Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 3 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

रामवाडी-उबाळेनगर मेट्रो विस्ताराला गती; सुधारित आराखड्याच्या अंतिम मंजुरीची प्रक्रिया सुरू

रामवाडी ते उबाळेनगर (विमानतळ मार्ग) या प्रस्तावित मेट्रोमार्गिकेच्या विस्तारीकरणाच्या कामाला आता गती मिळण्याची शक्यता आहे. महामेट्रोने सुधारित आराखडा महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्याकडे सादर केला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Oct 03, 2026 | 06:14 PM
रामवाडी-उबाळेनगर मेट्रो विस्ताराला गती; सुधारित आराखड्याच्या अंतिम मंजुरीची प्रक्रिया सुरू

रामवाडी-उबाळेनगर मेट्रो विस्ताराला गती; सुधारित आराखड्याच्या अंतिम मंजुरीची प्रक्रिया सुरू

Follow Us
Follow Us:

पुणे : रामवाडी ते उबाळेनगर (विमानतळ मार्ग) या प्रस्तावित मेट्रोमार्गिकेच्या विस्तारीकरणाच्या कामाला आता गती मिळण्याची शक्यता आहे. या प्रकल्पाच्या सुधारित सर्वसाधारण आराखड्याला अंतिम मंजुरी देण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, महामेट्रोने सुधारित आराखडा पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्याकडे सादर केला आहे. या आराखड्यास मंजुरी देण्याची मागणी महामेट्रोकडून करण्यात आली आहे.

 

महापालिकेच्या विकास आराखड्यात (डीपी) निश्चित करण्यात आलेल्या रस्त्यांच्या ‘सेंटर लाइन’नुसार मेट्रोमार्गिका आणि प्रस्तावित उन्नत मार्गाच्या रचनेत आवश्यक बदल करण्यात आले आहेत. यासंदर्भात महापालिका आयुक्त नवल किशोर राम आणि महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांच्या उपस्थितीत दोन्ही यंत्रणांच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक झाली.

रामवाडी-उबाळेनगर मार्गावर मेट्रो मार्गिकेसोबत दुमजली रस्त्याची (डबल डेकर) रचना प्रस्तावित आहे. मात्र, काही ठिकाणी मेट्रोमार्गिका ही महापालिकेच्या विकास आराखड्यातील मध्यरेषेशी (डीपी सेंटर लाइन) जुळत नसल्याचे निदर्शनास आले. विशेषतः रस्त्याच्या वळणाच्या ठिकाणी डबल डेकरची रचना तसेच कॅन्टिलिव्हर पियर उभारणे तांत्रिकदृष्ट्या शक्य नसल्याने या भागातील आराखड्यात बदल करण्यात आला आहे.

महापालिकेकडून प्राप्त झालेल्या ‘डीपी लाइन’च्या मार्किंगनुसार महामेट्रोने सुधारित आराखडा तयार केला आहे. या आराखड्याला अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर ‘डीपी लाइन’च्या दोन्ही बाजूंना आवश्यक भूसंपादन आणि रस्ता रुंदीकरणाची कामे वेगाने करावी लागणार आहेत. त्यामुळे आराखडा मंजुरीनंतर या दोन्ही कामांना गती देणे महत्त्वाचे ठरणार आहे.

हे सुद्धा वाचा : पगार न दिल्याने नगरपालिका कर्मचाऱ्याची आत्महत्येची धमकी; व्हिडिओ व्हायरल होताच काही मिनिटात पगार जमा

कंत्राटदारांची नियुक्ती; समन्वय आवश्यक

विस्तारीकरणाच्या कामासाठी कंत्राटदाराची नियुक्ती यापूर्वीच करण्यात आली असून, प्राथमिक कामांनाही सुरुवात झाली आहे. तसेच विमानतळ मेट्रो स्थानकाजवळील एचसीएमटीआर क्रॉसिंगबाबत महापालिकेकडून महामेट्रोला पत्र प्राप्त झाले आहे. त्यावरही महामेट्रोकडून कार्यवाही सुरू आहे. प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी सुधारित आराखड्याला मंजुरी, आवश्यक भूसंपादन आणि रस्ता रुंदीकरण या तिन्ही बाबींमध्ये महापालिका आणि महामेट्रो यांच्यात प्रभावी समन्वय आवश्यक आहे.

Web Title: Work on the ramwadi to ubalenagar metro line is likely to gain momentum now nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 03, 2026 | 06:13 PM

Topics:  

  • metro news
  • Pune mahapalika
  • Pune Metro

संबंधित बातम्या

मोठे प्रकल्प होतील पण मूलभूत सुविधांकडे अधिक लक्ष देण्याची गरज; अमोल बालवडकर यांची नवभारत कार्यालयात भूमिका
1

मोठे प्रकल्प होतील पण मूलभूत सुविधांकडे अधिक लक्ष देण्याची गरज; अमोल बालवडकर यांची नवभारत कार्यालयात भूमिका

पावसामुळे शाळांच्या परिसराती बसथांबा कोसळला, मनसे आक्रमक; महापालिका आयुक्तांकडे केली ‘ही’ मागणी
2

पावसामुळे शाळांच्या परिसराती बसथांबा कोसळला, मनसे आक्रमक; महापालिका आयुक्तांकडे केली ‘ही’ मागणी

हिंजवडी मेट्रोच्या उद्घाटनाची प्रतीक्षा लांबणीवर, आयटी कर्मचारी नाराज; ‘हा’ टप्पा तातडीने सुरू करण्याची मागणी
3

हिंजवडी मेट्रोच्या उद्घाटनाची प्रतीक्षा लांबणीवर, आयटी कर्मचारी नाराज; ‘हा’ टप्पा तातडीने सुरू करण्याची मागणी

पुणेकरांचे प्रचंड हाल! प्रशासन बेफिकीर? 35 तास चाललेल्या विसर्जन मिरवणुकीने नियोजनावर उठले गंभीर प्रश्न
4

पुणेकरांचे प्रचंड हाल! प्रशासन बेफिकीर? 35 तास चाललेल्या विसर्जन मिरवणुकीने नियोजनावर उठले गंभीर प्रश्न

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.