Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raigad News: सर आली धावून रस्ता गेला वाहून; पावसाला सुरुवात होत नाही तोच गावातील रस्ता वाहतुकीस बंद

पावसाला सुरुवात होत नाही तेच कर्जत तालुक्यातील छोट्या गावांना जोडणारा वाहून गेल्याचं समोर आलं आहे. डांबरी करण केलेल्या रस्त्याची पावसाच्या सुरुवातीस झालेली दैना पाहून गावकरी आक्रमक झाले आहेत.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Jun 04, 2025 | 02:36 PM
Raigad News: सर आली धावून रस्ता गेला वाहून; पावसाला सुरुवात होत नाही तोच गावातील रस्ता वाहतुकीस बंद
Follow Us
Close
Follow Us:

कर्जत/संतोष पेरणे:   तालुक्यातील दुर्गम भागात डोंगरावर असलेल्या तुंगी गावाकडे जाणारा रस्ता पुन्हा एकदा वाहतुकीस बंद झाला आहे.पावसाने अनेक ठिकाणी रस्त्यावरील डांबर वाहून गेले आहे.सर आली आणि रस्ता वाहून गेला असे म्हणण्याची वेळ स्थानिक ग्रामस्थांवर आली आहे. दरम्यान,सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यांची तत्काळ दुरुस्ती करावी अशी सूचना आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने केली आहे.

तुंगी या गावाला 2023पर्यंत रस्ता नव्हता आणि डोंगरावर असलेल्या गावात रस्ता नेण्यासाठी वन जमिनीचे प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर रस्ता बनला होता.मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रयत्नांतून वन जमिनीची परवानगी आणली आणि त्यानंतर डोंगर फोडून रस्ता बनविण्यात आला.त्यावेळी खासदार श्रीरंग बारणे हे या गावात पोहचलेले पहिले वाहून घेऊन जाणारे पहिले खासदार आणि पहिले व्यक्ती ठरले होते.तुंगी या दुर्गम भागात खासदार बारणे यांच्या प्रयत्नांतून रस्ता गेला आणि त्यानंतर कर्जत चे आमदार महेंद्र थोरवे यांच्याकडून डोंगर पाडा ते तुंगी या रस्त्यावर डांबरीकरण करण्यात आले.२०२४ मध्ये मार्च एप्रिल या दरम्यान डांबरीकरण करण्यात आले आणि त्यानंतर वाहने जाऊ लागली पण पहिल्याच पावसात रस्त्याचे मोठे नुकसान झाल्याने रस्त्यावरील वाहतूक बंद झाली.त्यानंतर नोव्हेंबर 2024मध्ये तुंगी गावाकडे जाणारा रस्ता पुन्हा बनविण्यात आला.मात्र हाच रस्ता 25-26 मे रोजी झालेल्या अवकाळी आणि पूर्व मान्सूनच्या पावसाळात अनेक भागात वाहून गेला आहे.

एखाद्या गावाला जोडणारा रस्ता वाहतुकीस बंद झाला असल्याने आता आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणा यांच्याकडून तुंगी गावातील रस्त्याची दुरुस्ती करण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाला करण्यात आली आहे.डोंगर फोडून बनवलेल्या रस्त्याला बहुसंख्य ठिकाणी मजबूत गटारे बांधण्यात आलेली नाही.रस्ता बनविताना केवळ रस्त्याच्या बाजूने पावसाचे पाणी वाहून जावे यासाठी जेसीबी मशीन ने साधे गटार बनविले होते.मात्र डोंगरातून वाहून येणारे पाणी हे डोंगरातील माती दगड घेऊन रस्त्यावर येत असल्याने रस्ता वाहतुकीस बंद झाला आहे.त्यात 26मे नंतर आता वाहने घेऊन प्रवास करणे कठीण होऊन गेले आहे.त्यामुळे तुंगी ग्रामस्थांच हाल होऊ लागले आहेत.रस्त्यावरून होणारी वाहतूक बंद झाल्याने पावसाळ्यातील चार महिने या कालावधीत वाहने नेता येणार नसल्याने ग्रामस्थांचे रस्त्याअभावी हाल होणार आहेत.

डॉ धनंजय जाधव.. तहसीलदार आणि प्रमुख आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणा
आम्हाला तुंगी गावाकडे जाणारा रस्ता अनेक ठिकाणी वाहून गेला असल्याची माहिती आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणा यांना झाला आहे.त्यानंतर आम्ही सार्वजनिक बांधकाम विभागाला त्या रस्त्याची पाहणी आणि शक्य असल्यास जलदगतीने दुरुस्ती करण्याची सूचना केली आहे.

Web Title: Early rains have caused a village road in karjat to become impassable the road in karjat taluka is closed to traffic

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 04, 2025 | 02:36 PM

Topics:  

  • Heavy Rain
  • Karjat
  • raigad

संबंधित बातम्या

Raigad News: राजकारण तापलं! विकासकामांचे आयते श्रेय घेऊ नका; शिंदे गटाच्या आमदारांचा इशारा
1

Raigad News: राजकारण तापलं! विकासकामांचे आयते श्रेय घेऊ नका; शिंदे गटाच्या आमदारांचा इशारा

Raigad : अंगारकी चतुर्थीच्या निमित्ताने मुगवलीच्या स्वयंभू गणपती मंदिरात भाविकांची मोठी गर्दी
2

Raigad : अंगारकी चतुर्थीच्या निमित्ताने मुगवलीच्या स्वयंभू गणपती मंदिरात भाविकांची मोठी गर्दी

Raigad News: राजकारणात मोठा ट्विस्ट! जिल्हा परिषद निवडणूक मित्रपक्षांसोबतच लढवणार, सुनील तटकरेंची मोठी घोषणा
3

Raigad News: राजकारणात मोठा ट्विस्ट! जिल्हा परिषद निवडणूक मित्रपक्षांसोबतच लढवणार, सुनील तटकरेंची मोठी घोषणा

Raigad News: कोकणात वाढला थंडीचा जोर, तज्ज्ञांनी सांगितली हवामान बदलाची कारणं
4

Raigad News: कोकणात वाढला थंडीचा जोर, तज्ज्ञांनी सांगितली हवामान बदलाची कारणं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.