मंत्री राधाकृष्ण विखे पाटील जरांगे पाटलांच्या भेटीला
राज्य सरकारने मराठा आरक्षणचा जीआर काढला
मराठा आरक्षणाच्या जीआरविरुद्ध ओबीसी नेते आक्रमक
Radhakrishna Vikhe Patil On Manoj Jarange Patil: राज्य सरकारने मराठा आरक्षणाचा जीआर काढला आहे. जरांगे पाटील यांच्या 8 पैकी 6 मागण्या राज्य सरकारने मान्य केल्या आहेत. दरम्यान आज मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मनोज जरांगे पाटील यांनी भेट घेतली. यावेळी त्यांनी आरक्षणाच्या जीआरबाबट भाष्य केले आहे.
काय म्हणाले मंत्री राधाकृष्ण विखे पाटील?
मराठा आरक्षणाच्या जीआर संदर्भात ज्यांना शंका असतील त्यांनी माझ्याशी बोलावे. कोणीही या जीआर संदर्भात संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये. जीआरमध्ये कोणत्याही त्रुटी नाहीत. ज्या गोष्टी रेकॉर्डवर आहेत त्या नाकारता येऊ शकत नाहीत. चर्चेत सहभागी होयच नाही, आंदोलनात सहभागी होयच नाही. सरकारने निर्णय केल्यानंतर त्यावर भाष्य करायच, हे थांबवले पाहिजे. मराठा-ओबीसी करण्यापेक्षा ज्या जय लोकांचे जे अधिकार आहे ते आपण द्यायला निघालो आहोत. प्रत्येकाने एकमेकांना सहकारी केले पाहिजे, अशी आमची भावना आहे.
जरांगे पाटलांनी सोडली पातळी, नव्या वादाला फुटणार तोंड
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केवळ मुख्यमंत्री फडणवीस यांना घेरण्यासाठीच मुंबईत आंदोलन केले असे विधान केले होते. यावर मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे. यावेळी राऊत यांच्या विधानाला प्रत्युत्तर देताना जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याबाबत वादग्रस्त विधान केले आहे.
मुंबईत मराठ्यांना पाऊल ठेवू दिले जाणार नसते तर, वर्षा बंगल्यावर जाऊन फडणवीसांना धुवून काढले असते असे विधान जरांगे पाटील यांनी केले आहे. एकनाथ शिंदे यांनी जरांगे पाटील यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून फडणवीस यांना घेरण्याचा मुख्य उद्देश्य या आंदोलनाचा होता, असे संजय राऊत म्हणाले होते. त्यावर बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले, “शिंदे साहेब बिचारा माणूस तसे कधीच करू शकत नाही. राऊत साहेब म्हटले हे त्यांचे राजकीय टोले असतील. मुंबईत उभारू देणार नाही असे ते म्हणाले होते. आम्हाला काही करायचे असते तर फडणवीसांना वर्षा बंगल्यावर जाऊन धुतला असता.”