Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नवनिर्वाचित नगरसेवकांपुढे ‘आर्थिक’ पेच; ‘या’ कारणांमुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेतील तिजोरीवर ताण

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील तब्बल चार वर्षांची प्रशासकीय राजवट आता अखेर संपुष्टात येत असून, लोकशाही प्रक्रियेद्वारे नवनिर्वाचित लोकप्रतिनिधी शहराच्या कारभाराची सूत्रे हाती घेण्याच्या तयारीत आहेत.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jan 23, 2026 | 05:58 PM
नवनिर्वाचित नगरसेवकांपुढे 'आर्थिक' पेच; 'या' कारणांमुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेतील तिजोरीवर ताण

नवनिर्वाचित नगरसेवकांपुढे 'आर्थिक' पेच; 'या' कारणांमुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेतील तिजोरीवर ताण

Follow Us
Close
Follow Us:
  • नवनिर्वाचित नगरसेवकांपुढे ‘आर्थिक’ पेच
  • पिंपरी-चिंचवड महापालिकेतील तिजोरीवर ताण
  • ‘श्रीमंत’ पालिकेवर कर्जाचा डोंगर
पिंपरी/विजया गिरमे : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील तब्बल चार वर्षांची प्रशासकीय राजवट आता अखेर संपुष्टात येत असून, लोकशाही प्रक्रियेद्वारे नवनिर्वाचित लोकप्रतिनिधी शहराच्या कारभाराची सूत्रे हाती घेण्याच्या तयारीत आहेत. प्रशासकांच्या काळानंतर पुन्हा एकदा नगरसेवक, स्थायी समिती आणि महापौरांच्या माध्यमातून लोकप्रतिनिधींचा कारभार सुरू होणार, ही बाब शहराच्या लोकशाही व्यवस्थेसाठी नक्कीच दिलासादायक आणि सकारात्मक मानली जात आहे. मात्र, या बदलत्या सत्ताकारणाच्या पार्श्वभूमीवर आर्थिक वास्तव मात्र नवनिर्वाचित प्रतिनिधींसमोर मोठे आव्हान उभे करत आहे.

 

गेल्या चार वर्षांच्या प्रशासकीय काळात शहराच्या विकासासाठी विविध पायाभूत सुविधा, रस्ते, जलवाहिन्या, ड्रेनेज, उड्डाणपूल, शैक्षणिक व आरोग्य प्रकल्प यांसाठी कोट्यवधी रुपयांची कामे मंजूर करण्यात आली. या प्रकल्पांपैकी अनेक कामे अद्याप अपूर्ण असून, काही कामे अंतिम टप्प्यात आहेत, तर काहींची अंमलबजावणी नुकतीच सुरू झाली आहे. परिणामी, या सर्व विकासकामांचा मोठा आर्थिक बोजा सध्या महापालिकेच्या तिजोरीवर पडलेला आहे.

‘श्रीमंत’ पालिकेवर कर्जाचा डोंगर

एकेकाळी ‘आशियातील सर्वात श्रीमंत महापालिका’ म्हणून ओळख असलेल्या पिंपरी-चिंचवडची आर्थिक स्थिती सध्या चिंतेचा विषय ठरत आहे. प्रशासकीय राजवटीत मोठ्या प्रकल्पांना मंजुरी दिल्याने बँकेतील ठेवी घटल्या असून, कर्जाचे प्रमाण लक्षणीय वाढले आहे. सद्यस्थितीत पालिकेची आर्थिक गणिते कर्जावर अवलंबून असल्याचे दिसून येत आहे:

जुने कर्ज : नाशिक फाटा दुमजली उड्डाणपुलासाठी जागतिक बँकेकडून घेतलेले १६० कोटींचे कर्ज अद्याप फेडले जात आहे.

म्युन्सिपल व ग्रीन बॉण्ड : मुळा नदी सुधार प्रकल्पासाठी २०० कोटी (म्युन्सिपल बॉण्ड) आणि हरित सेतू प्रकल्पासाठी २०० कोटी (ग्रीन बॉण्ड) कर्ज स्वरूपात उभारले आहेत.

नवीन प्रस्ताव : मोशी रुग्णालयासाठी ५५० कोटींचे कर्ज घेण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे.

७ हजार कोटींच्या कर्जाचे नियोजन

शहराचा कायापालट करण्यासाठी पालिकेने आता अत्यंत महत्त्वाकांक्षी पाऊल उचलले असून, तब्बल ७ हजार कोटी रुपयांच्या कर्जाचा प्रस्ताव केंद्र सरकारच्या ‘अर्बन चॅलेंज फंडा’कडे पाठवला आहे. यामध्ये खालील प्रकल्पांचा समावेश आहे.

१. शहरभर अधिक क्षमतेची नवीन ड्रेनेजलाईन टाकणे.

२. जुन्या एसटीपी (सांडपाणी शुद्धीकरण केंद्र) ची क्षमता वाढवणे.

३. मोशी कचरा डेपोत दुसरा ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्प उभारणे.

४. कासारवाडीत सांडपाणी पुनर्वापर केंद्र आणि पवना बंद जलवाहिनी प्रकल्प पूर्ण करणे.

५. पवना, मुळा व इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पांना गती देणे.

प्रशासकीय राजवटीतील ‘हे’ मोठे प्रकल्प प्रगतीपथावर आहेत.

हे सुद्धा वाचा : कोल्हापूर महापौर पदावर इच्छुकांची संख्या वाढली; नाराजी दूर करण्यासाठी करावी लागणार कसरत

Web Title: Newly elected representatives of pimpri chinchwad municipal corporation will face a big challenge

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 23, 2026 | 05:58 PM

Topics:  

  • BJP
  • CM Devedra Fadnavis
  • PCMC News

संबंधित बातम्या

PCMC News : पिंपरी-चिंचवडच्या रस्त्यांवर सायकलिंगचा थरार; Pune Grand Tour 2026 चा अंतिम टप्पा पार
1

PCMC News : पिंपरी-चिंचवडच्या रस्त्यांवर सायकलिंगचा थरार; Pune Grand Tour 2026 चा अंतिम टप्पा पार

Eknath Shinde : ‘मराठी भाषा संवर्धनाची…’, बाळासाहेबांच्या जन्मशताब्दीनिमित्त एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा
2

Eknath Shinde : ‘मराठी भाषा संवर्धनाची…’, बाळासाहेबांच्या जन्मशताब्दीनिमित्त एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा

बदलापूरच्या घटनेवरुन काँग्रेस आक्रमक; हर्षवर्धन सपकाळांनी दिला गंभीर इशारा
3

बदलापूरच्या घटनेवरुन काँग्रेस आक्रमक; हर्षवर्धन सपकाळांनी दिला गंभीर इशारा

Sindhudurga News: देवगडमध्ये भाजपाच्यावतीने १८ उमेदवारी अर्ज; सिंधुदुर्ग जिल्ह्यात राजकारण तापले
4

Sindhudurga News: देवगडमध्ये भाजपाच्यावतीने १८ उमेदवारी अर्ज; सिंधुदुर्ग जिल्ह्यात राजकारण तापले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.