
माथेरानमध्ये भाजपचे संतोष शेलार उपनगराध्यक्षपदी बिनविरोध!
माथेरान गिरीस्थान नगरपरिषद मधील दोन स्वीकृत नगरसेवक निवडीसाठी उपजिल्हा अधिकारी प्रकाश संकपाळ यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक घेण्यात आली.त्या बैठकीला माथेरान शहराचे प्रथम नागरिक नगराध्यक्ष चंद्रकांत चौधरी,उप नगराध्यक्ष संतोष शेलार तसेच गटनेते शिवाजी शिंदे यांच्यासह नगरसेवक अनुसया ढेबे,केतन रामाणे, लता ढेबे, सीताराम कुंभार, रिजवाना शेख,गौरंग वाघेला,प्रतिभा, घावरे,कमल गायकवाड, सचिन दाभेकर,सुरेखा साळुंखे,सोहेल महापुले,अनिता रांजणे, किरण पेमारे,अर्चना भिलारे,ऐश्वर्या तोरणे,सुनील शिंदे, प्रियांका कदम,किशोर मोरे आदी सर्व सदस्य उपस्थित होते.सत्ताधारी शिवसेना शिंदे गट आणि भाजप यांच्याकडे 14 सदस्यांचे बळ असल्याने स्वीकृत सदस्यांच्या दोन्ही जागा सत्ताधारी गटाकडे राहणार असल्याने कोणत्या दोन कार्यकर्त्यांना संधी मिळणार? याबद्दल उत्सुकता होती.माथेरान मध्ये स्वीकृत सदस्यांच्या वर्णी बद्दल प्रचंड उत्सुकता निर्माण झाली होती आणि त्यामुळे कोण स्वीकृत नगरसेवक होणार? याची चर्चा सुरू होती.
अहिल्यानगरचे महापौरपद ओबीसी महिला प्रवर्गासाठी राखीव! ‘या’ 7 नावांची जोरदार चर्चा
सत्ताधारी शिवसेना भाजप युतीचे गटनेते शिवाजी शिंदे यांनी उपजिल्हाधिकारी प्रकाश संकपाळ यांच्याकडे पत्र सादर केले.त्यात माजी नगराध्यक्ष आणि शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख मनोज खेडकर यांना तसेच भारतीय जनता पक्षाचे शहर अध्यक्ष प्रवीण सकपाळ यांची नावे होती.या दोन्ही नावांची घोषणा माथेरान पालिकेचे स्वीकृत नगरसेवक म्हणून करण्यात येत असल्याची घोषणा प्रकाश संकपाळ यांनी केली.सभेला माथेरान नगरपरिषदेचे मुख्याधिकारी राहुल इंगळे उपस्थित होते.निवड झाल्यानंतर नवनिर्वाचित स्वीकृत नगरसेवक यांचे अभिनंदन करण्यासाठी भाजप जिल्हा माजी चिटणीस मंगेश म्हसकर यांच्यासह माजी उप नगराध्यक्ष चंद्रकांत जाधव, माजी नगरसेवक प्रकाश सुतार, शकील पटेल,संदीप शिंदे, प्रदीप घावरे,राजेश चौधरी,तसेच योगेश जाधव, अनिस शेख,सुहासिनी शिंदे,सुहासिनी दाभेकर,वर्षा शिंदे,स्मिता गायकवाड,विलास पाटील,वसंत कदम,अरविंद शेलार,आदी उपस्थित होते.
स्वीकृत नगरसेवक पदावर आपली वर्णी लागणार म्हणून दावेदार असलेले रत्नदीप प्रधान,ध्यानेश्वर बागडे,राकेश कोकळे,चंद्रकांत सुतार,विलास पाटील यांची नावे मागे राहिली.त्यामुळे जेष्ठ शिवसैनिक ज्ञानेश्वर बागडे यांनी शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र करीत असल्याचे पत्र समाज माध्यमांवर व्हायरल केले.तर अन्य इच्छुक हे नगरपरिषद कार्यालयाकडे फिरकले देखील नाहीत.
Maharashtra Politics: “… करार अंमलात आणला गेला नाही”; शायना एन.सी यांची ठाकरेंवर टीका