Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Purandar News: पुरंदरमध्ये सभापती राष्ट्रवादीचे अमित झेंडे तर…; राजकीय गणिते काय?

राष्ट्रवादी आणि भाजपच्या चर्चा सुरु होण्यापूर्वी आमदार विजय शिवतारे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसला बिनशर्त पाठींबा जाहीर केला. त्यामुळे सत्तेची समीकरणे बदलली. त्यानुसार राष्ट्रवादी आणि शिवसेना अशी युती अस्तित्वात आली

  • By तेजस भागवत
Updated On: Mar 10, 2026 | 02:35 AM
Purandar News: पुरंदरमध्ये सभापती राष्ट्रवादीचे अमित झेंडे तर...; राजकीय गणिते काय?

Purandar News: पुरंदरमध्ये सभापती राष्ट्रवादीचे अमित झेंडे तर...; राजकीय गणिते काय?

Follow Us
Follow Us:

 सभापतीपदी राष्ट्रवादीचे अमित झेंडे
उपसभापतीपदी शिवसेनेचे प्रविण जगताप
प्रवीण जगताप यांची सहा विरुद्ध दोन अशा मतांनी निवड

सासवड: पुरंदर तालुका पंचायत समिती सभापतीपदी राष्ट्रवादीचे अमित भाऊसाहेब झेंडे यांची तर उपसभापतीपदी शिवसेनेचे प्रवीण बाळासाहेब जगताप यांची सहा विरुद्ध दोन अशा मतांनी निवड झाली.  दरम्यान निवड झाल्यानंतर राष्ट्रवादी व शिवसेना पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांनी दोन्ही नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.

पुरंदर तालुका पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादीला आठ पैकी चार जागांवर विजय मिळाला होता. दोन जागा शिवसेनेला तर दोन जागांवर भाजपला विजय मिळाला होता. आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रवादी भाजपला सत्तेचे निमंत्रण देवू शकते असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता.

मात्र राष्ट्रवादी आणि भाजपच्या चर्चा सुरु होण्यापूर्वी आमदार विजय शिवतारे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसला बिनशर्त पाठींबा जाहीर केला. त्यामुळे सत्तेची समीकरणे बदलली. त्यानुसार राष्ट्रवादी आणि शिवसेना अशी युती अस्तित्वात आली. युतीच्या फॉर्मूल्यानुसार सभापती पदासाठी राष्ट्रवादीचे अमित झंडे यांनी तर उपसभापती पदासाठी शिवसेनेचे प्रवीण जगताप यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. तसेच निवडणूक बिनविरोध होईल असे वाटत असताना भाजपच्या दोन सदस्यांपैकी सायली शिंदे यांनी सभापतीपद तर माऊली यादव यांनी उपसभापती पदासाठी आपले अर्ज दाखल केले. त्यामुळे निवडणूक प्रक्रिया घेण्यात आली.

पुरंदरला मल्टीस्पेशालिटी शासकीय हॉस्पिटलची उभारणी करावी; आमदार विजय शिवतारे यांची मागणी

सभापती अमित झेंडे आणि उपसभापती प्रवीण जगताप यांना युतीची प्रत्येकी सहा मते मिळाली तसेच विरोधी भाजपचे सभापतीपदाचे उमेदवार सायली शिंदे आणि उपसभापती पदाचे उमेदवार माऊली यादव यांना त्यांचीच दोन मते मिळाली. त्यामुळे सहा विरुद्ध दोन अशा राष्ट्रवादीचे मतांनी अमित झेंडे आणि शिवसेनेचे प्रवीण जगताप निवडून आल्याने पीठासीन अधिकारी तथा प्रांताधिकारी वर्षा लांडगे यांनी जाहीर केले. गटविकास अधिकारी प्रणोती श्रीश्रीमाळ यांनी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कामकाज पाहिले.

राजकीय घडामोडींना वेग; पुरंदर पंचायत समितीवर फडकणार राष्ट्रवादीचाच झेंडा

दरम्यान नवनिर्वाचित सभापती अमित झेंडे आणि उपसभापती प्रवीण जगताप यांचे युतीच्या वतीने अभिनंदन करून शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी राष्ट्रवादीचे नेते जालिंदर कामठे, माजी आमदार संभाजी कुंजीर, जेष्ठ नेते विजयराव कोलते, जिल्हा बँकेचे चेअरमन डॉ. दिगंबर दुर्गाडे, तालुकाध्यक्ष उत्तम धुमाळ, शरद जगताप, गौरी कुंजीर, वामन जगताप, बाळासाहेब भिंताडे, विराज काकडे, संतोष कुंभारकर, शिवसेनेचे उमेश गायकवाड, मंदार गिरमे, जिल्हा परिषदेच्या सदस्या रुपाली झेंडे, प्राजक्ता दुर्गाडे, पंचायत समितीचे सदस्य माणिक निंबाळकर, अर्चना कटके, स्मिता निगडे, मोनिका कांबळे आदी उपस्थित होते.

Web Title: Ncp amit zende selected sabhapati for purandar panchayat samiri

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 10, 2026 | 02:35 AM

Topics:  

  • Maharashtra Politics
  • Nationalist Congress Party
  • Purandar
  • shivsena

संबंधित बातम्या

NCP President Appointment:सुनील तटकरेंचे प्रदेशाध्यक्षपद धोक्यात; उच्च न्यायालयाचे निवडणूक आयोगाला महत्त्वाचे निर्देश
1

NCP President Appointment:सुनील तटकरेंचे प्रदेशाध्यक्षपद धोक्यात; उच्च न्यायालयाचे निवडणूक आयोगाला महत्त्वाचे निर्देश

Pune Politics: नगराध्यक्षांसह २८ नगरसेवकांची पदे धोक्यात? राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल, नेमकं काय आहे प्रकरण?
2

Pune Politics: नगराध्यक्षांसह २८ नगरसेवकांची पदे धोक्यात? राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल, नेमकं काय आहे प्रकरण?

Mumbai News : सातरस्ता BIT चाळ पुनर्विकासात नेमकं काय घडलं? 324 कुटुंबांचा प्रश्न ऐरणीवर, शिवसेनेने पालिकेत मांडला मुद्दा
3

Mumbai News : सातरस्ता BIT चाळ पुनर्विकासात नेमकं काय घडलं? 324 कुटुंबांचा प्रश्न ऐरणीवर, शिवसेनेने पालिकेत मांडला मुद्दा

Drought Affected: टीकेनंतर दुष्काळग्रस्तांसाठी एक कोटी; ‘मदत की डॅमेज कंट्रोल?’ वाढदिवसावरील टीकेनंतर पालिकेची तिजोरी उघडली
4

Drought Affected: टीकेनंतर दुष्काळग्रस्तांसाठी एक कोटी; ‘मदत की डॅमेज कंट्रोल?’ वाढदिवसावरील टीकेनंतर पालिकेची तिजोरी उघडली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.