Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Farmer Loan Waiver: शेतकरी कर्जमाफीच्या यादीत तुमचं नाव नाही का? मग ही बातमी आधी वाचाच

पहिल्या यादीत नाव न आलेले किंवा अर्ज प्रक्रियेत असलेले शेतकरी दुसऱ्या यादीत समाविष्ट होण्याची शक्यता आहे. राज्यातील बँकांनी महा-आयटी प्रणालीवर सुमारे 31.17 लाख कर्जखात्यांची माहिती अपलोड केली असून, त्यातून पुढील टप्प्यातील पात्र लाभार्थ्यांची निवड केली जाणार आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Jul 29, 2026 | 12:09 PM
कर्जमाफीच्या पात्र खातेदारांची यादी जाहीर; यादीत तब्बल दीड हजार मृत खातेदार

कर्जमाफीच्या पात्र खातेदारांची यादी जाहीर; यादीत तब्बल दीड हजार मृत खातेदार

Follow Us
Follow Us:
  • पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या पहिल्या टप्प्यातील लाभार्थी यादी जाहीर
  • पहिल्या यादीत नाव न आलेले किंवा अर्ज प्रक्रियेत असलेले शेतकरी दुसऱ्या यादीत समाविष्ट होण्याची शक्यता
  • कर्जमुक्ती योजनेच्या पहिल्या टप्प्यात राज्यातील 16 लाख 96 हजार शेतकरी लाभार्थी म्हणून पात्र
Farmer Loan Waiver :  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या पहिल्या टप्प्यातील लाभार्थी यादी जाहीर झाली. पण त्यात अनेक शेतकऱ्यांची नावे नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटू लागला आहे. पण कर्जमाफीच्या झाल्यानंतर आता दुसऱ्या यादीची प्रतीक्षा करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. राज्याचे सहकार आयुक्त दीपक तावरे यांनी कर्जमाफीच्या दुसऱ्या यादीबाबत महत्त्वाची घोषणा केली असून, ती ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात महा-आयटीच्या पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे सांगितले.

ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात दुसरी यादी

पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना सहकार आयुक्त दीपक तावरे यांनी कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीची माहिती दिली. पहिल्या यादीत नाव न आलेले किंवा अर्ज प्रक्रियेत असलेले शेतकरी दुसऱ्या यादीत समाविष्ट होण्याची शक्यता आहे. राज्यातील बँकांनी महा-आयटी प्रणालीवर सुमारे 31.17 लाख कर्जखात्यांची माहिती अपलोड केली असून, त्यातून पुढील टप्प्यातील पात्र लाभार्थ्यांची निवड केली जाणार आहे.

Pune ZP Budget 2026: पुणे जिल्हा परिषदेचे ३३३ कोटींचे पुरवणी अंदाजपत्रक मंजूर; ३२ कोटींची वाढ

पहिल्या टप्प्यात 16.96 लाख शेतकऱ्यांना लाभ

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेच्या पहिल्या टप्प्यात राज्यातील 16 लाख 96 हजार शेतकरी लाभार्थी म्हणून पात्र ठरले आहेत. यासाठी राज्य शासनाने सुमारे ₹13,600 कोटींची तरतूद केली आहे. पुणे जिल्ह्यातील 64,664 शेतकऱ्यांचा पहिल्या यादीत समावेश करण्यात आला आहे. तर राज्यात सर्वाधिक 1,32,734 लाभार्थी अहिल्यानगर जिल्ह्यातील आहेत.

पहिल्या यादीत कोणाचा समावेश?

सहकार विभागाच्या माहितीनुसार, पहिल्या टप्प्यात ₹2 लाखांपर्यंत थकीत पीककर्ज असलेल्या शेतकऱ्यांचाच समावेश करण्यात आला आहे. ज्या शेतकऱ्यांची थकबाकी ₹2 लाखांपेक्षा जास्त आहे किंवा इतर श्रेणीतील प्रकरणे आहेत, त्यांचा विचार पुढील टप्प्यातील याद्यांमध्ये केला जाणार आहे.

पहिल्या यादीतील सुमारे 4 लाख शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण झाले आहे. उर्वरित पात्र लाभार्थ्यांचे प्रमाणीकरण पुढील चार दिवसांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असून, प्रक्रिया पूर्ण होताच कर्जमाफीची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे.

पुणे विद्यापीठात बोगस डिग्री रॅकेट? 3 लाखांत पदवी; जाणून घ्या नेमका प्रकार काय…

पहिल्या यादीत नाव नसेल तर काय करावे?

ज्या शेतकऱ्यांची नावे पहिल्या यादीत आलेली नाहीत, त्यांनी घाबरून न जाता संबंधित जिल्हास्तरीय समिती किंवा तहसीलदार कार्यालयाकडे आवश्यक अर्ज सादर करावा, असे आवाहन सहकार प्रशासनाने केले आहे.

एनपीए कर्जखात्यांनाही मोठा दिलासा

व्यापारी बँकांमधील एनपीए (NPA) कर्जखात्यांसाठी कालावधीनुसार 35 ते 85 टक्क्यांपर्यंत तडजोडीची सवलत देण्यात आली आहे. गावपातळीवर प्रसिद्ध झालेल्या यादीतील तडजोडीच्या रकमेपैकी पात्र शेतकऱ्यांच्या ₹2 लाखांपर्यंतच्या थकबाकीची भरपाई राज्य सरकार करणार आहे.

याशिवाय, 1 एप्रिलनंतर या कर्जखात्यांवर अतिरिक्त व्याज आकारू नये, असे स्पष्ट निर्देश राज्य शासनाने व्यापारी बँकांना दिले आहेत.

 

 

 

 

 

Web Title: Punyashlok ahilyadevi holkar shetkari karjmukti yojana 2nd list august second week

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 29, 2026 | 12:05 PM

Topics:  

  • Ahilyadevi Holkar
  • Farmer Loan Waiver

संबंधित बातम्या

कर्जमुक्तीच्या दुसऱ्या यादीत पुणे विभागातील 23117 शेतकरी; सहकारमंत्र्यांनी केले ‘हे’ आवाहन
1

कर्जमुक्तीच्या दुसऱ्या यादीत पुणे विभागातील 23117 शेतकरी; सहकारमंत्र्यांनी केले ‘हे’ आवाहन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.