Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raigad News: माणगावकरांच्या नळाला गढूळ पाणी! नागरिक नाराज, नगरपंचायतीकडून तातडीच्या सूचना

माणगाव नगरपंचायत हद्दीतील नागरिकांमध्ये सध्या नाराजी पाहायला मिळत आहे. कारण येथील नागरिकांना मातीमिश्रित गढूळ पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे पाणी गाळून आणि उकळून पिण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Sep 25, 2026 | 02:10 PM
Raigad News: माणगावकरांच्या नळाला गढूळ पाणी! नागरिक नाराज, नगरपंचायतीकडून तातडीच्या सूचना

Raigad News: माणगावकरांच्या नळाला गढूळ पाणी! नागरिक नाराज, नगरपंचायतीकडून तातडीच्या सूचना

Follow Us
Follow Us:
  • माणगाव नगरपंचायत हद्दीत काळनदीच्या पाण्याचा रंग बदलल्याने नागरिकांना मातीमिश्रित गढूळ पाणीपुरवठा होत आहे.
  • गढूळ पाण्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी असून, पाणी गाळून आणि उकळून पिण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
  • पाणीपुरवठा सभापती अजित तार्लेकर यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन शुद्धीकरण प्रक्रियेत अधिक दक्षता घेण्याच्या सूचना कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.
उतेखोल / माणगाव: माणगाव नगरपंचायत हद्दीतील नागरिकांना सध्या मातीमिश्रित गढूळ रंगाचे पाणीपुरवठा होत असल्याने माणगावकर महिलांसह नागरिकांमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे. या गढूळ पाण्याबाबत नगरपंचायतीकडून नागरिकांना माहिती अथवा दवंडी देण्यास विलंब झाल्यानेही नाराजी व्यक्त होत आहे.

Chandrapur News: चंद्रपुरात वाघाची दहशत! महिनाभरात 3 गुराख्यांचा बळी, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

याबाबत संबंधित पाणीपुरवठा कर्मचारीवर्गाकडून मिळालेल्या माहितीनुसार, सध्या काळनदी तसेच आजूबाजूच्या डोंगर परिसरात जोरदार पाऊस सुरू असल्याने काळनदीचे पाणी तांबडेलाल, चिखलमिश्रित झाले आहे. हे मातीमिश्रित पाणी जॅकवेलमधून उपसा पंपाद्वारे थेट उतेखोल येथील जलशुद्धीकरण केंद्रात आणले जाते. त्यानंतर तुरटी व टीसीएल पावडरचा योग्य वापर करून फिल्टरेशन प्लांटमधील टाक्यांद्वारे पाण्याची शुद्धीकरण प्रक्रिया केली जाते.  (फोटो सौजन्य – AI Created) 

सध्या अधूनमधून होणारा जोरदार पाऊस आणि त्यामुळे काळनदीच्या पाण्याचा बदललेला रंग यामुळे शुद्धीकरण प्रक्रिया करूनही काही वेळा नळाला गढूळ पाणी येत असल्याचे पाणीपुरवठा विभागाकडून सांगण्यात आले. त्यामुळे नागरिकांनी सध्या पाण्याचा साठा करून तो गाळून व उकळूनच पिण्यासाठी वापरावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

वेळापत्रकावर होतोय परिणाम

शुद्धीकरणानतर पाणी येथील तीन मोठ्या साठवण टाक्यांमध्ये आणले जाते. त्यानंतर नऊ पाइपलाइनद्वारे तीन पाळ्यामध्ये दिवसभर नळ कनेक्शनला पाणीपुरवठा केला जातो. माणगावकरांना दररोज जवळपास ३५ लाख लिटर पाण्याचा पुरवठा केला जात असल्याने अधूनमधून उद्भवणारे तांत्रिक अडथळे तसेच विजेचा खंडित किंवा कमी-जास्त दाबाचा पुरवठा यामुळे पाणीपुरवठ्याच्या वेळापत्रकावर परिणाम होतो.

या सर्व अडचणीवर मात करीत माणगावकरांना नियमित पाणीपुरवठा करण्याचे काम नगरपंचायतीच्या पाणीपुरवठा विभागाकडून सुरू आहे. विशेषतः पावसाळ्यात तसेच उन्हाळ्याच्या अखेरीस नदीच्या पाण्याच्या गुणवत्तेत होणाऱ्या बदलांमुळे नागरिकांना शुद्ध व स्वच्छ पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी कर्मचारीवर्गाला मोठी कसरत करावी लागते.

पाणीपुरवठा सभापतींकडून दखल : तातडीच्या सूचना

मातीमिश्रित गढूळ पाण्याच्या समस्येबाबत माणगाव नगरपंचायत पाणीपुरवठा सभापती अजित चंद्रकात तार्लेकर यांच्याशी संवाद साधला असता, त्यांनी संबंधित पाणीपुरवठा कर्मचारीवर्गाची नगरपंचायत कनिष्ठ अभियंता आकाश बुवा यांच्या उपस्थितीत उतेखोल जलशुद्धीकरण केंद्रात बुधवार दि. २३ सप्टेंबर रोजी तातडीची विशेष बैठक घेतली असल्याचे सांगितले.

Ravikant Tupkar : बँक निवडणुकीसाठी एकत्र येता, मग शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री दालनात एकत्र का बसत नाही?

या बैठकीत पाणीशुद्धीकरण प्रक्रियेत आवश्यक ती विशेष काळजी घेऊनच नागरिकांना पाणीपुरवठा करण्याच्या सूचना कर्मचारीवर्गाला देण्यात आल्या. तसेच कनिष्ठ अभियंता आकाश बुवा यांनी पाणीशुद्धीकरण प्रक्रियेदरम्यान येणाऱ्या अडचणी तातडीने दूर करण्यासाठी कर्मचारीवर्गाला आश्वस्त करून, शुद्धीकरण प्रक्रियेत अधिक दक्षता घेण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

Web Title: Mangaon muddy water supply to villagers kal river rainfall water purification updates

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 25, 2026 | 02:10 PM

Topics:  

  • Marathi News
  • NAVARASHTRA
  • raigad

संबंधित बातम्या

Nagpur News : रूफटॉप सोलरधारकांच्या बचतीवर नवा ‘चार्ज’
1

Nagpur News : रूफटॉप सोलरधारकांच्या बचतीवर नवा ‘चार्ज’

Chandrapur News: चिमूरच्या बोळधामध्ये नाली बांधकामाचा दर्जा संशयाच्या भोवऱ्यात; अभियंत्यांच्या पाहणीत त्रुटी उघड
2

Chandrapur News: चिमूरच्या बोळधामध्ये नाली बांधकामाचा दर्जा संशयाच्या भोवऱ्यात; अभियंत्यांच्या पाहणीत त्रुटी उघड

Breaking News : ट्रम्प-शी भेटीत तैवानचा मुद्दा पेटला; जिनपिंगांचा अमेरिकेला स्पष्ट संदेश!
3

Breaking News : ट्रम्प-शी भेटीत तैवानचा मुद्दा पेटला; जिनपिंगांचा अमेरिकेला स्पष्ट संदेश!

Amaravati News: मुख्यमंत्र्यांनी केली वाशिम जिल्ह्यातील नुकसानग्रस्त पीक परिस्थितीची पाहणी
4

Amaravati News: मुख्यमंत्र्यांनी केली वाशिम जिल्ह्यातील नुकसानग्रस्त पीक परिस्थितीची पाहणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.