Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 13 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raigad News: महाडमध्ये अतिवृष्टीनंतर पावसाची विश्रांती! 9 दिवसांत विक्रमी 1,213 मिमी पाऊस, शेतकऱ्यांची चिंता कायम

महाड तालुक्यात जुलैच्या सुरुवातीला झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले होते. मात्र अवघ्या काही दिवसांतच पावसाने अचानक माघार घेतल्याने शेतकरी आणि प्रशासनाचे लक्ष आता पुढील पावसाकडे लागले आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 13, 2026 | 02:04 PM
Raigad News: महाडमध्ये अतिवृष्टीनंतर पावसाची विश्रांती! 9 दिवसांत विक्रमी 1,213 मिमी पाऊस, शेतकऱ्यांची चिंता कायम

Raigad News: महाडमध्ये अतिवृष्टीनंतर पावसाची विश्रांती! 9 दिवसांत विक्रमी 1,213 मिमी पाऊस, शेतकऱ्यांची चिंता कायम

Follow Us
Follow Us:
  • महाडमध्ये जुलैच्या पहिल्या नऊ दिवसांत तब्बल 1,213 मिमी पावसाची नोंद होऊन पूरस्थिती निर्माण झाली होती.
  • 9 जुलैनंतर पावसाने अचानक विश्रांती घेतल्याने गेल्या तीन दिवसांत अवघ्या 4 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
  • अतिवृष्टीनंतर आलेला पावसाचा खंड खरीप हंगाम, भातशेती आणि पर्यावरणाच्या दृष्टीने चिंतेचा विषय ठरत आहे.
महाड: महाड तालुक्याला जुलैच्या पहिल्या आठवड्यात अक्षरशः हादरवून सोडणाऱ्या पावसाने अवघ्या नऊ दिवसांत तब्बल १,२१३ मि.मी. पावसाची नोंद केली. या मुसळधार पावसामुळे सावित्री नदीला पूर आला, सखल भाग जलमय झाले, शेतीचे मोठे नुकसान झाले आणि जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले. मात्र ९ जुलैनंतर पावसाने अचानक माघार घेतली असून, गेल्या तीन दिवसांत अवघ्या चार मि.मी. पावसाची नोंद झाल्याने काही दिवसांपूर्वी महाडला वेठीस धरणारा पाऊस आता ‘तो मी नव्हेच’ अशा भूमिकेत गेल्याचे चित्र आहे.

Maharashtra Rain Update: महाराष्ट्रात पावसाची उघडीप; ‘या’ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा

महाडची वार्षिक पर्जन्यमानाची आकडेवारी लक्षात घेता, आतापर्यंत ५०% पाऊस झाला असून आतापर्यंत झालेला १,५७५ मि.मी. पाऊस हा महत्त्वाचा टप्पा असला तरी आगामी काळात अजूनही नियमित स्वरूपात पाऊस होणे आवश्यक आहे. पोषक असा संतुलित पाऊस पुन्हा कधी सुरू होणार, याकडे लक्ष लागून आहे.  (फोटो सौजन्य – AI Created) 

यंदाच्या सुरूवातीला आपत्कालीन परिस्थितीचा सामना करावा लागला

एल निनोच्या पार्श्वभूमीवर यंदा मान्सूनचे आगमन लांबल्यामुळे जून अखेरीस यंदा ३५८ मि.मी. पावसाची नोंद झाली होती. त्यानंतर जुलैच्या सुरुवातीलाच पावसाने रौद्ररूप धारण करत अवघ्या नऊ दिवसांत १.२१३ मिलिमीटर पाऊस बरसवला. त्यामुळे चालू पावसाळ्यातील एकूण पर्जन्यमान १,५७५ मि.मी. इतके झाले आहे. एवढ्या अल्प कालावधीत झालेल्या या अतिवृष्टीमुळे महाडला सलग तीन दिवस पूरस्थितीचा सामना करावा लागला.

चार दिवस सुरू असलेल्या पावसाने सावित्री नदीसह तालुक्यातील प्रमुख नद्या आणि ओढे दुथडी भरून वाहू लागले, अनेक गावांमध्ये पाणी शिरले, वाहतुकीवर परिणाम झाला, काही ठिकाणी दरडी कोसळल्या, तर हजारो एकर भातशेती पाण्याखाली गेली. शेतामध्ये गाळ साचल्याने शेतकऱ्यांपुढे पुन्हा लागवडीचे मोठे आव्हान उभे राहिले,

कृषी आणि पर्यावरणाच्या दृष्टीने चिंतेचा विषय

या अतिवृष्टीनंतर पावसाने अचानक विश्रांती घेतल्याने वातावरणात मोठा बदल जाणवू लागला आहे. नदी-नाल्यांची पाणीपातळी कमी झाली असून जनजीवन पूर्वपदावर येऊ लागले आहे. पूरग्रस्त भागात स्वच्छता, पंचनामे आणि दुरुस्तीची कामे सुरू झाली आहेत. नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला असला, तरी पावसाचा हा अचानक झालेला खंड कृषी आणि पर्यावरणाच्या दृष्टीने चिंतेचा विषय मानला जात आहे.

Mira Bhayandar News : मिरा-भाईंदरच्या विकास आराखड्यात मोठी उलथापालथ; १६४ फेरबदलांचा प्रस्ताव, नागरिकांकडून हरकती-सूचना मागविणार

खरीप हंगामासाठी अनुकूल ठरणार नसल्याचा अंदाज

तज्ज्ञांच्या मते, अतिवृष्टीइतकाच पावसाचा नियमित आणि सातत्यपूर्ण स्वरूपात होणारा वर्षावही महत्त्वाचा असतो. काही दिवसांत मोठ्या प्रमाणात पाऊस पडणे आणि त्यानंतर दीर्घ खंड पडणे ही स्थिती खरीप हंगामासाठी अनुकूल ठरत नाही. भातशेतीला सातत्याने ओलावा आवश्यक असतो. त्याचबरोबर भूजलपातळी, धरणे, तलाव आणि नैसर्गिक जलस्रोतांची संतुलित भरही नियमित पावसावर अवलंबून असते.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

Web Title: Mahad rain update after 1213 mm rain in just 9 days sudden dry spell raises concern for farmers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 13, 2026 | 02:04 PM

Topics:  

  • Mahad
  • NAVARASHTRA
  • raigad

संबंधित बातम्या

Raigad News: देवकुंड धबधब्यावर मोठी दुर्घटना; प्रवेशबंदी झुगारून गेलेले दोन पर्यटक पाण्यात बुडाले, शोधमोहीम सुरू
1

Raigad News: देवकुंड धबधब्यावर मोठी दुर्घटना; प्रवेशबंदी झुगारून गेलेले दोन पर्यटक पाण्यात बुडाले, शोधमोहीम सुरू

Dombivli News: शास्त्रीनगर रुग्णालय पुन्हा वादात; उपचाराऐवजी चिमुकल्याला सायन रुग्णालयात हलवण्याचा दिला सल्ला, व्हिडिओ व्हायरल
2

Dombivli News: शास्त्रीनगर रुग्णालय पुन्हा वादात; उपचाराऐवजी चिमुकल्याला सायन रुग्णालयात हलवण्याचा दिला सल्ला, व्हिडिओ व्हायरल

Matheran News: वीकेंडला माथेरान हाऊसफुल; घाटरस्त्यावर वाहतूक कोंडी, प्रवेशद्वारावर लांबच लांब रांगा; पर्यटकांची दमछाक
3

Matheran News: वीकेंडला माथेरान हाऊसफुल; घाटरस्त्यावर वाहतूक कोंडी, प्रवेशद्वारावर लांबच लांब रांगा; पर्यटकांची दमछाक

किंवरा ओढा पुलाबाबतच्या अफवांना पूर्णविराम; पर्यायी पूल वाहून गेला नाही, प्रशासनाचा खुलासा
4

किंवरा ओढा पुलाबाबतच्या अफवांना पूर्णविराम; पर्यायी पूल वाहून गेला नाही, प्रशासनाचा खुलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.