
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
झी मराठीवर प्रसारित होणाऱ्या मालिकांच्या वेळेमध्ये आगामी काळात बदलत होताना दिसणार आहे. कारण ‘शुभ श्रावणी’ ही नवीन मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या मालिकेची वेळ आणि तारीख देखील समोर आली आहे, मालिकेचा नवा प्रोमो प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. यामध्ये वेळ-तारखेबद्दल खुलासा झाला आहे. ‘शुभ श्रावणी’ सुरू झाल्यानंतर सध्या प्रसारित होणाऱ्या मालिकांचा वेळेत बदल होणार आहेत.
The Raja Saab रिलीज होण्याआधीच अडचणीत? थिएटरबाहेर प्रभाससाठी दिसली चाहत्यांची गर्दी; पाहा Video
‘शुभ श्रावणी’ या मालिकेतून अभिनेत्री वल्लरी विराज पुनरागमन करते आहे. यापूर्वी ती झी मराठीच्या गाजलेल्या ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत झळकली होती. तर या नव्या मालिकेच्या नायकाच्या भूमिकेत अभिनेता सुमित विजय झळकतो आहे. ‘शुभ श्रावणी’मधून झी मराठीवर हा नवा चेहरा झळकणार आहे. वल्लरी आणि सुमितसह अभिनेता लोकेश गुप्ते आणि अभिनेत्री आसावरी जोशी हे कलाकार देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. तसेच या मालिकेबद्दल अभिनेत्रीने आपले मत मांडले आहे.
मालिकेबद्दल बोलताना अभिनेत्री म्हणाली, ‘माझ्या नवीन मालिकेचं नाव ‘शुभ श्रावणी’ आहे आणि माझं नाव मालिकेत श्रावणी आहे. ती एक शिक्षणमंत्र्याची मुलगी आहे आणि म्हणून घरी प्रेमळ आपुलकीच वातावरण नसून कडक नियमबद्ध असं वातावरण आहे. श्रावणीला आई नाहीये, तिचे बाबा पण तिच्याशी बोलत नाहीत. श्रावणीकडे पैसे मालमत्ता भरपूर आहे, तिच्या वडिलांनी सुखसोयी म्ह्णून मोठा बंगला, गाडी, कपडालत्ता, नोकर… सगळ्या सुविधा तिच्यासाठी करून ठेवलेल्या आहेत. पण तिच्याकडे तिच्या बाबांचं प्रेमचं नाही. मुळात तिला माहिती पण नाही की का तिच्या बाबांनी लहानपणापासून तिच्याकडे बघितलं नाही. का ते तिच्याशी प्रेमाने बोलले नाहीत, का तिच्याशी ते असं तुटक वागतात? त्याच मूळ काय कारण आहे?’
‘बिग बॉस’ फेम Prince Narula ला झाली अटक? काय आहे Viral Video मागील सत्य?
अभिनेत्री पुढे मालिकेच्या पात्राबद्दल म्हणाली, ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिका संपल्यानंतरच मला खरंतर झी मराठीने सांगितलं होत कि तुझ्या सोबत परत काम करायला आम्हाला आवडेल, मी हि त्याक्षणाची वाट पाहत होते, आणि चार-पाच महिन्यानंतर मला कॉल आला, कि आम्हाला तुझ्या सोबत परत काम करायचंय, आमची ‘शुभ श्रावणी’ मालिका येतेय त्यात श्रावणी व्यक्तिरेखेची भूमिका तूच करायचीय अशी आमची इच्छा आहे आणि मला ते ऐकून खूपच आनंद झाला, नकार देण्याचा काही विषयच नव्हता, आणि अजिबात दुसरा तिसरा काहीच विचार न करता मी मालिका स्वीकारली.’