Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ajit Pawar Plane Crash : विमानात बसण्यापूर्वी अजित पवारांचा पत्नी सुनेत्रा पवारांना ‘तो’ फोन ठरला अखेरचा; नेमकं काय म्हणाले होते

अजित पवार यांच्या बारामतीत चार सभा होणार होत्या. या सभांसाठी ते मुंबईहून बारामतीत विमानाने येत होते. मात्र, विमानात बसण्याआधी पत्नी सुनेत्रा पवार यांच्याशी फोनवरून बोलणं झाले होते.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jan 29, 2026 | 10:43 AM
विमानात बसण्यापूर्वी अजित पवारांचा पत्नी सुनेत्रा पवारांना 'तो' फोन ठरला अखेरचा; नेमकं काय म्हणाले होते?

विमानात बसण्यापूर्वी अजित पवारांचा पत्नी सुनेत्रा पवारांना 'तो' फोन ठरला अखेरचा; नेमकं काय म्हणाले होते?

Follow Us
Follow Us:

पुणे : राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा बुधवारी (दि.28) भीषण अपघात झाला. या अपघातात अजित पवार यांच्यासह इतर पाच जणांचा मृत्यू झाला. बुधवारी सकाळी ८.४५ वाजता बारामती विमानतळावर लँडिंगदरम्यान चार्टर्ड विमानाचा अपघात झाला. अजित पवारांच्या निधनाने हळहळ व्यक्त केली जात आहे. असे असताना अजितदादांचा पत्नी सुनेत्रा पवार यांच्यासोबतचा फोन अखेरचा ठरला आहे.

अजित पवार यांच्या बारामतीत चार सभा होणार होत्या. या सभांसाठी ते मुंबईहून बारामतीत विमानाने येत होते. मात्र, विमानात बसण्याआधी पत्नी सुनेत्रा पवार यांच्याशी फोनवरून बोलणं झाले होते. सकाळी नाष्टा करत असताना अजित पवार यांनी खासदार असलेल्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्याशी संवाद साधत खास सल्ला दिला होता. ज्यावेळी फोनवर बोलणं झालं होतं, त्यावेळी अजित पवारांसोबत त्यांचे पीए आणि सुरक्षा कर्मचारी होते. दोघांमध्ये नेमकं काय बोलणं झालं होतं, याबाबतचा खुलासा त्यांनी स्वत: केला आहे.

हेदेखील वाचा : Ajit Pawar Death: काय तो रुबाब, काय तो राजेशाही थाट! अजित पवारांच्या ताफ्यात होती एकापेक्षा एक भन्नाट कार, किंमत…

अजित पवार यांनी नाष्टा करत असताना पत्नी सुनेत्रा पवार यांना फोन केला होता. यावेळी दोघांमध्ये संसदेत सुरू असलेल्या बजेट सत्रावर चर्चा झाली. राष्ट्रपतींचे अभिभाषण लक्ष देऊन ऐक, असा सल्ला अजित पवारांनी खासदार असलेल्या सुनेत्रा पवार यांना दिला होता.

बारामतीत आज केले जाणार अंत्यसंस्कार

अपघातानंतर घटनास्थळावरून अजित पवारांसह पाचही मृतदेह जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. शवविच्छेदनानंतर मृतदेह निवासस्थानी पोहोचवण्यात आले. अजित पवारांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी बुधवारी संध्याकाळी पाच वाजेपासून विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात ठेवण्यात आले, जिथे हजारो लोकांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. अंतिम यात्रा आज सकाळी ९ वाजता सुरू झाली आणि सकाळी ११ वाजता विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर अंत्यसंस्कार केले जातील. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह उपस्थित राहणार आहेत.

हेदेखील वाचा : अजित पवारांच्या निधनानंतर एकनाथ शिंदेंची ताकद आणखी वाढणार? पण भाजप आता नवी ‘रणनीती’ आखणार

Web Title: Phone call ajit pawar made to wife sunetra pawar before boarding plane turned out to be his last

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 29, 2026 | 10:40 AM

Topics:  

  • ajit pawar plane crash
  • Maharashtra Politics
  • political news
  • Sharad Pawar

संबंधित बातम्या

Maharashtra Today’s Live breaking News in Marathi: लालबागच्या राजाला भावपूर्ण निरोप, तर २३ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा
1

Maharashtra Today’s Live breaking News in Marathi: लालबागच्या राजाला भावपूर्ण निरोप, तर २३ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा

सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राजकारण नको; उदयनराजेंनी नेमकं काय म्हटलं?
2

सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राजकारण नको; उदयनराजेंनी नेमकं काय म्हटलं?

Ladki Bahin Yojana August installment: लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट! ऑगस्टच्या हप्त्यासाठी ३३९ कोटींचा निधी मंजूर
3

Ladki Bahin Yojana August installment: लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट! ऑगस्टच्या हप्त्यासाठी ३३९ कोटींचा निधी मंजूर

Maharashtra Politics: ‘महेंद्र थोरवे तिसऱ्यांदा आमदार होणार’; भरत गोगावलेंचा 2029 च्या निवडणुकीबाबत दावा
4

Maharashtra Politics: ‘महेंद्र थोरवे तिसऱ्यांदा आमदार होणार’; भरत गोगावलेंचा 2029 च्या निवडणुकीबाबत दावा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.