Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 19 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Gondiya News: गोंदियात ‘राहुल गांधीं’नी थांबवली गाडी; कार्यकर्त्याशी साधला संवाद! मृत आदिवासी मुलांच्या कुटुंबीयांची घेतली भेट

गोंदियातील बिरसी विमानतळावरून बालाघाटकडे जाताना राहुल गांधींच्या ताफ्याजवळ गुलाब घेऊन धावलेल्या कार्यकर्त्याची अचानक भेट झाली. सुरक्षारक्षकांनी थांबवण्याचा प्रयत्न केला, पण राहुल गांधींनी गाडी थांबवून त्याच्याशी संवाद साधल्याने हा प्रसंग चर्चेत आला.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Oct 02, 2026 | 06:32 PM
Gondiya News: गोंदियात ‘राहुल गांधीं’नी थांबवली गाडी; कार्यकर्त्याशी साधला संवाद! मृत आदिवासी मुलांच्या कुटुंबीयांची घेतली भेट
Follow Us
Follow Us:
  • बिरसी विमानतळावर गुलाब घेऊन धावलेल्या गौरव बिसेन यांच्यासाठी राहुल गांधींनी आपले वाहन थांबवले.
  • राहुल गांधींनी बालाघाटच्या जगला गावात मृत आदिवासी मुलांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांच्या समस्या ऐकल्या.
  • बालाघाट दौरा पूर्ण केल्यानंतर राहुल गांधी गोंदियातील बिरसी विमानतळावरून दिल्लीकडे रवाना झाले.
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी गुरुवारी बालाघाट दौऱ्यावर होते. महाराष्ट्रातील गोंदिया येथील बिरसी विमानतळावरून ते रस्त्याने मध्य प्रदेशातील जगला गावाकडे रवाना झाले. या प्रवासादरम्यान त्यांच्या वाहनाजवळ घडलेला एक प्रसंग सध्या चर्चेत आला आहे.

गुलाब घेऊन वाहनामागे धावला कार्यकर्ता

राहुल गांधींचा ताफा बिरसी विमानतळावरून बालाघाटकडे निघाल्यानंतर NSUI कार्यकर्ता गौरव बिसेन त्यांच्या वाहनाजवळ जाण्याचा प्रयत्न करत धावत असल्याचे वृत्त आहे. त्याच्या हातात गुलाबाचे फूल होते. सुरक्षारक्षकांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. पण हा प्रकार राहुल गांधी यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी वाहन थांबवले आणि गाडीचा दरवाजा उघडून बिसेन यांच्याशी संवाद साधला. त्यांनी दिलेले गुलाबाचे फूलही स्वीकारले.

Rahul Gandhi on Gyanesh Kumar : ‘ज्ञानेश कुमारांचा राजीनामा मोदीच घेतील’; राहुल गांधींचा मोठा दावा, देशव्यापी आंदोलनाची तयारी

बालाघाटमध्ये मृत मुलांच्या कुटुंबीयांची भेट

यानंतर राहुल गांधी रस्त्याने मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातील जगला गावात पोहोचले. तेथे त्यांनी आजारपणामुळे मुलांना गमावलेल्या बैगा आदिवासी कुटुंबीयांची भेट घेतली आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. विविध वृत्तांनुसार, या भागात आजार, कुपोषण आणि आरोग्य सुविधांशी संबंधित समस्यांमुळे आदिवासी मुलांच्या मृत्यूच्या घटना समोर आल्या आहेत.

शाळेतही विद्यार्थ्यांशी संवाद

बालाघाट दौऱ्यात त्यांनी माटे येथील शासकीय प्राथमिक शाळेलाही भेट दिली. तेथे विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांनी शिक्षण आणि मध्यान्ह भोजनाबाबत माहिती घेतली. जगला गावात त्यांनी प्रभावित कुटुंबीयांसोबत वेळ घालवला. या भेटीदरम्यान आदिवासी भागातील आरोग्य, शिक्षण, रोजगार आणि मूलभूत सुविधांचे प्रश्न चर्चेत आले.

Raj Thackeray-Rahul Gandhi Politics: राज ठाकरे अन् राहुल गांधी एकत्र येणार? बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

गोंदियातून दिल्लीकडे रवाना

बालाघाटमधील दौरा पूर्ण केल्यानंतर राहुल गांधी पुन्हा गोंदियातील बिरसी विमानतळाकडे रवाना झाले. त्यानंतर त्यांनी दिल्लीकडे प्रयाण केले. दरम्यान, बिरसी विमानतळावरील गुलाब देण्यासाठी धावलेल्या कार्यकर्त्याशी झालेली त्यांची काही क्षणांची भेट स्थानिक पातळीवर चर्चेचा विषय ठरली.

Web Title: Rahul gandhi gondia birsi airport balaghat visit auto news marathi ar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 02, 2026 | 06:32 PM

Topics:  

  • gondiya
  • maharashtra
  • Rahul Gandhi

संबंधित बातम्या

Dharashiv Water Crisis: पाणीप्रश्न सुटणार? उजनीतून १ टीएमसी पाण्याला मंजुरी; राणाजगजितसिंह पाटील यांच्या पाठपुराव्याला यश
1

Dharashiv Water Crisis: पाणीप्रश्न सुटणार? उजनीतून १ टीएमसी पाण्याला मंजुरी; राणाजगजितसिंह पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

सातबारा, फेरफारसाठी नागरिकांचे हेलपाटे; इंदापूर तहसीलदारांच्या कारभाराविरोधात होणार सर्वपक्षीय आंदोलन
2

सातबारा, फेरफारसाठी नागरिकांचे हेलपाटे; इंदापूर तहसीलदारांच्या कारभाराविरोधात होणार सर्वपक्षीय आंदोलन

Eknath Shinde Helicopter: एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरचे एक इंजिन सुरू, दुसरे इंजिन..; ऐनवेळी उड्डाण रद्द, पुण्याला कारने रवाना
3

Eknath Shinde Helicopter: एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरचे एक इंजिन सुरू, दुसरे इंजिन..; ऐनवेळी उड्डाण रद्द, पुण्याला कारने रवाना

लाखो रुपयांची सक्शन कम जेटिंग मशीन धूळखात; दौंड नगरपरिषदेचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर
4

लाखो रुपयांची सक्शन कम जेटिंग मशीन धूळखात; दौंड नगरपरिषदेचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.