Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Karjat News : कर माफीच्या अभय योजनेत मुदतवाढ करा ; शिवसेनेकडून मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

नगरपरिषदेच्या मालमत्ता करावरील अतिरिक्त मालमत्ता करमाफीच्या अभय योजनेसाठी दोन महिन्यांची मुदतवाढ देण्याची मागणी कर्जत शहर शिवसेना यांच्यावतीने करण्यात आली.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Oct 26, 2025 | 03:51 PM
Karjat News : कर माफीच्या अभय योजनेत मुदतवाढ करा ; शिवसेनेकडून मुख्याधिकाऱ्यांना निवेदन
Follow Us
Follow Us:
  • कर माफीच्या अभय योजनेत मुदतवाढ करा
  •  शिवसेनेतर्फे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन
  • दोन महिन्यांची मुदतवाढ देण्याची मागणी
 

कर्जत/संतोष पेरणे:  नगरपरिषदेच्या अतिरिक्त मालमत्ता कराबाबत नागरिकांना करमाफी देण्यात येणाऱ्या अभय योजनेत मुदतवाढ करा, असं निवेदन शिवसेनेतर्फे मुख्याधिकाऱ्यांना देण्यात आलं आहे. नगरपरिषदेच्या मालमत्ता करावरील अतिरिक्त मालमत्ता करमाफीच्या अभय योजनेसाठी दोन महिन्यांची मुदतवाढ देण्याची मागणी कर्जत शहर शिवसेना यांच्यावतीने करण्यात आली. शिवसेना पक्षाने शास्ती माफीसाठी पालिका मुख्याधिकारी यांना निवेदन देऊन मुदतवाढ दिल्याने अभय योजनेचा फायदा होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.

Matheran News : दिवाळीच्या सुट्टीत पर्यटकांची माथेरानला पसंती; मात्र ‘या’ कारणासाठी येणारे पर्यटक नाराज

कोरोना काळात नागरिकांचे उत्पन्नाचे साधन आणि स्रोत कोलमडल्याने अनेकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला. या काळात मोठ्या प्रमाणात मालमत्ताधारकांनी कर भरण्यात अडचणी येत असल्याने त्यांच्या थकबाकीची रक्कम वाढत गेली. त्यावर लागणाऱ्या दोन टक्के शास्तीमुळे अनेकांचे ओझे वाढले. या पार्श्वभूमीवर आमदार महेंद्र थोरवे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे शास्ती माफीची मागणी केली होती. या मागणीला शासनस्तरावर मान्यता मिळून शास्ती माफी योजना जाहीर करण्यात आली.शहरातील अनेक नागरिकांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक अर्ज भरता न आल्याने, वाढीव कालावधी देऊन सर्वसामान्यांना दिलासा द्यावा अशी मागणी करण्यात आली.

Karjat News : शिवप्रेमींसाठी पर्वणी; दिवाळीनिमित्ताने रायगड किल्ल्याचं भव्य प्रदर्शन

मात्र या योजनेची अंमलबजावणी सुरू असताना अनेक सण-उत्सवांमुळे तसेच कर्जत नगरपरिषदेने अर्ज भरण्याची अंतिम तारीख २३ ऑक्टोबर निश्चित केल्याने अनेकांना अर्ज सादर करता आले नाहीत. त्यामुळे योजनेचा लाभ घेण्याची संधी हुकल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे.या पार्श्वभूमीवर शिवसेनेतर्फे शहर प्रमुख अभिषेक सुर्वे यांच्या नेतृत्वाखाली मुख्याधिकारी तानाजी चव्हाण यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात अभय योजनेचा कालावधी वाढवून आणखी दोन महिने मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. वाढीव मुदतीमुळे अधिकाधिक नागरिकांना कर माफीचा लाभ घेता येईल आणि नगरपरिषदेच्याही कर वसुलीमध्ये वाढ होईल, असे मत शिवसेनेने व्यक्त केले आहे.

कर्जत शिवसेना शहर यांच्यावतीने शहर प्रमुख अभिषेक सुर्वे यांच्यासह संजय मोहिते, दिनेश कडू, सुदेश देवघरे, प्रदीप वायकर, संदेश मोरे, दर्शन वायकर, सौरभ केदारी आणि प्रसाद डेरवणकर उपस्थित होते. या निवेदनावर सकारात्मक निर्णय घेण्यासाठी शासनस्तरावर प्रस्ताव पाठविण्यात येईल, अशी खात्री मुख्याधिकारी तानाजी चव्हाण यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांना दिली.

Web Title: Extend the deadline for the tax waiver scheme shiv sena submits a statement to the chief minister

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 26, 2025 | 03:49 PM

Topics:  

  • Karjat
  • raigad
  • shivsena

संबंधित बातम्या

Raigad News: माणगावकरांच्या नळाला गढूळ पाणी! नागरिक नाराज, नगरपंचायतीकडून तातडीच्या सूचना
1

Raigad News: माणगावकरांच्या नळाला गढूळ पाणी! नागरिक नाराज, नगरपंचायतीकडून तातडीच्या सूचना

नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर! गढूळ-दूषित पाण्यावरून संताप; राष्ट्रवादी अन् शिंदे शिवसेनेचा प्रशासनाला अल्टिमेटम
2

नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर! गढूळ-दूषित पाण्यावरून संताप; राष्ट्रवादी अन् शिंदे शिवसेनेचा प्रशासनाला अल्टिमेटम

Raigad News: श्रीवर्धनमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीची चाहूल; गावागावांत राजकीय हालचालींना वेग
3

Raigad News: श्रीवर्धनमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीची चाहूल; गावागावांत राजकीय हालचालींना वेग

Raigad News: माथेरानच्या शार्लोट लेकचा गाळ पुन्हा चर्चेत; 1000 ट्रक गाळाच्या नोंदीवरून प्रश्नचिन्ह
4

Raigad News: माथेरानच्या शार्लोट लेकचा गाळ पुन्हा चर्चेत; 1000 ट्रक गाळाच्या नोंदीवरून प्रश्नचिन्ह

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.