Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Purandar Politics: पुरंदरमध्ये महायुतीत पुन्हा संघर्षाची ठिणगी; भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी आमने-सामने

सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शिवतारे यांच्यात लढत असल्याने दोघांमधील संघर्ष चांगलाच पेटणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Jan 25, 2026 | 07:30 PM
Purandar Politics, Mahayuti Politics,

Purandar Politics, Mahayuti Politics,

Follow Us
Close
Follow Us:
  • भाजपा, शिवसेना (शिंदे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) या मित्रपक्षांमध्येच संघर्ष
  • विजय शिवतारे आणि   संजय जगताप हे पारंपरिक राजकीय वैरी
  • २०१९ च्या निवडणुकीत संजय जगताप यांनी विजय शिवतारे यांचा पराभव केला होता
संभाजी महामुनी, Purandar Politics: सासवड, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत पुरंदरमध्ये महायुतीतील भाजपा, शिवसेना (शिंदे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) या मित्रपक्षांमध्येच संघर्ष पेटल्याचे पाहायला मिळत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार, पुरंदरचे शिवसेना (शिंदे ) शिवसेना पक्षाचे आमदार विजय शिवतारे आणि भाजपामध्ये प्रवेश केलेले काँग्रेसचे माजी आमदार संजय जगताप हे पारंपरिक राजकीय वैरी या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा समोरासमोर आल्याने मित्र पक्षांमध्येच संघर्ष पेटल्याचे दिसून येत आहे.

MNS Raj Thackeray News: पुणे ‘मनसे”त मोठे फेरबदल? ‘भाकरी फिरवून’ राज ठाकरे कोणाला देणार संधी?

महायुती झाल्यानंतरही लोकसभा निवडणुकीत आमदार विजय शिवतारे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात सुरुवातीला जोरदार संघर्ष झाला. बारामती लोकसभा निवडणुकीतील उमेदवार सुनेत्रा पवार यांचा प्रचार करणार नसल्याची ठाम भूमिका शिवतारे यांनी घेतली होती. अजित पवार यांच्यावर टीका करताना अजित पवार हा विंचू असून अनेकांना डसला आणि महादेवाच्या पिंडीवर जावून बसला. त्यामुळे आता त्याला मारायचे म्हणले तरी पिंडीला लागते असे म्हणून जोरदार टीकास्त्र सोडले होते. त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मध्यस्थी केल्यानंतर शिवतारे आणि अजित पवार यांच्यात दिलजमाई झाली. त्यामुळे शिवतारे यांना नांगी ठेचण्याऐवजी पवारांसमोर नांगी टाकावी लागली. शिवतारे यांनी सुनेत्रा पवार यांचा प्रचार केला. मात्र, प्रत्यक्षात त्यांना पुरंदरमध्ये मताधिक्य मिळू शकले नाही.

२०१९ च्या निवडणुकीत संजय जगताप यांनी विजय शिवतारे यांचा पराभव केला होता. त्यावेळी शिवतारे यांच्या पराभवासाठी अजित पवार यांनी ताकद लावली. ‘तू कसा निवडून येतो तेच मी बघतो,’ असे जाहीर आव्हान अजित पवार यांनी शिवतारे यांना दिले. त्या निवडणुकीत शिवतारे यांचा पराभव झाला. त्यामुळे २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत शिवतारे सुरुवातीला विरोधाच्या भूमिकेत होते. तसेच पत्नी खासदार सुनेत्रा पवार यांच्या पराभवाची मनात सल असल्याने विधानसभा निवडणुकीत महायुती असतानाही अजित पवार यांनी विजय शिवतारे यांच्या विरोधात संभाजीराव झेंडे यांना उमेदवारी दिली. शिवतारे यांच्या विरोधात काँग्रेसकडून माजी आमदार संजय जगताप उमेदवार होते. तसेच अजित पवार यांनी उमेदवार उभा करूनही शिवतारे विजयी झाले.

इचलकरंजी महानगरपालिकेत पद 1 अन् इच्छुक 27; नेत्यांची कृपादृष्टीतील पहिला मानकरी कोण?

आमदार विजय शिवतारे यांच्या आग्रहास्तव तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यानी फुरसुंगी आणि उरुळी कांचनचा परिसर महापालिका हद्दीतून वगळून स्वतंत्र नगर परिषद तयार केली. त्यामुळे नगरपरिषद ताब्यात येईल, असा शिवतारे यांचा व्होरा होता. निवडणुकीच्या निमित्ताने अजित पवार आणि शिवतारे हे पुन्हा समोरासमोर आले. मात्र ही नगर परिषद अजित पवार यांच्या ‘राष्ट्रवादी’च्या ताब्यात घेण्यात यश मिळवले.

सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शिवतारे यांच्यात लढत असल्याने दोघांमधील संघर्ष चांगलाच पेटणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) या दोन्ही ‘राष्ट्रवादी’ने एकत्र निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अजित पवार आणि शिवतारे यांच्यात पुन्हा एकदा लढत होणार आहे.

शिवतारे आणि जगताप पुन्हा आमनेसामने

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेना (शिंदे) पक्षाने युती करण्याबाबत प्राथमिक चर्चा झाली. मात्र, पुणे महापालिकेप्रमाणे भाजपने ऐन वेळी युती न करता स्वबळावर निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे या निवडणुकांमध्ये भाजप आणि शिवसेना (शिंदे) या दोन्ही पक्षांनी स्वबळावर निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेसचे माजी आमदार संजय जगताप भाजपमध्ये असल्याने शिवतारे आणि जगताप या राजकीय हाडवैर असलेल्या दोघांमध्ये विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा लढत होणार आहे. त्यामुळे निवडणुकीच्या निमित्ताने दोन्ही प्रतिस्पर्धी पुन्हा आमनेसामने आले आहेत.

काटा काढण्यासाठी सर्वच एकमेकांच्या विरोधात

पुरंदरमध्ये अजित पवार, विजय शिवतारे आणि संजय जगताप या महायुतीतील मित्रपक्षांच्या तीन नेत्यांमध्ये संघर्ष सुरु झाला आहे. विजय शिवतारे हे नगर परिषदेतील पराभवाचा वचपा काढण्याच्या तयारीत आहेत. तर संजय जगताप हे विजय शिवतारे यांनी विधानसभेत केलेल्या पराभवाचे उट्टे काढण्यासाठी सरसावले आहेत. तर अजित पवार दोघांमधील राजकीय संघर्षाचा फायदा घेण्यासाठी पुढे सरसावले आहेत. त्यामुळे पुरंदरमध्ये महायुतीतील मित्रपक्षांमध्येच संघर्ष पेटल्याचे दिसून येते.

 

Web Title: Purandar politics a spark of conflict has reignited within the mahayuti alliance in purandar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 25, 2026 | 07:30 PM

Topics:  

  • BJP Politics
  • Eknath shinde Shivsena
  • Mahayuti Politics
  • Zilla Parishad Election 2026

संबंधित बातम्या

नरेंद्र मोदींनंतर कोण होणार पंतप्रधान? नितीन नबीन राजकारणाच्या पटलावरचे ठरणार प्यादे की वजीर?
1

नरेंद्र मोदींनंतर कोण होणार पंतप्रधान? नितीन नबीन राजकारणाच्या पटलावरचे ठरणार प्यादे की वजीर?

Dharashiv ZP Election 2026: धाराशिवमध्ये शिवसेनेचे अस्तित्व धोक्यात? तिकीट वाटपात भाजपचा थेट हस्तक्षेप, शिवसैनिकांचा संताप
2

Dharashiv ZP Election 2026: धाराशिवमध्ये शिवसेनेचे अस्तित्व धोक्यात? तिकीट वाटपात भाजपचा थेट हस्तक्षेप, शिवसैनिकांचा संताप

Sindhudurg Zilla Parishad Election: जिल्हापरिषदांमध्ये भाजपकडून बिनविरोधाची मालिका सुरूच: सिंधुदुर्गात दोन उमेदवार जिंकले
3

Sindhudurg Zilla Parishad Election: जिल्हापरिषदांमध्ये भाजपकडून बिनविरोधाची मालिका सुरूच: सिंधुदुर्गात दोन उमेदवार जिंकले

Khed Panchayat Samiti Election: गट–गणांत तिरंगी–चौरंगी लढती, राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता
4

Khed Panchayat Samiti Election: गट–गणांत तिरंगी–चौरंगी लढती, राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.