Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • ajit pawar plane crash |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raigad News: अलिबाग तालुक्यात निवडणूक रणसंग्राम! कुठे तिरंगी, कुठे चौरंगी लढत; राजकीय गणितं बदलणार

अलिबाग तालुक्यात रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची मुदत संपल्यानंतर अंतिम लढती स्पष्ट झाल्या आहेत. पंचायत समितीच्या १४ जागांसाठी एकूण ४३ उमेदवार निवडणूक लढवत आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jan 28, 2026 | 03:35 PM
Raigad News: अलिबाग तालुक्यात निवडणूक रणसंग्राम! कुठे तिरंगी, कुठे चौरंगी लढत; राजकीय गणितं बदलणार

Raigad News: अलिबाग तालुक्यात निवडणूक रणसंग्राम! कुठे तिरंगी, कुठे चौरंगी लढत; राजकीय गणितं बदलणार

Follow Us
Close
Follow Us:
  • 3 ठिकाणी तिरंगी तर 2 मतदारसंघात चौरंगी लढती रंगणार
  • अलिबाग तालुका निवडणूक तापली!
  • तिरंगी आणि चौरंगी लढतींमुळे राजकीय गणितं गुंतागुंतीची
अलिबाग: रायगड जिल्हा परीषद आणि पंचायत समिती निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस होता. मंगळवारी दुपारनंतर अलिबाग तालुक्यातील उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यानंतर लढतींचे चित्र समोर आले. यात जिल्हा परीषदेच्या सात पैकी दोन मतदार संघात सरळ, तीन मतदार संघात तिरंगी तर दोन मतदार संघात चौरंगी लढती होणार आहेत. अलिबाग तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सात जागांसाठी २१ उमेदवार रिंगणात उरले आहेत, तर पंचायत समितीच्या १४ जागांसाठी ४३ उमेदवार आपले भवितव्य आजमावत आहेत.

Ajit Pawar Death: पहाटेचा शपथविधी ते पक्षफूट… अजित पवारांच्या आयुष्यातील 5 निर्णायक क्षण

दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची वेळ होती. तोपर्यंत कोण अर्ज मागे घेतो याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. शिवसेना आणि भाजपमध्ये युती व्हावी अशी तालुक्यातील दोन्ही पक्षाच्या नेत्यांची इच्छा होती. यासाठी वरीष्ठ पातळीपासून स्थानिक पातळीवरदेखील शेवटपर्यंत चर्चा सुरू होती. प्रजासत्ताक दिनाच्या ध्वजारोहणासाठी आलेले मंत्री भरत गोगावले यांच्याशी देखील याबाबत चर्चा झाल्याचे समजते. परंतु या चर्चेला यश आले नाही. त्यामुळे युती फिसकटल्याचे पहायला मिळाले. (फोटो सौजन्य – AI Created) 

दोन्ही पक्षांकडून दावा, महायुतीमध्ये आली बाधा

रायगड जिल्ह्यात भाजप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये युती झाल्याचे सांगितले जात होते. परंतु अनेक जागांवर दोन्ही पक्षांनी दावा सांगितल्याने युतीमध्ये बाधा आली. अलिबागमध्ये शहापूर मतदार संघात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार समोरासमोर आहेत. तेथे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अमित नाईक यांच्यासमोर भाजपने सुप्रभात पाटील यांची उमेदवारी कायम ठेवली आहे. त्यामुळे अलिबाग तालुक्यात युती होवू शकली नाही.

Ajit Pawar Death: अजित पवारांनंतर राष्ट्रवादीची सूत्रं कोणाच्या हाती? पक्षाला नवा चेहरा मिळणार? तिढा सुटणार कसा?

एकूण २१ उमेदवार रिंगणात उरले

अलिबाग तालुक्यात जिल्हा परीषदेचे एकूण सात मतदार संघ आहेत. या सात जागांसाठी एकूण २१ उमेदवार रिंगणात उरले आहेत. त्यापैकी दोन मतदार संघात सरळ, तीन मतदार संघात तिरंगी आणि दोन मतदार संघात चौरंगी लढत होत आहे. चेंढरे मध्ये शेकाप विरूदध शिवसेना असा सरळ सामना आहे तर आवासमध्ये शिवसेना विरूदध काँग्रेस अशी लढत आहे. थळ कावीर आणि चौलमध्ये तिरंगी लढत होणार आहे. आंबेपूर आणि शहापूर मतदार संघात चौरंगी सामना रंगणार आहे.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Alibag taluka gears up for high voltage poll battle 3 triangular and 2 four cornered contests raigad news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 28, 2026 | 03:35 PM

Topics:  

  • Alibaug
  • NAVARASHTRA
  • raigad

संबंधित बातम्या

Alibaug: मतदान हा लोकशाहीचा कणा; मतदारांनी अधिकार बजावावेत – किशन जावळे
1

Alibaug: मतदान हा लोकशाहीचा कणा; मतदारांनी अधिकार बजावावेत – किशन जावळे

Raigad News: महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ! शेकाप-शिंदे गट मोट बांधण्याच्या चर्चा, युतीबाबत संभ्रम कायम
2

Raigad News: महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ! शेकाप-शिंदे गट मोट बांधण्याच्या चर्चा, युतीबाबत संभ्रम कायम

Panvel Municipal Corporation: राष्ट्रवादीचा गड कोसळला; पनवेल महापालिकेत फुलले कमळ आणि धनुष्यबाण
3

Panvel Municipal Corporation: राष्ट्रवादीचा गड कोसळला; पनवेल महापालिकेत फुलले कमळ आणि धनुष्यबाण

Raigad News: सत्ता बदलाची लाट! राष्ट्रवादीचा पराभव, महापालिकेत कमळ-धनुष्यबाणचा विजय
4

Raigad News: सत्ता बदलाची लाट! राष्ट्रवादीचा पराभव, महापालिकेत कमळ-धनुष्यबाणचा विजय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.