महायुतीतील ८ मंत्र्यांना मिळणार नारळ? राहुल नार्वेकर, सुधीर मुनगंटीवारांवर मोठी जबाबदारी?
मुंबई: विधानसभेच्या विशेष अधिवेशनात आज सत्तादारी महायुतीच्या नेत्यांनी विधानसभा सदस्यपदाची शपथ घेतली. पण विरोधी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी अद्याप शपथ घेतलेली नाही. दरम्यान, हा शपथविधी झाल्यानंतर सोमवारी (9 डिसेंबर) विधानसभेच्या नव्या अध्यक्षाची निवड होणार आहे. विशेष म्हणजे, भाजपचे आमदार राहुल नार्वेकर यांच्याच गळ्यात पुन्हा एकदा विधासभा अध्यक्षपदाची माळ पडणार असल्याची माहिती समोर आली आहे.
गेल्या अडीच वर्षांपासून राहुल नार्वेकर यांनी विधानसभेचे कामकाज हाताळले आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिंदे गट आणि ठाकरे गटाच्या पक्ष आणि चिन्हाबाबतच्या वादात नार्वेकरांनी महत्त्वाची भूमिका बजावली. निवडणुकीनंतर विधानसभेचे अध्यक्षपद कुणाला मिळणार, याबाबत मोठी चर्चा सुरू होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्षपदाची माळ नार्वेकरांच्या गळ्यात पडणार असल्याची माहिती आहे.
पराभवानंतर महाविकास आघाडीचा मोठा निर्णय; नाना पटोलेंनी दिली सविस्तर माहिती
विधानसभा अध्यक्षपदावर राहुल नार्वेकर यांची निवड जवळपास निश्चित मानली जात आहे. रविवारी दुपारी 12च्या सुमारास नार्वेकर विधानसभा अध्यक्षपदासाठी आपला अर्ज दाखल करू शकतात. विशेष म्हणजे, यंदा महायुतीकडे संख्याबळ असल्याने राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदावरची अगदी सहजासहजी निवड होणार आहे
दरम्यान, आजपासून (7 डिसेंबर) विधानसभेच्या विशेष अधिवेशनाला सुरुवात झाली. शनिवारी आणि रविवार या दोन दिवसांमध्ये 288 आमदारांना विधानसभेच्य सदस्यपदाची आमि आणि गोपनीयतेची शपथ दिली जाईल. भाजपचे ज्येष्ठ नेते कालिदास कोळंबकर यांची हंगामी विधानसभा अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. पण पहिल्याच दिवशी विरोधा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आमदारकीची शपथ घेण्यास नकार देत सभात्याग केला. त्यामुळे आज केवळ सत्ताधारी पक्षाच्या आमदारांचाच शपथविधी झाला. त्यानंतर उद्या शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार महाविकास आघाडीचे आमदार शपथ घेतील.
महाविकास आघाडीला मोठा झटका! मविआतून बाहेर पडण्याचा समाजवादी पक्षाचा निर्णय; अबू आझमींची मोठी घोषणा
आदित्य ठाकरे यांनी शपथ न घेण्याच आणि सभात्याग करण्याच कारण सांगत महाविकास आघाडीवर निशाणा साधला. “ईव्हीएममुळे लोकशाहीची हत्या होत असल्याने आजच्या आमदारांच्या शपथविधीवर आम्ही बहिष्कार टाकला. आम्हाला ईव्हीएमबाबत शंका आहेत. हा महाराष्ट्रातील जनतेचा जनादेश नाही. हा ईव्हीएम आणि निवडणूक आयोगाचा आदेश आहे, त्यामुळे उद्धव गटाचे आमदार आज शपथ घेणार नाहीत. जनादेश असता तर लोकांनी आनंद साजरा केला असता, पण जनतेने कोणताही जल्लोषही केला नाही, लोकांच्या मनात शंका असल्याने आम्ही शपथ घेणार नाही, ” अशी प्रतिक्रीया ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी दिली. निवडणुकीत ईव्हीएमचा गैरवापर होत असल्याचा आरोप करत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सभागृहाच्या कामकाजावर बहिष्कार टाकत असल्याचे सांगितले. 23 नोव्हेंबरला महाराष्ट्रात निकाल जाहीर झाल्यापासून विरोधी महाविकास आघाडी ईव्हीएममध्ये गैरप्रकार झाल्याचा आरोप करत आहे. अनेक जागांवर मतमोजणी मतदानापेक्षा जास्त झाली असून अनेक जागांवर मतदानापेक्षा कमी मतमोजणी झाल्याचा त्यांचा दावा आहे. अनेक उमेदवार फेरमतमोजणी करण्याची मागणीही करत आहेत.