Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raigad News: महाडकरांना दिलासा! वरंधा घाट बंद न करता रुंदीकरणाचे काम सुरूच, प्रशासनाचा मोठा निर्णय

वरंधा घाट येथे रस्ता रुंदीकरणाचे काम सुरु आहे. रस्ता रुंदीकरणामुळे घाट पूर्ण बंद करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने फेटाळला आहे. तसेच स्थानिकांसाठी पर्यायी मार्ग देखील उपलब्ध ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Mar 29, 2026 | 12:53 PM
Raigad News: महाडकरांना दिलासा! वरंधा घाट बंद न करता रुंदीकरणाचे काम सुरूच, प्रशासनाचा मोठा निर्णय

Raigad News: महाडकरांना दिलासा! वरंधा घाट बंद न करता रुंदीकरणाचे काम सुरूच, प्रशासनाचा मोठा निर्णय

Follow Us
Close
Follow Us:
  • स्थानिकांचा विजय! वरंधा घाट पूर्ण बंद करण्यास प्रशासनाचा नकार
  • रस्ता काम सुरू, पण वाहतूकही सुरू; वरंधा घाटबाबत प्रशासनाचा मोठा निर्णय
  • नागरिकांची गैरसोय टळली! वरंधा घाटसाठी पर्यायी मार्गासह आदेश
महाड: राष्ट्रीय महामार्ग क्र. ९६५ हिर्डोशी ते वरंधा घाट (कि.मी. ७०/९०० ते ९२/००३) या दरम्यान सुरू असलेल्या रस्ता रुंदीकरण कामामुळे घाट पूर्णतः बंद करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. मात्र, स्थानिक नागरिकांच्या अडचणी लक्षात घेता घाट पूर्णतः बंद न करता पर्यायी मार्ग उपलब्ध ठेवूनच कामकाज करण्याचे आदेश पुणे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डूडी यांनी नुकतेच दिले आहेत.

Chandrapur News: चंद्रपुरात गॅस सिलिंडर टंचाई तीव्र! युद्धामुळे नागरिकांचा बायोगॅस-केरोसिनकडे कल, चुली पुन्हा पेटल्या

भोर उपविभागीय अधिकारी यांनी सादर केलेल्या प्रस्तावानुसार हा घाट भाग दरडप्रवण असून रस्ता अत्यंत अरुंद व वळणावळणाचा आहे. एका बाजूस निरा देवघर धरणाचे पाणी तर दुसऱ्या बाजूस उंच डोंगररांग असल्याने वाहतूक वळविण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध नाही. त्यामुळे २५ मार्च ते ३० एप्रिल या कालावधीत रस्ता पूर्णतः बंद करण्याची मागणी करण्यात आली होती.

तथापी धामणदेव, कारुंगण, हिंडोशी, सोमजाई माळ, टाक्या माळ, वारवंड, शिरगाव, अशिंपी, उंबर्डेवाडी, उंबर्डेगाव व शिळीम या गावांचा या मार्गाशी थेट संपर्क असल्याने स्थानिकांना पर्यायी मार्ग नसल्याचे प्रशासनाच्या उपलब्ध अहवालातून स्पष्ट झाले. त्यामुळे नागरिकांचे दैनंदिन कामकाज, अत्यावश्यक सेवा व विद्यार्थ्यांची ये-जा बाधित होऊ नये, या दृष्टीने घाट पूर्णतः बंद करण्यास नकार देण्यात आला.

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार, रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू ठेवताना स्थानिकांसाठी पर्यायी मार्ग उपलब्ध करून देणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच रुग्णवाहिका, अग्निशमन दल व इतर अत्यावश्यक सेवांची वाहतूक सुरळीत राहील याची दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान, बाहेरील वाहनांसाठी प्रशासनाने पर्यायी मार्ग सुचविले आहेत. पुण्याकडे जाण्यासाठी माणगाव-निजामपूर-ताम्हिणी घाट-मुळशी-पिरंगुट-पुणे असा मार्ग, तर कोल्हापूरकडे जाण्यासाठी पोलादपूर-महाबळेश्वर-वाई-सातारा-कराड किंवा खेड-चिपळून-पाटण-कराड-कोल्हापूर असे पर्याय देण्यात आले आहेत.

पुणे ‘झेडपी’ ई-गव्हर्नन्समध्ये राज्यात अव्वल; सेवाकर्मी कार्यक्रमातही ‘प्रथम’ क्रमांकाने निवड

नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी घेतला निर्णय

पावसाळ्यापूर्वी घाटातील कामे पूर्ण करण्याच्या दृष्टीने आणि नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान मागील काही वर्षात हा घाट मार्ग सातत्याने बंद होत असल्याच्या कारणाने या मार्गावरील विविध गावातील ग्रामस्थांनी संताप व्यक्त करीत प्रशासनाला पत्र व्यवहार देखील केला होता. दरवर्षीच्या पावसाळ्यात तर बरेच अंशी हा घाट मार्ग बंद असतो. त्यामुळे येथील दळणवळण, व्यवसाय, शाळा महाविद्यालय इत्यादीवर त्याचा परिणाम होत असून जनजीवन देखील बाधित होत असते. त्यामुळे पुणे जिल्हाधिका-यांनी दिलेल्या या सध्याच्या निर्णयामुळे येथील नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

 

Web Title: Mahad residents get relief as varandha ghat widening work continues without full closure raigad news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 29, 2026 | 12:53 PM

Topics:  

  • Mahad
  • Marathi News
  • raigad

संबंधित बातम्या

Matheran News : वाहनतळाच्या नावाखाली बेकायदा माती उत्खनन; वन आणि महसूल विभागाची डोळेझाक
1

Matheran News : वाहनतळाच्या नावाखाली बेकायदा माती उत्खनन; वन आणि महसूल विभागाची डोळेझाक

TVS Motor Profit : टीव्हीएस मोटारची घोडदौड कायम; स्कूटर, EV आणि तीनचाकी विक्रीत मोठी वाढ
2

TVS Motor Profit : टीव्हीएस मोटारची घोडदौड कायम; स्कूटर, EV आणि तीनचाकी विक्रीत मोठी वाढ

दिग्गज कंपन्यांनी उचललं मोठं पाऊल, WFH आणि परदेशी यात्रांबाबत PM मोदी यांच्या आवाहनानंतर घेतला निर्णय
3

दिग्गज कंपन्यांनी उचललं मोठं पाऊल, WFH आणि परदेशी यात्रांबाबत PM मोदी यांच्या आवाहनानंतर घेतला निर्णय

Sandeep Khare : “अहो सासरेबुबा” ! संदिप खरेच्या जावयाची खास वाढदिवसानिमित्ताने खास पोस्ट, म्हणाला माझ्यासारखे…
4

Sandeep Khare : “अहो सासरेबुबा” ! संदिप खरेच्या जावयाची खास वाढदिवसानिमित्ताने खास पोस्ट, म्हणाला माझ्यासारखे…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.