म्हसळा,रायगड : लोकसभा आणि राज्यात विधानसभा निवडणूका पार पडल्या तेव्हा रायगड जिल्हयातील विचारवंत जनतेने व कार्यकर्त्यांनी मेहनत करून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांना निवडून आणत पक्षाला मोठा दिलासा दिला. कार्यकर्त्यांच्या या कष्टाचे कौतुक करावे आणि धन्यवाद मानावे तेवढे कमीच आहेत. नंतरच्या काळात विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेने युतीच्या माध्यमातुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला घवघवीत यश मिळाले आणि पक्ष केंद्रात व राज्यात सत्तेत आला.
असंं असलं तरी प्रत्यक्षात पक्ष नेतृत्व,उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, प्रदेश अध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी सत्तेत न राहता पक्ष संघटना मजबुत करण्यासाठी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कार्यकर्त्यांना त्या त्या ठिकाणी लोकप्रतिनिधित्व मिळण्यासाठी पक्षाची ताकद आणि बांधणी करण्याकडे लक्ष दिले . असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस ओ.बी.सी.विभाग प्रदेशअध्यक्ष कल्याण आखाडे यांनी माणगाव येथे पदाधिकारी संपर्क अभियान सभेत केलं आहे.
रायगड जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष केकाने,ओबीसी सेल जिल्हा अध्यक्ष बबन मनवे यांनी आयोजीत केलेल्या रायगड जिल्हा संपर्क अभियान सभेला प्रदेश अध्यक्ष कल्याण आखाडे यांच्या समावेत प्रदेश कार्याध्यक्ष सचिन आवटे,पक्षाचे ज्येष्ठ नेते सुरेश मगर,शिवराम शिंदे,तळा तालुका नगराध्यक्ष चंद्रकांत रोडे,माजी सभापती प्रकाश लाड,माणगाव तालुका अध्यक्ष काका नवगणे,सरचिटणीस राजेंद्र शिर्के आदी मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.
या वेळी प्रदेश अध्यक्ष यांनी ओबीसी समाज प्रवर्गात समाविष्ट आसलेल्या सर्व जातधर्माच्या,बारा बलुतेदार यांना पक्ष संघटनेत सामील करून नव्याने जिल्हा व 15 तालुक्यांत ओबिसी पक्ष कार्यकारणीची निवड करावी असे जिल्हा अध्यक्ष बबन मनवे यांना सुचित केले.पक्षाचा ओबीसी विभाग प्रदेश अध्यक्ष झाल्या पासुन मागील 15 महिन्यात महाराष्ट्रात पदाधिकारी संपर्क अभियानात पक्ष बळकट करण्यासाठीचे काम हाती घेतले आहे आता आपल्याला राज्यभर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची वज्रमुठ बांधायची आहे असे आवाहन केले.तालुक्यात विद्यार्थी,डॉक्टर,वकील,प्राध्यापक,वाहतूक आदी सर्व प्रकारचे सेलची स्थापना करून त्यांना यात सामावेश करण्यात येणार आहे.
आखाडे पुढे बोलताना आपण रायगडचे खासदार,पक्षाचे प्रदेश अध्यक्ष सुनिल तटकरे यांचा खंदा समर्थक कार्यकर्ता असल्याचे ओबीसी प्रदेश अध्यक्ष कल्याण आखाडे यांनी सांगितले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा अध्यक्ष बबन मनवे यांनी करताना आपणास ओबिसी सेलचे माध्यमातुन पक्ष संघटनेत जिल्हा स्तरावर काम करण्याची संधी देण्यात आली त्या बद्दल पक्ष नेतृत्वाचे आभार मानले.जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष केकाणे यांनी विधानसभा निवडणुकी पुर्वी सरकारने सामाजिक महामंडळ स्थापन केली आहेत.
त्या ठिकाणी समाजातील पक्ष पदाधिकारी यांना काम करण्याची संधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली.जेष्ठ नेते सुरेश मगर यांनी रायगड जिल्हयात बहुसंख्येने कुणबी समाज लोकवस्ती आहे परंतु शासकिय योजनांचा लाभ घेण्यासाठी समजाला 1965 चा पुराव्याची अट असते.अनेकांना यात कुणबी समाजाचा असुनही ओबीसी दाखला मिळण्यासाठी अडचण येते त्या बाबत ठोस उपाय योजना करण्यात यावी अशी मागणी केली.
प्रदेश कार्याध्यक्ष सचिन आवटे यांनी कोकण रेल्वेची आठवण करून देताना कोकणी माणस खुप विचारवंत आसुन आमच्या अहिल्या नगरचे तज्ञ डॉ.मधु दंडवते यांना तब्बल पाच वेळा लोकसभेत प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली आणि कोकण रेल्वेचा स्वप्न साकार झाला यात ओबोसी समजाने मोठा वाटा उचलला असल्याचे त्यांनी कौतुक करताना त्याच धर्तीवर आता खासदार सुनिल तटकरे नेतृत्व करत असल्याचे त्यांनी आवर्जुन उल्लेख केला.
अभियानात तळा तालुका नगराध्यक्ष चंद्रकांत रोडे यांनी पक्ष तालुका स्तरावर वेगवेगळ्या क्षेत्रात सेलची स्थापना करून नवीन नेतृत्व तयार करत असल्याचे निदर्शनास आणून दिले.संपर्क अभियानाचे सूत्रसंचलन राजेंद्र शिर्के यांनी तर सभेला उपस्थित सर्व मान्यवर कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांचे आभार माणगाव तालुका माजी सभापती प्रकाश लाड यांनी मानले.स्वागत जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष केकाणे, ओबीसी विभाग जिल्हा अध्यक्ष तथा माजी सभापती बबन मनवे यांनी मानले.