
कर्जत तालुक्यातील उजवा कालवा कराळेवाडी मांडवणे आणि हेदवली येथील संपूर्ण कालव्याचे काम पूर्ण करून घेतले नाही. त्याचवेळी कालव्याचे रूंदीकरण कमी केल्याने पाणी कमी प्रमाणात पुढे जात आहे. हेदवली येथील मार्गातील मोरी फुटलेली आहे. ती नविन टाकणे तसेच दुसरी मांडवणे येथील चाफेची नाल्याची मोरी ही फुटलेली आहे ती बदलण्याची मागणी केली होती. मात्र ठेकेदाराने फुटलेल्या मोरीवर सिमेंटची पिशवी टाकून त्यावर सिमेंट वरचेवर लावलेले आहे. तेथील काम नवीन मोरी टाकून पूर्ण करून घेणे. मार्गाच्या मोरी पासून वस्तीपर्यंत जेथे नाला संपला आहे. तिथपर्यंत नाल्याचे काम अपूर्ण आहे.ते पूर्ण करून घेणे आदी मागण्या केल्या आहेत.
गावातील अनेक शेतकऱ्यांना आपल्या शेतीकडे जाण्यासाठी जिथे जिथे गरज आहे तिथे मोरी टाकून पलीकडे जाण्यासाठी मार्ग करणे तयार करण्याची मागणी आहे.ज्या शेतक-याच्या शेताच्या बाजूला बाहेर पडण्यासाठी नाला खोल खणलेला आहे. अ
शेतक-यांच्या जाण्या येण्यासाठी खड्डा आहे,तेथे मोरी टाकून देणे. तसेच शेतकऱ्यांकडून विनंतीकरण्यात आली आहे, की यावर्षी तुम्ही राजनाल्याचे काम पूर्ण करून घेणे व आम्हास पुढच्या वर्षी 2026 मध्ये डिसेंबर महिन्यात राजनाल्याचे पाणी द्यावे अशी ग्रामस्थ मंडळ हेदवली शेतक-याची केली आहे.ही संपूर्ण काम पूर्ण केले तर सर्व शेतक-यांना पाणी सुरक्षित मिळेल असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.त्यात हेदवली येथील नाल्याचे जे अपूर्ण काम राहिले हे ते पाटबंधारे खात्याने लवकरात लवकर पूर्ण करावे अशी प्रमुख मागणी आहे.जर कामे पूर्ण होणार नसतील तर पुढील वर्षी पाणी द्यावे अशी मागणी देखील केली आहे.
जिथे जिथे कालव्याचे पाणी वाहून नेणाऱ्या मोऱ्या फुटले आहेत तेथील कामे व्यवस्थित करून त्या ठिकाणी नवीन मोऱ्या टाकून दुरुस्ती करणे. व शेतकऱ्यांना आपल्या शेतीमध्ये जाण्यासाठी अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना कसरत करावी लागत आहे त्याठिकाणी मोरी टाकून देणे. काम पूर्ण करा तरच आम्हाला पाणी सोडा आणि आम्हाला पाणी पुढच्या वर्षी मिळाला तरी चालेल पण काम पूर्ण करून पाणी सोडणे अशी विनंती शेतकरी हरिश्चंद्र म्हसकर यांनी केली आहे.
Ans: राजनाला उजवा कालवा हा कर्जत तालुक्यातील कराळेवाडी, मांडवणे, हेदवली व सावळा या भागातील शेतजमिनी ओलिताखाली आणण्यासाठी आहे. सुमारे 40 गावांतील शेती या कालव्यावर अवलंबून आहे.
Ans: उजव्या कालव्याचे अपूर्ण काम पूर्ण करूनच पाणी सोडावे, अशी शेतकऱ्यांची ठाम मागणी आहे. काम अर्धवट ठेवून पाणी सोडल्यास शेतीचे मोठे नुकसान होऊ शकते, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
Ans: कालव्याचे रूंदीकरण कमी करण्यात आले आहे, त्यामुळे पाणी पुढे कमी प्रमाणात पोहोचत आहे. तसेच अनेक ठिकाणी मोऱ्या फुटलेल्या असून त्यांची योग्य दुरुस्ती करण्यात आलेली नाही.