाचे गांभीर्य ओळखून लगेचच एस आय टी स्थापन करण्यात आली

Web Title: Vadgaon maval mla sunil shelke aggresive against road potholes

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 16, 2025 | 03:26 PM

Topics:  

  • Road Work
  • Sunil Shelke
  • Wadgaon Maval

संबंधित बातम्या

Maval Politics:  ‘ईव्हीएम हॅकिंगच्या नावाखाली २५-३५ लाखांची वसुली’;  सुनील शेळकेंचा भाजपवर गंभीर आरोप.
1

Maval Politics: ‘ईव्हीएम हॅकिंगच्या नावाखाली २५-३५ लाखांची वसुली’; सुनील शेळकेंचा भाजपवर गंभीर आरोप.

मावळच्या टाकवेत देशातील पहिली ‘ADAS टेस्ट सिटी’; भारताच्या वाहन तंत्रज्ञानात ऐतिहासिक टप्पा
2

मावळच्या टाकवेत देशातील पहिली ‘ADAS टेस्ट सिटी’; भारताच्या वाहन तंत्रज्ञानात ऐतिहासिक टप्पा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.