Chandrapur News: चंद्रपुरात गॅस सिलिंडर टंचाई तीव्र! युद्धामुळे नागरिकांचा बायोगॅस-केरोसिनकडे कल, चुली पुन्हा पेटल्या
आखाती देशातील युद्धामुळे संपूर्ण देशात सिलिंडर टंचाईचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत नागरिकांना घरगुती वापरासाठी सिलिंडर उपलब्ध व्हावा, म्हणून व्यावसायिक वापरावर प्रतिबंध लावण्यात आला आहे. परिणामी अनेक छोटे व्यवसाय ठप्प पडलेले आहे. व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी ग्रामीण भागात इलेक्ट्रक शेगडीचा आधार घ्यावा लागत आहे. तर यावर मात करण्यासाठी नागरिकांना बायोगॅस, केरोसिनकडे परतीचा प्रवास करण्याची वेळ आलेली आहे. (फोटो सौजन्य – AI Created)
आखाती देशातील इराण-इस्त्राईल, अमेरिका या देशांमध्ये गत महिना भरापासून युद्ध सुरू आहे. परिणामी, विविध देशात गॅस व पेट्रोलची टंचाई निर्माण झालेली आहे. याचाच परिणाम म्हणून जिल्ह्यात गत काही दिवसांपासून नागरिकांवर गॅस सिलिंडरसाठी रांग लागण्याची वेळ आली आहे. रांगेत लागता लागता आता नागरिक त्रस्त झाले असून पर्यायी इंधनाचा शोध घेणे सुरू झाला आहे. प्रशासनाने घरगुती सिलिंडरच्या वापरावर प्रतिबंध आणल्याने छोटे व्यावसायिक अडचणीत तर आले आहेतच, मात्र घरगुती सिलिंडरही मिळत नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. ग्रामीण भागामध्ये सरपणासाठी मुबलक प्रमाणात लाकूड उपलब्ध असल्यामुळे फ्यांयी इंधन म्हणून चुलीवर स्वयंपाक बनविण्यास सुरुवात झाली आहे. तर अनेकांनी १६०० ते १७०० रुपये खर्च करून इलेक्ट्रिक शेगड्यांचा वापर सुरू केलेला आहे. मात्र इलेक्ट्रिक शेगड्या या घरगुती वापरासाठी उपयोगाचे आहेत. व्यावसायिक वापरासाठी शेगडीचा वापर करताना अडचणी येत असल्याचे एका व्यावसायिकाने सांगितले.
नांदुरा रौप्य महोत्सव: भक्तिरसात न्हालेलं शहर, महाप्रसाद व भव्य शोभायात्रा आकर्षण
महाराष्ट्र शासनातर्फे सिलिंडर टंचाईवर मात करण्यासाठी रेशन कार्डधारकांना केरोसिन वितरण करण्याचा निर्णय घेतला आहे. १०-१२ वर्षापूर्वी शासनाकडून केरोसिनचे वितरण केल्या जात होते. मात्र गॅस सिलिंडर व लाइटचा वापर वाढल्याने केरोसिन वितरण बंद करण्यात आले होते. आता पुन्हा सुरू करण्यात येणार असल्याने ‘स्टो’वर स्वयंपाक बनविण्याच्या जुन्या आठवणीही जागे होणार.






