Raigad News: राजकारण तापलं! विकासकामांचे आयते श्रेय घेऊ नका; शिंदे गटाच्या आमदारांचा इशारा
Hingoli Zilla Parishad Election: उमेदवाराचा पराभव करा अन ७१ लाख जिंका…; संतोष बांगरांचे ओपन चॅलेंज
चौल ग्रामपंचायत हद्दीत विकासकामांचा जोरदार धडाका शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांनी दिला असून १९.२७ कोटीच्या भरघोस निधीतून अनेक विकासकामे चौल ग्रामपंचायतीच्या सहा प्रभागामध्ये करण्यात येत आहे. या विकासकामांचा शुभारंभ चौल शितळादेवी येथे श्रीफळ वाढवून करण्यात आला. यावेळी विकास कामांचे श्रेय घेऊ नका असा स्पष्ट इशारा देवून तुम्ही आणलेल्या कामाचे जरूर स्वागत करू, असेही विरोधकांना आमदार महेंद्र दळवी यांनी सुनावले. जेष्ठ कार्यकर्ते नारायण मुंबईकर, सचिन राठळ, भाजपचे विश्वास जोशी, संकेत जोशी, सुदेश राउळ, सरपंच प्रफुल्ल मोरे, प्रशांत शेणवईकर, तसेच महिला विधानसभा संघटक, तनुजा मोरे, चौल महिला विभाग प्रमुख ज्योती मुंबईकर, सिध्देश शेवणईकर उपस्थित होते. (फोटो सौजन्य – YouTube)
प्रारंभी आमदार महेंद्र दळवी यांचे भव्य स्वागत सचिन राउळ व चौल शिवसेना शिंदे गटाचे वतीने करण्यात आले. यावेळी आमदार महेंद्र दळवी यांनी शितळामातेचा दर्शनाचा लाभ घेऊन नतमस्तक झाले. त्यानंतर शितळादेवी मातेच्या प्रांगणात उपस्थित मान्यवर व आमदार महेंद्र दळवी यांचे शुभहस्ते श्रीफळ वाढवून चौल ग्रामपंचायत हद्दीतील सहा प्रभागातील विविध विकासकामांचा शुभारंभकरण्यात आला.
चौल शितळादेवी मंदिराच्या प्रांगणात हा सोहळा संपन्न झाला. चौल जि. प. गटातील जिल्हा परिषदेचे शिवसेना शिंदे गटाचे संभाव्य उमेदवार सचिन राउळ यांच्या मागणीनुसार आमदार महेंद्र दळवी यांच्या प्रयत्नाने एमएमआरडी योजनेअंतर्गत १९.२७ कोटीचा भरघोस निधी चौल ग्रामपंचायतीच्या एकूण ६ प्रभागांमध्ये विकासकामांसाठी उपलब्ध करण्यात आला आहे.
चौल ग्रा.प. हद्दीतून आमदार निवडणूकीत चांगले मताधिक्य मिळाले. या प्रेमाखातर चौलमध्ये रस्ते, पाणी, गटारे आदी विविध विकासकामांसाठी भरघोस निधी उपलब्ध करून दिला. विकासकामांचे श्रेय घेवू नका, विरोधकांनी कामे आणावीत, त्याचे स्वागत केले जाईल.- महेंद्र दळवी, आमदार






