
माणगाव तर्फे वरेडी जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार राधिका ठाकरे यांच्या प्रचाराचा शुभारंभ उकरूल येथे करण्यात आला.त्यावेळी किरण ठाकरे तसेच भाजप ओबीसी मोर्चाचे विजय हजारे,किशोर ठाकरे,भाजप माजी तालुका चिटणीस संजय कराळे, मिनेश मसने,सरचिटणीस सचिन म्हसकर ,प्रल्हाद राणे, दर्शन कांबरी, रोशन पाटील, धनंजय थोरवे. रोशन पाटील,राजकुमार धुळे, धनंजय थोरवे , अनिकेत सावंत आणि शेकडो कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.त्यावेळी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाल्याने भाजप मध्ये उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे.त्यानंतर भाजपच्या माणगाव तर्फे वरेडी गटाच्या उमेदवार राधिका ठाकरे यांनी चिंचवली ग्रामपंचायत मध्ये प्रचाराची फेरी काढली.
निवडणूक प्रमुख किरण ठाकरे यांनी माणगाव जिल्हा परिषद गटामध्ये भारतीय जनता पक्ष दोन जागा लढवत आहे.भाजपच्या कमळ या निवडणूक चिन्हाबद्दल मतदारांमध्ये प्रचंड उत्सुकता असल्याने कार्यकर्त्यांमध्ये पहिल्याच प्रचार फेरी मध्ये जोरदार उत्साह दिसून आला.त्यावेळी कार्यकर्त्यांनी कर्जत तालुक्यातून रायगड जिल्हा परिषद मध्ये कमळ निवडणूक चिन्हावर उमेदवार निवडून जाणारं असा मतदारांचा पाठिंबा पाहून वाटत आहे.आगामी काळात भाजपचे कार्यकर्त्यांना अधिक ताकद देण्यासाठी कार्यकर्ते अधिक क्षमतेने निवडणूक काळात माणगाव तर्फे वरेडी जिल्हा परिषद गटातील प्रत्येक गावात आणि वाडी वस्तीत घरोघरी जाऊन प्रचार करतील असा विश्वास देखील किरण ठाकरे यांनी व्यक्त केला.