Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुरंदर विमानतळाची अधिसूचना अखेर जारी; एमआयडीसीकडून सात गावांमधील क्षेत्र औद्योगिक म्हणून जाहीर

पुणे लोहगाव येथील विमानतळ हे संरक्षण विभागाचे असून, पुण्यासाठी स्वतंत्र असे आंतरराष्ट्रीय विमानतळाची आवश्यकता आहे. त्यानुसार आधी खेड तालुक्यात जागेची चाचपणी करण्यात आली. त्यानंतर पुरंदर तालुक्यात जागा निश्चित झाली.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 17, 2025 | 10:53 AM
पुरंदर विमानतळाची अधिसूचना अखेर जारी; एमआयडीसीकडून सात गावांमधील क्षेत्र औद्योगिक म्हणून जाहीर

पुरंदर विमानतळाची अधिसूचना अखेर जारी; एमआयडीसीकडून सात गावांमधील क्षेत्र औद्योगिक म्हणून जाहीर

Follow Us
Follow Us:

पुणे : गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेला पुरंदर विमानतळाचा प्रश्न प्रलंबित असून, तो अखेर संपुष्टात आला आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियमानुसार अधिसूचना जारी करण्यात आली. त्यानुसार, विमानतळासाठी ठरल्याप्रमाणे सात गावांमधील सुमारे 2 हजार 832 हेक्टर जागा संपादित करण्यात येणार आहे. या गावांना औद्योगिक दर्जा देण्यात आला आहे. गावांमधील चतुःसीमाही निश्चित केल्या असून, जमिनीची मोजणी करून भूसंपादनाची प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे.

विमानतळासाठी पुरंदर तालुक्यातील वनपुरी, पारगाव मेमाणे, कुंभारवळण, एखतपूर, उदाची वाडी, मुंजवडी, खानवडी या सात गावांमधील एकूण २ हजार ८३२ हेक्टर जमिनीचे संपादन करण्यासाठी अधिसूचना जारी करणे गरजेचे होते. त्यानुसार, उद्योग विभागाने महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियमानुसार हे क्षेत्र निश्चित केले आहे. या गावांना आता औद्योगिक क्षेत्राचा दर्जा देण्यात आला असून, रस्ते, पाणंद, ओढा या जागाही संपादित केल्या जाणार आहेत.

सर्व सात गावांमधील चतुःसीमाही निश्चित केल्या असून, या जमिनींवर एमआयडीसीचे शेरे मारण्यात येणार आहेत. भूसंपादनाबाबत एमआयडीसी व महसूल विभागाच्या बैठकीत कार्यपद्धती निश्चित करण्यात येईल. त्यानंतर वृत्तपत्रांमध्ये जाहिरात देऊन त्याबाबत हरकती व सूचना मागवल्या जातील. त्यासाठी एक महिन्याचा कालावधी असेल. त्यानंतर जमिनीची मोजणी होऊन त्याच्या भूसंपादनाची प्रक्रिया सुरू केली जाईल.

विमानतळाचा एक पाऊल पुढे

पुरंदर विमानतळाची घोषणा ऑक्टोबर २०१६ मध्ये केली होती. परंतु, त्याला सुरुवातीपासून विरोध झाला. महाविकास आघाडी सरकारच्या काळात विमानतळाची जागा बदलण्यात आली होती. महायुतीचे सरकार पुन्हा सत्तेत आल्यानंतर पूर्वीच्या जागी विमानतळ होईल, हे घोषित करून पुढील पाच वर्षांत विमानतळ पूर्ण करण्याचे ठरविले. उपमुख्यमंत्री व वित्तमंत्री अजित पवार यांनी नुकत्याच मांडलेल्या अर्थसंकल्पात पुरंदर विमानतळासाठी कोणतीही तरतूद न केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात होते. मात्र, सरकारने आता अधिसूचना जारी केल्याने त्याबाबत एक पाऊल पुढे टाकले आहे.

जागा बदलण्याचा झाला प्रयत्न

पुणे लोहगाव येथील विमानतळ हे संरक्षण विभागाचे असून, पुण्यासाठी स्वतंत्र असे आंतरराष्ट्रीय विमानतळाची आवश्यकता आहे. त्यानुसार आधी खेड तालुक्यात जागेची चाचपणी करण्यात आली. त्यानंतर पुरंदर तालुक्यात जागा निश्चित झाली. दरम्यान, केंद्र शासनाच्या सर्व आवश्यक ती मंजुरी मिळाली होती. मात्र, राज्यात महाविकास आघाडी सरकारने पुरंदरच्या नियोजित जागे व्यतरिक्त इतर जागेवर विमानतळ करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो प्रस्ताव केंद्र सरकारने फेटाळला. त्यानंतर राज्यात महायुतीचे सरकार आले. त्यानंतर पुरंदर विमानतळ प्रस्तावित जागेवरच होणार, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्यानुसार आता भूसंपादनाची अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

Web Title: Purandar airport notification finally issued nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 17, 2025 | 10:53 AM

Topics:  

  • indian airport
  • Pune Airport
  • Purandar Airport

संबंधित बातम्या

Purandar Airport : पुरंदर विमानतळ प्रकल्प बाधित शेतकऱ्यांना विकसित 10 टक्के भूखंड देणार; जिल्हाधिकाऱ्यांचं स्पष्टीकरण
1

Purandar Airport : पुरंदर विमानतळ प्रकल्प बाधित शेतकऱ्यांना विकसित 10 टक्के भूखंड देणार; जिल्हाधिकाऱ्यांचं स्पष्टीकरण

Purandar Airport : पुरंदर विमानतळासाठी भूसंपादनाला वेग, आत्तापर्यंत 1150 कोटींचे वाटप; आणखी निधी…
2

Purandar Airport : पुरंदर विमानतळासाठी भूसंपादनाला वेग, आत्तापर्यंत 1150 कोटींचे वाटप; आणखी निधी…

Purandar Airport : पुरंदर विमानतळ प्रकल्पाला वेग, 253 हेक्टर जमीन संपादनाला हिरवा कंदील; राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध
3

Purandar Airport : पुरंदर विमानतळ प्रकल्पाला वेग, 253 हेक्टर जमीन संपादनाला हिरवा कंदील; राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.