Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raigad News: महाडकरांना मोठा दिलासा! कोथिंबिरीची आवक वाढली, दर थेट १० रुपयांवर

काही महिन्यांपूर्वी ३० ते ५० रुपयांपर्यंत पोहोचलेली कोथिंबीर आता सर्वसामान्यांच्या आवाक्यात आली आहे. महाडच्या भाजी बाजारात आवक वाढल्याने कोथिंबिरीचे दर मोठ्या प्रमाणात घसरले असून ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 07, 2026 | 02:45 PM
Raigad News: महाडकरांना मोठा दिलासा! कोथिंबिरीची आवक वाढली, दर थेट १० रुपयांवर

Raigad News: महाडकरांना मोठा दिलासा! कोथिंबिरीची आवक वाढली, दर थेट १० रुपयांवर

Follow Us
Follow Us:
  • महाडच्या बाजारपेठेत कोथिंबिरीची आवक वाढल्याने दर थेट १० रुपयांपर्यंत घसरले आहेत.
  • काही ठिकाणी दर्जानुसार १० रुपयांना दोन गड्ड्यांचीही विक्री होत असून ग्राहकांकडून मोठी खरेदी केली जात आहे.
  • नव्या हंगामातील पीक बाजारात दाखल झाल्याने पुरवठा वाढला असून पुढील काही दिवस दर स्थिर राहण्याची शक्यता आहे.
महाड: “कोथिंबीर घ्या… ताजी ताजी कोथिंबीर !” अशा आरोळ्यांनी सध्या महाडची भाजी बाजारपेठ अक्षरशः दुमदुमून गेली आहे. काही महिन्यांपूर्वी चढ्या भावामुळे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेलेली कोथिंबीर आता मोठ्या प्रमाणावर बाजारात दाखल झाल्याने तिच्या दरात लक्षणीय घसरण झाली आहे. परिणामी, ३० ते ५० रुपयांना विकली जाणारी कोथिंबिरीची गड्डी आता अवघ्या १० रुपयांत उपलब्ध होत असून ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Raigad News: महाड नगरपरिषदेच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह; मुख्याधिकाऱ्यांच्या दालनातच CCTV बंद, देखभालीसाठी निविदाच नाही?

महाडच्या किरकोळ भाजी बाजाराची पाहणी केली असता, बहुतांश ठिकाणी ताजी, हिरवीगार कोथिंबीर दहा रुपयांना एक गड्डी या दराने विक्रीस उपलब्ध असल्याचे दिसून आले. काही ठिकाणी दर्जानुसार दहा रुपयांना दोन गड्ड्यांचीही विक्री होत असल्याने ग्राहकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. दर घसरल्याने कोथिंबिरीची विक्री वाढली असून विक्रेतेही “कोथिंबीर घ्या कोथिंबीर ताजी कोथिंबीर।” अशा मोठमोठ्याने आरोळ्या देत ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी चढाओढ करताना दिसत आहेत. बाजारपेठेत दिवसभर या हाका घुमत असल्याने भाजी बाजाराला एक वेगळीच रंगत आली आहे.

कोथिंबीर ही दैनंदिन स्वयंपाकातील अत्यावश्यक भाजी असल्याने दर कमी होताच ग्राहकांनीही खरेदीचा ओघ वाढविला आहे. गृहिणींसह हॉटेल व्यावसायिक आणि खानावळ चालकही आता अधिक प्रमाणात कोथिंबीर खरेदी करत असल्याचे चित्र आहे. विक्रेत्यांच्या मते, पुढील काही दिवस अशीच आवक कायम राहिल्यास कोथिंबिरीचे दर स्थिर राहण्याची शक्यता आहे.

नव्या हंगामातील पीक

भाजी विक्रेत्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मागील काही महिन्यांत राज्यातील उत्पादन घटल्यामुळे स्थानिक बाजारपेठा मोठ्या प्रमाणावर परराज्यातून येणाऱ्या कोथिंबिरीवर अवलंबून होत्या. वाहतूक खर्च, मर्यादित आवक आणि मागणीच्या तुलनेत कमी पुरवठा यामुळे कोथिंबिरीचे दर तीस ते पन्नास रुपयापर्यंत पोहोचले होते. मात्र आता राज्यातील विविध भागांत नव्या हंगामातील पीक बाजारात येऊ लागल्याने आवक लक्षणीय वाढली आहे. त्यामुळे बाजारातील पुरवठा वाढून दरात मोठी घसरण झाली आहे.

कोल्हापूरकरांचे स्वप्न साकार! शहरात उभारणार आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम; मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत सामंजस्य करार

ग्राहकांच्या चेहऱ्यावर समाधान झळकले

काही महिन्यांपूर्वी ‘हिरवे सोने’ ठरलेली कोथिंबीर आता पुन्हा सर्वसामान्यांच्या आवाक्यात आली असून, महाडच्या बाजारपेठेत घसरलेल्या दरामुळे ग्राहकांच्या चेहऱ्यावर समाधान आणि विक्रेत्यांच्या आवाजात पुन्हा एकदा उत्साह परतल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

Web Title: Coriander prices drop sharply as fresh supply rises bunch available for just rs 10

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 07, 2026 | 02:45 PM

Topics:  

  • Marathi News
  • NAVARASHTRA
  • raigad

संबंधित बातम्या

Iran Airlines : आता हवेत विमान उडवून दाखवाच ;अमेरिकेचा इराणला इशारा
1

Iran Airlines : आता हवेत विमान उडवून दाखवाच ;अमेरिकेचा इराणला इशारा

US Flights : अमेरिकेत विमानसेवा कोलमडली; हजारो फ्लाइट्स रखडल्या,1,000 हून अधिक रद्द
2

US Flights : अमेरिकेत विमानसेवा कोलमडली; हजारो फ्लाइट्स रखडल्या,1,000 हून अधिक रद्द

Jamui Molestation Case: जमुई विनयभंग प्रकरणातील दोन आरोपींचे एन्कांऊटंर; पोलिसांच्या चकमकीत नेमकं काय घडलं?
3

Jamui Molestation Case: जमुई विनयभंग प्रकरणातील दोन आरोपींचे एन्कांऊटंर; पोलिसांच्या चकमकीत नेमकं काय घडलं?

Virar: वसई-विरारच्या विकासावर मुंबईत बैठक! अतिरिक्त FSI प्रकरणी चौकशीचे आदेश
4

Virar: वसई-विरारच्या विकासावर मुंबईत बैठक! अतिरिक्त FSI प्रकरणी चौकशीचे आदेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.