Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Karjat News : माथेरानमध्ये मनमानी कारभार ; राज्य हेरिटेज समितीचे नियम धाब्यावर

माथेरानमधील अशा कोणत्याही हेरिटेज वास्तू यांची दुरुस्ती करण्यासाठी राज्य हेरिटेज समितीची परवानगी घ्यावी लागते.मात्र अशी कोणतीही परवानगी न घेता नगरपरिषद कार्यालयाची तोडफोड करून सुशोभित करण्याचे काम सुरु आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Feb 10, 2026 | 05:43 PM
Karjat News : माथेरानमध्ये मनमानी कारभार ; राज्य हेरिटेज समितीचे नियम धाब्यावर
Follow Us
Follow Us:
  • माथेरानमध्ये मनमानी कारभार
  • राज्य हेरिटेज समितीचे नियम धाब्यावर
माथेरान/ संतोष पेरणे : नगरपरिषदेचे 100 वर्षे जुने कार्यालय हे हेरिटेज वास्तू मध्ये समाविष्ट आहे.माथेरानमधील अशा कोणत्याही हेरिटेज वास्तू यांची तोडफोड आणि दुरुस्ती करण्यासाठी राज्य हेरिटेज समितीची परवानगी घ्यावी लागते.मात्र अशी कोणतीही परवानगी न घेता माथेरान नगरपरिषदेचे कार्यालयाची तोडफोड करून सुशोभित करण्याचे काम सुरू झाले आहे.दरम्यान,माथेरान गावातील कायदे बनविणाऱ्या आणि माथेरान हेरिटेज समितीचे सदस्य सचिव ज्या कार्यालयात बसतात, त्याच हेरिटेज वास्तू म्हणून नोंद असलेल्या कार्यालयाचे सुशोभीकरणाचे काम सुरू झाले आहे.याविरुद्ध माथेरान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष आणि विरोधी पक्ष गटनेते सीताराम कुंभार यांनी आवाज उठवला आहे.

माथेरान येथील 100 वर्षे जुने नगरपरिषद कार्यालय हेरिटेज वास्तू म्हणून नोंद असलेली वास्तू आहे.या वास्तूमध्ये माथेरान शहराचे नियोजन करणारे कार्यालय आहे.त्याचवेळी माथेरान हे ब्रिटिशांनी वसवलेले शहर असल्याने येथील असंख्य मालमत्ता या जुन्या असल्याने महाराष्ट्र सरकारने बनवलेल्या हेरिटेज समितीने माथेरान शहरातील अनेक बंगले आणि मालमत्ता यांना हेरिटेज वास्तू मध्ये समावेश केला होता.माथेरान नगरपरिषदेची इमारत देखील 100 वर्षे जुनी असल्याने ही इमारत हेरिटेज वास्तू मध्ये समाविष्ट केले आहे.आज त्याच कार्यालय असलेल्या इमारतीचे नूतनीकरण करण्यात येत आहे.मात्र या माथेरान नगरपरिषद कार्यालय इमारती नूतनीकरण करण्यासाठी हेरिटेज समितीची परवानगी घेणे आवश्यक आहे.मात्र त्या इमारतीचे नूतनीकरण करणे तोडफोड करणे ही कामे सध्या हेरिटेज कमिटीचे परवानगी विना सुरू असल्याची शक्यता आहे.

Raigad Zilla  Parishad: पनवेलमध्ये निवडणूक रणधुमाळी रंगली! ७५% झाले मतदान; उमेदवारांची वाढली धाकधूक 

हेरिटेज समितीचे परवानगी न घेता इमारतीचे सुरू असल्याची माहिती मिळताच माथेरान नगरपरिषद मधील विरोधी पक्षाचे गटनेते आणि माथेरान राष्ट्रवादी काँग्रेस शहर अध्यक्ष सीताराम कुंभार यांनी आवाज उठवला आहे.माथेरान नगरपरिषद कार्यालयाची वास्तू हेरिटेज दर्जा ‘अ’ मध्ये समाविष्ट आहे. सदर च्या हेरिटेज वास्तू मधील संपूर्ण कार्यालयाचे बाबतीत नगरपरिषद कार्यालयात भेटून माहिती मागितली होती.त्यात नूतनीकरण करण्यासाठी डी पी आर बनवले आहे काय?पालिका कार्यालयाचे स्थायी समिती आणि नियोजन समितीने कधी परवानगी दिली आहे?या नूतनीकरण कामाला तांत्रिक मान्यता देण्यात आली आहे काय आणि हेरिटेज समितीची परवानगी आहे काय?आणि मुख्य म्हणजे निधीची तरतूद कोणत्या आधारे दिली? अदाजपत्रक कोणी बनवले आणि त्याला मान्यता कधी देण्यात आली? असे प्रश्न उपस्थित केले आहेत.

सदर 121 वर्ष जुन्या असलेल्या ऐतिहासिक नगरपरिषद कार्यालयाच्या वास्तूचा नूतनीकरण करण्याचा परस्पर अधिकार हा मुख्याधिकारी तथा सदस्य सचिव माथेरान हेरिटेज समिती यांना नाही याची नोंद घ्यावी अशी सूचना केली आहे.त्यानुसार तरी वरील सर्व प्रशासकीय बाबींची आणि अटी शर्ती यांची पूर्तता करूनच आपण कार्यालयाचे नुतनीकरण करण्याचे नियमानुसार ठेकेदाराला कार्यादेश दिले असतील तर त्याची माहिती द्यावी तसेच या प्रस्तावाची कागदपत्रे मला विरोधीपक्ष गटनेता या नात्याने प्राप्त व्हावीत तोपर्यंत सदरचे चालू असलेले नूतनीकरणाचे काम तात्काळ थांबविण्यात यावे अशी मागणी सीताराम कुंभार यांनी केली आहे.

कर्जतमध्ये ‘परिवर्तन आघाडी’चा मोठा विजय! “खरी शिवसेना कोणती हे जनतेनेच दाखवले”; विजयानंतर नितीन सावंत यांचा विरोधकांना टोला!

 

Web Title: Karjat news arbitrary governance in matheran state heritage committee rules in disrepute

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 10, 2026 | 05:43 PM

Topics:  

  • karjat news
  • Raigad News

संबंधित बातम्या

उत्तरकाशीत महाराष्ट्रातील पर्यटक बेपत्ता; गोमुख ट्रेकदरम्यान १३० फूट खोल दरीत पडल्याची माहिती, SDRF सह विविध पथकांकडून शोध
1

उत्तरकाशीत महाराष्ट्रातील पर्यटक बेपत्ता; गोमुख ट्रेकदरम्यान १३० फूट खोल दरीत पडल्याची माहिती, SDRF सह विविध पथकांकडून शोध

Karjat News : नेरळमध्ये नागरी प्रश्नांसाठी गोरख शेप यांचे उपोषण; ग्रामस्थांसह राजकीय पक्षांचा वाढता पाठिंबा
2

Karjat News : नेरळमध्ये नागरी प्रश्नांसाठी गोरख शेप यांचे उपोषण; ग्रामस्थांसह राजकीय पक्षांचा वाढता पाठिंबा

Crime News: गणेशोत्सवात अवैध मद्यविक्रीला उत्पादन शुल्क विभागाचा दणका ; सात दिवसांत ४५ गुन्हे दाखल
3

Crime News: गणेशोत्सवात अवैध मद्यविक्रीला उत्पादन शुल्क विभागाचा दणका ; सात दिवसांत ४५ गुन्हे दाखल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.