Raigad News: मुंरुड - जंजिऱ्यातील मोरबाई मंदीराला तीर्थक्षेत्राचा दर्जा देणार; खासदार सुनील तटकरे यांचे अभिवचन
ग्रामस्थांच्या मागणी खातर सुमारे २८ लाखांचा निधी खासदार तटकरेंनी उपलब्ध करून दिला होता. आज त्या पुलाचे काम पूर्ण झाले. हा पूल वाहतुकीसाठी मोकळा करण्यासाठी या पुलाच्या लोकार्पणसाठी खासदार तटकरे मोरे गावात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. मुरुड तालुक्यातील विहूर ग्रामपंचायत अंतर्गत मोरे गावातील रस्त्यावर बांधण्यात आलेल्या पुलाचे उद्घाटन खासदार तटकरेंच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मोरे ग्रामस्थ मंडळ अध्यक्ष दत्तात्रय नाक्तींच्या हस्ते तटकरेंचा सत्कार केला. (फोटो सौजन्य – Facebook)
राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष फैरोज घलटे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन मनोज भगत, जिल्हा उपाध्यक्ष मंगेश दांडेकर, माजी सरपंच अजित कासार, माजी सभापती स्मीता खेडेकर, माजी जिल्हा परिषद सदस्य सुबोध महाडिक, माजी नगरसेवक विश्वास चव्हाण, सोशल मीडिया सेलचे उपाध्यक्ष हसमुख जैन, सचिव विजय पैर, ऍड मृणाल खोत, सरपंच आशिष हेदुलकर, अनुराधा दांडेकर, दत्तात्रेय नाक्ती आदी उपस्थित होते.
खासदार सुनील तटकरे यांनी सांगितलं की, देश-विदेशातील पर्यटक आकर्षित होतील यासाठी मुरूड तालुक्याचा सर्वांगिण विकास करण्याचा संकल्प आहे. विहूर ग्रामस्थांना पंचक्रोशी आगरी समाजासाठी सभागृहचे काम पूर्ण होईल. देवी मोरबाईच्या दर्शनाचा योग आला. देवीचे आशिर्वाद आमच्या पाठीशी आहेत.
Kalyan News : गोठ्यात घुसून तीन वासरांवर केला हल्ला; कल्याणमध्ये बिबट्याची दहशत
यावेळी तटकरे पुढे म्हणाले की, मोरबाई मंदीर परिसर विकसित करताना वन विभागाचा प्रश्न उद्भवला तर तोही निश्चितपणे सोडवून भविष्याच्या काळात भाविकांचा व पर्यटकांचा ओघ वाढवण्यासाठी मुलभूत सुविधा देण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला. राष्ट्रवादी पक्षाच्या घोषवाक्यानुसार जनतेच्या हितासाठी काम करत आलो आहे आणि कर्तव्य भावनेने काम करतच राहणार. पण गावकी-भावकी वा अटी-शर्ती, स्टँप पेपरवर न लिहून घेता करणार, अशी हमी देत कागदाचा कपटा ही लिहून घेणार नाही. जनतेवर विश्वास असला पाहिजे. जनतेच्या हृदय सिंहासनावर कोरले जाईल अशीच भूमिका आपली राहील असे संकेत दिले.






