Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 4 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raigad News: महाडमध्ये दहीहंडीचा थरार! १ लाख ५१ हजारांच्या बक्षिसासाठी गोविंदा पथकांमध्ये रंगणार जोरदार चुरस

Mahad Dahi Handi: 'पालकमंत्री दहीहंडी उत्सव २०२६' शनिवार, ५ सप्टेंबर रोजी मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आला आहे. पारंपरिक उत्सवाला आधुनिक आयोजनाची जोड देत गोविंदा पथकांचा उत्साह वाढविण्यासाठी आयोजकांनी यंदा भरघोस पारितोषिकांची घोषणा केली आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Sep 04, 2026 | 02:41 PM
Raigad News: महाडमध्ये दहीहंडीचा थरार! १ लाख ५१ हजारांच्या बक्षिसासाठी गोविंदा पथकांमध्ये रंगणार जोरदार चुरस

Raigad News: महाडमध्ये दहीहंडीचा थरार! १ लाख ५१ हजारांच्या बक्षिसासाठी गोविंदा पथकांमध्ये रंगणार जोरदार चुरस

Follow Us
Follow Us:
  • महाडच्या दहीहंडी उत्सवात विजेत्या गोविंदा पथकाला तब्बल १ लाख ५१ हजार रुपयांचे बक्षीस मिळणार आहे.
  • आठ थरांसाठी १ लाख रुपये, तर महिला गोविंदा पथकांसाठीही १२ हजार आणि ७ हजार रुपयांची पारितोषिके जाहीर करण्यात आली आहेत.
  • उत्सवाचे यूट्यूबवर थेट प्रक्षेपण होणार असून, गोविंदा पथकांच्या सुरक्षिततेसाठी विशेष उपाययोजना करण्यात येणार आहेत.
महाड: दहीहंडीच्या थरावर थर चढवत गोविंदांच्या जल्लोषाने महाडचे वातावरण दुमदुमणार आहे. रायगडच्या पालकमंत्रीपदाची नवी जबाबदारी स्वीकारल्यानंतर नामदार भरतशेठ गोगावले यांच्या मार्गदर्शनाखाली यंदाचा ‘पालकमंत्री दहीहंडी उत्सव २०२६’ शनिवार, ५ सप्टेंबर रोजी मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आला आहे. नामदार भरतशेठ गोगावले मित्र मंडळ, महाड-रायगड यांच्या वतीने प्रभुलॉजसमोर, प्रभात कॉलनी येथे होणाऱ्या या उत्सवात जिल्ह्यातील गोविंदा पथकांच्या कौशल्याची रंगतदार जुगलबंदी पाहायला मिळणार आहे.

Wai News : दिव्यांग शेतकऱ्याच्या उपोषणाकडे प्रशासनाची डोळेझाक; तामखडा शिवारात 1500 ग्रामस्थांचा ठिय्या

पालकमंत्रीपदाची नवी जबाबदारी मिळाल्यानंतर महाडमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या दहीहंडी उत्सवाला यंदा विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. पारंपरिक उत्सवाला आधुनिक आयोजनाची जोड देत गोविंदा पथकांचा उत्साह वाढविण्यासाठी आयोजकांनी यंदा भरघोस पारितोषिकांची घोषणा केली आहे. त्यामुळे दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदा पथकांमध्ये चुरस रंगण्याची शक्यता आहे.  (फोटो सौजन्य – AI Created) 

मंडळाचे अध्यक्ष राजू पावले यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्पर्धेतील प्रथम क्रमांक पटकाविणाऱ्या गोविंदा पथकाला तब्बल १ लाख ५१ हजार रुपये पारितोषिक देण्यात येणार आहे. आठ थर रचणाऱ्या पथकासाठी १ लाख रुपयांचे पारितोषिक जाहीर केले आहे. याशिवाय पुरुष गोविंदा पथकांसाठी सात थरांना २५ हजार, सहा थरांना १२ हजार आणि पाच थरांना ७हजार रुपये पारितोषिक दिले जाणार आहे. महिला गोविंदा पथकांसाठीही विशेष पारितोषिकांची तरतूद करण्यात आली आहे. पाच थर रचणाऱ्या महिला पथकाला १२ हजार, तर चार धरांसाठी ७ हजार रुपये पारितोषिक देण्यात येणार आहे.

राज्यातील 11 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रवींद्र खेबुडकर यांची सिंधुदुर्गातून पुण्यात बदली

उत्सवाच्या सुरक्षिततेची जबाबदारी सिस्केप संस्थेकडे

दहीहंडी उत्सवाचे यूट्यूबवर थेट प्रक्षेपण करण्यात येणार असून, गोविंदा पथकांची आणि उपस्थितांची सुरक्षितता लक्षात घेऊन विशेष उपाययोजना करण्यात येणार आहेत. सुरक्षिततेची जबाबदारी सिस्केप संस्थेकडे सोपविण्यात आली आहे. दरम्यान, सायंकाळी ७ वाजल्यानंतर कोणत्याही गोविंदा पथकाचा प्रवेश स्वीकारला जाणार नाही, असे आयोजकांनी स्पष्ट केले. विशेष म्हणजे स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक गोविंदा पथकाचा मानाचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात येणार असल्याने सहभागाची उत्सुकता वाढली आहे. रायगड जिल्ह्यातील विविध गोविंदा पथकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

Web Title: Mahad dahi handi 2026 govinda teams compete for 1 lakh 51 thousand prize in grand celebration

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 04, 2026 | 02:41 PM

Topics:  

  • Marathi News
  • NAVARASHTRA
  • raigad

संबंधित बातम्या

Nagpur News: वर्षभरात केवळ ३,५५३ मराठा बंधूंचे कुणबी प्रमाणपत्रासाठी अर्ज
1

Nagpur News: वर्षभरात केवळ ३,५५३ मराठा बंधूंचे कुणबी प्रमाणपत्रासाठी अर्ज

Latur News: रानभाज्यांच्या विक्रीसाठी महिलांची गर्दी! लातूर जिल्हा परिषदेचा मोठा पुढाकार!
2

Latur News: रानभाज्यांच्या विक्रीसाठी महिलांची गर्दी! लातूर जिल्हा परिषदेचा मोठा पुढाकार!

Chandrapur News: गावातच रोजगार, स्थलांतराला आळा! सामूहिक वनहक्कासाठी ब्रह्मपुरीतील २६ ग्रामसभांची एकजूट
3

Chandrapur News: गावातच रोजगार, स्थलांतराला आळा! सामूहिक वनहक्कासाठी ब्रह्मपुरीतील २६ ग्रामसभांची एकजूट

Fertilizer Hibuscus Tips: जास्वंदीला येतील भरभरून फुले! बाप्पाच्या आगमनाआधी फक्त हा एक उपाय करून पाहा
4

Fertilizer Hibuscus Tips: जास्वंदीला येतील भरभरून फुले! बाप्पाच्या आगमनाआधी फक्त हा एक उपाय करून पाहा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.