Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raigad News: उरणमधील द्रोणागिरी किल्ला मोजतोय शेवटची घटिका, उरलेसुरले अवशेष जपण्याची नागरिकांची मागणी

द्रोणागिरी पर्वतावर सुमारे बाराशे वर्षांपूर्वी बांधण्यात आलेला द्रोणागिरी किल्ला आपल्या इतिहासाच्या शेवटच्या घटका मोजत आहे. पुढच्या पिढीला इतिहास माहीत होण्यासाठी येथील उरलेसुरले अवशेष जपणं गरजेचं आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Dec 01, 2025 | 03:00 PM
Raigad News: उरणमधील द्रोणागिरी किल्ला मोजतोय शेवटची घटिका, उरलेसुरले अवशेष जपण्याची नागरिकांची मागणी

Raigad News: उरणमधील द्रोणागिरी किल्ला मोजतोय शेवटची घटिका, उरलेसुरले अवशेष जपण्याची नागरिकांची मागणी

Follow Us
Close
Follow Us:
  • द्रोणागिरी किल्ला शेवटची घटका मोजतोय
  • किल्ल्यावरील शिल्लक राहिलेल्या एकमेव वास्तूची पडझड
  • शिलाहर काळात हा किल्ला बांधला गेला
उरण तालुक्यातील द्रोणागिरी पर्वतावरील किल्ला आज शेवटची घटका मोजत आहे. तीन किलोमीटरपर्यंत विस्तार असलेल्या या किल्ल्यावर आज एकच वास्तू आपल्या इतिहासाची साक्ष देत उभी आहे. इतर वास्तू आणि किल्ला नामशेष झाला आहे. उरणकरांना आणि पुढच्या पिढ्यांना इतिहास माहीत होण्यासाठी येथील उरलेसुरले अवशेष जपले जावेत, अशी मागणी येथील नागरिक करत आहेत.

Kolhapur News : कोल्हापुरकरांना भरली हु़डहुडी, थंडीचा तडाखा वाढला; जिल्ह्यात पारा घसरला 16 अंशांवर

प्रभू राम आणि रावण यांच्यात झालेल्या युद्धात लक्ष्मणाला बाण लागून लक्ष्मण बेशुद्ध पडले. त्यांच्या उपाचारासाठी संजीवनी आणायला गेलेल्या हनुमंताने द्रोणागिरी पर्वतच उचलून आणल्याच्या कथा आपण ऐकत आलो आहोत. त्याच द्रोणागिरी पर्वताचा एक भाग उरणच्या भूमीत पडला आणि आज तो दिमाखात द्रोणागिरी पर्वत म्हणून उभा असल्याची धारणा येथील प्रत्येक माणसाच्या मनात आहे. याच द्रोणागिरी पर्वतावर सुमारे बाराशे वर्षांपूर्वी बांधण्यात आलेला द्रोणागिरी किल्ला आपल्या इतिहासाच्या शेवटच्या घटका मोजत आहे. (फोटो सौजन्य – instagram)

दुर्लक्षित इतिहास सुरक्षित करण्याची मागणी

१५३० ते १५३५ या काळात पोर्तुगीजांच्या अमलाखाली आलेल्या या किल्ल्यावर पोर्तुगीजांकडून बांधलेल्या काही इमारतीमधील आज एक इमारत निसर्ग आणि इतर परिस्थितीशी झुंज देत आपला इतिहास ओरडून सांगण्याचा प्रयत्न करत आहे. किल्ल्यावरील शिल्लक राहिलेल्या एकमेव वास्तूची देखील मोठ्या प्रमाणावर पडझड होत आहे. यामुळे येथील नागरिक या किल्ल्याचे उरलेले अवशेष यांच्याकडे शासनाने लक्ष केंद्रित करावे आणि उरणच्या इतिहासातील महत्त्वाचा पण दुर्लक्षित इतिहास सुरक्षित करावा, अशी मागणी करत आहेत.

आक्रमण रोखण्यामध्ये किल्ल्याची प्रमुख भूमिका

शिलाहर काळात हा किल्ला बांधला गेला असल्याच्या खुणा येथे सापडत आहेत. तर या किल्ल्यावर अनेक शासकांनी शासन केले असून अरबी समुद्रातून होणारे आक्रमण रोखण्यामध्ये किल्ल्याची प्रमुख भूमिका होती. अनेक बदल, युद्ध, रक्तपात आणि सत्ताबदल पाहिलेला हा किल्ला आज शासकीय अनास्था आणि दुर्लक्षपणामुळे संपूर्ण नष्ट झाला आहे.

Railway Mega Block : सीएसएमटी ते विद्याविहार लोकल प्रवास रखडणार! मध्य, हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक

द्रोणागिरी टेकर, दिनेश पाटील म्हणाले की, ८८ आम्ही फिटनेससाठी दररोज या किल्ल्यावर येत असतो. मात्र किल्ल्याची मोडकळीस आलेली वास्तु, तुटलेली तटबंदी, नष्ट होत असलेला इतिहास कुठेतरी जपला पाहिजे. आज हा किल्ला आणि त्याचा इतिहास जपण्याचे काम शासकीय स्तरावर होणे गरजेचे होते, मात्र तसे न झाल्याने एक ऐतिहासिक ठेवा इतिहासाच्या पानावरून नष्ट होणार आहे.

स्थानिक नागरिक, नरेश रहाळकर 66 हरणस्या इतिहोणागिरी पुढच्या पिढीला मार्गदर्शक आणि प्रेरणादायी व्हावा यासाठी प्रशासनाने याकडे लक्ष देऊन, या किल्ल्याची डागडुजी करावी. उरण तालुका मोठा आहे, तर तालुक्याचा इतिहासदेखील मोठा आहे. या इतिहासाची साक्षी देणाऱ्या अनेक वास्तूमधील ही वास्तू महत्त्वाची मानली जाते.

गडप्रेमी, रमेश पाटील म्हणाले की, येथे येणारा प्रत्येकजण इथली परिस्थिती पाहून नाराजी व्यक्त करत आहे. यामुळे येथील इतिहासाची जपणूक करण्यासाठी सरकारकडून पुढकार घेतला पाहिजे, वाच वास्तू भविष्यात आपल्या पराक्रमाचे धडे आणि इतिहासाची साक्षी नव्या पिढीला देणार आहेत.

Web Title: Citizens demand to preserve dronagiri fort in uran raigad news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 01, 2025 | 02:59 PM

Topics:  

  • Marathi News
  • raigad

संबंधित बातम्या

Kolhapur News : आरोग्यमंत्र्यांकडून झाडाझडती; ‘सीपीआर’मधील समाजसेवा अधिकाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह?
1

Kolhapur News : आरोग्यमंत्र्यांकडून झाडाझडती; ‘सीपीआर’मधील समाजसेवा अधिकाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह?

Raigad Accident: भीषण अपघात! रायगड सहलीसाठी निघालेल्या विद्यार्थिनींची मिनीबस पलटली; एकाची प्रकृती गंभीर
2

Raigad Accident: भीषण अपघात! रायगड सहलीसाठी निघालेल्या विद्यार्थिनींची मिनीबस पलटली; एकाची प्रकृती गंभीर

प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा ‘कैरी’चा दमदार ट्रेलर रिलीज, टर्न आणि ट्विस्टने वाढवली उत्सुकता
3

प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा ‘कैरी’चा दमदार ट्रेलर रिलीज, टर्न आणि ट्विस्टने वाढवली उत्सुकता

Latur News :  उदगीरनगर परिषदेसाठी चौरंगी लढत, काँग्रेसकडून प्रचाराला वेग
4

Latur News : उदगीरनगर परिषदेसाठी चौरंगी लढत, काँग्रेसकडून प्रचाराला वेग

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.