Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raigad News: राजकारणात मोठा ट्विस्ट! जिल्हा परिषद निवडणूक मित्रपक्षांसोबतच लढवणार, सुनील तटकरेंची मोठी घोषणा

मुरुड तालुक्यातील सावली ग्रामपंचायत हद्दीमधील खामदे ग्रामस्थांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला आहे. जिल्हा परिषद निवडणुकीत सर्वात जास्तीचे मतदान व्हावे, अशी अपेक्षा खासदार सुनील तटकरे यांनी व्यक्

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jan 06, 2026 | 03:02 PM
Raigad News: राजकारणात मोठा ट्विस्ट! जिल्हा परिषद निवडणूक मित्रपक्षांसोबतच लढवणार, सुनील तटकरेंची मोठी घोषणा

Raigad News: राजकारणात मोठा ट्विस्ट! जिल्हा परिषद निवडणूक मित्रपक्षांसोबतच लढवणार, सुनील तटकरेंची मोठी घोषणा

Follow Us
Close
Follow Us:
  • जिल्हा परिषद रणधुमाळीला सुरुवात!
  • सुनील तटकरेंची स्पष्ट भूमिका
  • स्थानिक राजकारणात खळबळ!
मुरुड जंजिरा: नुकतीच नगरपरिषद निवडणूक संपन्न झाली असून संपूर्ण रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडे सर्वात जास्त नगरपरिषद ताब्यात आली असून मित्रपक्षांच्या सहकार्याने हे अद्भुतपूर्व यश प्राप्त झाले आहे. आगामी होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मित्र पक्षांना घेऊनच निवडणूक लढणार असून संपूर्ण रायगड जिल्ह्यात सर्वाधिक जिल्हा परिषद सदस्य निवडून आणणार असल्याचे प्रतिपादन रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी केले आहे.

Raigad News: कोकणात वाढला थंडीचा जोर, तज्ज्ञांनी सांगितली हवामान बदलाची कारणं

मुरुड तालुक्यातील सावली ग्रामपंचायत हद्दीमधील खामदे ग्रामस्थांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला आहे. याप्रसंगी खासदार तटकरे हे स्वतः उपस्थित होते. सर्व ग्रामस्थांचे त्यांनी यावेळी पक्षात स्वागत केले आहे. यावेळी खासदार सुनील तटकरे आपल्या भाषणात म्हणाले की, “लोकप्रतिनिधीने दबाव तंत्र व जखडून ठेवण्याचे काम कधी करू नये, लोक स्वतंत्र असून ते आपला अधिकार सजगपणे बजावत असल्यामुळेच लोकशाही जिवंत आहे. खामदे व मिठागर गावाला समाज मंदिर व पाणीपुरवठा लाईन लवकरच देण्यात येईल. खासदारकी निवडणुकीत मला सावली ग्रामपंचायतने मोठे मताधिक्य दिले आहे. त्याचप्रमाणे जिल्हा परिषद निवडणुकीत सर्वात जास्तीचे मतदान व्हावे, अशी अपेक्षा यावेळी त्यांनी व्यक्त केली. (फोटो सौजन्य – facebook) 

आगामी काळात दिघी पोर्टमध्ये स्थानिक लोकांना रोजगार याला प्रथम प्राधान्य देणार आहोत. दिघी पोर्टमध्ये आवश्यक नोकरी मिळण्यासाठी त्याला आवश्यक असणारे पूर्व कोर्स टाटा सेन्टर तर्फे दिले जाणार आहेत. त्यामुळे येथील स्थानिक लोकांना रोजगार मिळण्यास महत्वपूर्ण मदत होणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा केल्यामुळे आगरदांडा ते इंदापूर रस्त्याचे काँक्रिटीकरण माझ्या पाठपुराव्यामुळे झाले आहे, असेही यावेळी सुनील तटकरेंनी सांगितले.

Santosh Dhuri Joins BJP: महानगरपालिका निवडणुकीपूर्वी मनसेला मोठा धक्का, मुंबईतील कट्टर मनसैनिकाने सोडली साथ

यावेळी व्यासपीठावर जिल्हा उपाध्यक्ष मंगेश दांडेकर, मुरुड तालुका अध्यक्ष फैरोज घलटे, मुरुड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेरमन मनोज भगत, नगराध्यक्षा आराधना दांडेकर, माजी सभापती अशीका ठाकूर, स्मिता खेडेकर, माजी जिल्हा परिषद सदस्य सुबोध महाडिक, माजी सरपंच अजित कासार, मिठागर गाव प्रमुख सुनील मिसाळ, माजी जिल्हा परिषद सदस्य नम्रता कासार, हसमुख जैन उपस्थित होते.

अलिबाग पार्सल काही दिवसांत रिटर्न जाणार !

खाजणी-रोहा या रस्त्याचे काँक्रिटीकरण होणार असे सांगितले. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष मंगेश दांडेकर यांनी सांगितलं की, तेलवडे ते शीघ्ने रस्त्यावर वीज खांबे लावून स्वतःचे फोटो लावण्याची परंपरा सुरु आहे. प्रशासकीय कामे ही होतच असतात. समाज मंदिर बांधण्यासाठी शासनाचा निधी खर्च होत असतो. मुरुड तालुक्यातील जनता अलिबाग पार्सल सहन करणार नाही. थोड्याच दिवसात हे पार्सल अलिबाग मध्ये गेलेले दिसून येईल. यापुढे दादागिरी खपवून घेतली जाणार नाही. आमचा नेता सुसंकृत असून जशाच तशे उत्तर दिले जाईल, असा इशारा दांडेकरांनी दिला.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Zilla parishad elections to be fought along with ally parties big announcement by sunil tatkare raigad news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 06, 2026 | 03:02 PM

Topics:  

  • raigad
  • sunil tatkare

संबंधित बातम्या

Raigad News: राजकारण तापलं! विकासकामांचे आयते श्रेय घेऊ नका; शिंदे गटाच्या आमदारांचा इशारा
1

Raigad News: राजकारण तापलं! विकासकामांचे आयते श्रेय घेऊ नका; शिंदे गटाच्या आमदारांचा इशारा

Raigad News : “…हाच आमचा श्वास”; मतदारसंघात शाश्वत विकास करण्याबाबत सुनील तटकरेंचे मोठे विधान
2

Raigad News : “…हाच आमचा श्वास”; मतदारसंघात शाश्वत विकास करण्याबाबत सुनील तटकरेंचे मोठे विधान

Raigad : अंगारकी चतुर्थीच्या निमित्ताने मुगवलीच्या स्वयंभू गणपती मंदिरात भाविकांची मोठी गर्दी
3

Raigad : अंगारकी चतुर्थीच्या निमित्ताने मुगवलीच्या स्वयंभू गणपती मंदिरात भाविकांची मोठी गर्दी

Raigad News: कोकणात वाढला थंडीचा जोर, तज्ज्ञांनी सांगितली हवामान बदलाची कारणं
4

Raigad News: कोकणात वाढला थंडीचा जोर, तज्ज्ञांनी सांगितली हवामान बदलाची कारणं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.