Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raigad News: 21 एप्रिलपासून महाराष्ट्रात सरकारी कर्मचारी-शिक्षकांचा बेमुदत संप? 17 लाख कर्मचाऱ्यांनी दिला इशारा

राज्यातील प्रलंबित मागण्यांवर तातडीने निर्णय न झाल्यास 21 एप्रिल 2026 पासून सरकारी कर्मचारी आणि शिक्षक बेमुदत संपावर जाणार आहेत. 17 लाख कर्मचारी-शिक्षकांच्या इशाऱ्यामुळे राज्य प्रशासनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Mar 18, 2026 | 01:15 PM
Raigad News: 21 एप्रिलपासून महाराष्ट्रात सरकारी कर्मचारी-शिक्षकांचा बेमुदत संप? 17 लाख कर्मचाऱ्यांनी दिला इशारा

Raigad News: 21 एप्रिलपासून महाराष्ट्रात सरकारी कर्मचारी-शिक्षकांचा बेमुदत संप? 17 लाख कर्मचाऱ्यांनी दिला इशारा

Follow Us
Follow Us:
  • राज्यात मोठा प्रशासकीय ठप्पा येणार? कर्मचारी-शिक्षकांनी दिली बेमुदत संपाची नोटीस
  • मागण्या प्रलंबितच; 21 एप्रिलपासून सरकारी कर्मचारी आणि शिक्षक संपावर जाणार
  • महाराष्ट्र सरकारसमोर नवे आव्हान! कर्मचारी-शिक्षकांचा राज्यव्यापी बेमुदत संपाचा इशारा
अलिबाग: महाराष्ट्रातील सरकारी कर्मचारी व शिक्षकांच्या दीर्घकाळ प्रलंबित मागण्यांकडे शासनाने लक्ष द्यावे, यासाठी राज्यभरातील कर्मचारी-शिक्षक २१ एप्रिल २०२६ पासून बेमुदत संपावर जाणार असल्याची नोटीस देण्यात आली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अधिकृत नोटीस देण्यात आली असून रायगड जिल्ह्यात कर्मचारी-शिक्षकांच्यावतीने जिल्हाधिकारी तसेच सर्व तालुक्यांच्या तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले.

Matheran News: माथेरानमधील एल्फिन्स्टन बंगल्याला तारेचे कुंपण हटवलं, वन्य प्राण्यांच्या आदिवासाचा प्रश्न सुटला

रायगड जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के यांना कर्मचारी संघटनेच्या शिष्टमंडळाने निवेदन दिले. राज्यातील सुमारे १७ लाख कर्मचारी व शिक्षक मागील वर्षभरापासून प्रलंबित मागण्यांबाबत शासनाकडून सकारात्मक निर्णयाची अपेक्षा करत आहेत. या मागण्यांसाठी गेल्या वर्षभरात विविध आंदोलनात्मक कृती करण्यात आल्याचे संघटनांनी सांगितले. निवेदन देताना राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना जिल्हाध्यक्ष संदीप नागे, सरचिटणीस प्रभाकर नाईक, कोषाध्यक्षा दर्शना पाटील, राज्य प्रतिनिधी परशुराम म्हात्रे, सहसचिव रत्नाकर देसाई, प्रफुल्ल कानिटकर, अलिबाग तालुका अध्यक्ष दर्शना कांबळे, इतर पदाधिकारी उपस्थित होते.

शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे विविध प्रश्न प्रलंबित

संघटनांच्या मते, सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना जाहीर झाल्यानंतरही तिच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक नियम व परिपत्रके अद्याप जारी झालेली नाहीत. त्यामुळे १ मार्च २०२४ नंतर निवृत्त झालेल्या कर्मचान्यांचे पेन्शन प्रकरण प्रलंबित आहे. तसेच राज्यातील रिक्त पदे भरणे, कंत्राटी कर्मचाऱ्यांचे नियमितीकरण, अनुकंपा नियुक्त्या, सेवांतर्गत पदोन्नती, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचा-यांचे विविध प्रश्न आदी मागण्या प्रलंबित असल्याचे संघटनांनी नमूद केले.

बेमुदत साखळी उपोषण

६ मार्च २०२५ रोजी राज्यभर धरणे सत्याग्रह, २० मे २०२५ रोजी दोन तासांचे वॉकआऊट आंदोलन, ९ जुलै २०२५ रोजी राज्यव्यापी निदर्शने, ११ नोव्हेंबर २०२५ रोजी भोजनाच्या सुट्टीत उग्र निदर्शने तसेच ५ डिसेंबर २०२५ रोजी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे शाळा बंद आंदोलन करण्यात आले होते, तसेच ९ ते ११ डिसेंबर २०२५ दरम्यान नागपूर येथील हिवाळी अधिवेशनासमोर बेमुदत साखळी उपोषणही करण्यात आले होते.

Central Railway : बदलापूर ते कर्जत प्रवास होणार सुस्साट! रेल्वे प्रकल्पासाठी जमीनीचा मोबदला मिळवून देण्याचा बारणेंचा प्रयत्न

सकारात्मक निर्णय घ्यावा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अधिकृत नोटीस देण्यात आली आहे. तसेच रायगड जिल्ह्यात कर्मचारी-शिक्षकांच्यावतीने जिल्हाधिकारी तसेच सर्व तालुक्यांच्या तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले आहे. या मागण्यांवर शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा २१ एप्रिलपासून राज्यभर बेमुदत संप पुकारण्यात येईल.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Maharashtra government employees and teachers announce indefinite strike from april 21 1 7 million staff issue warning to devendra fadnavis raigad news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 18, 2026 | 01:15 PM

Topics:  

  • Alibaug
  • Marathi News
  • raigad

संबंधित बातम्या

रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा सुटणार? भरत गोगावले यांचा मोठा दावा; ‘आज नाव जाहीर होईल’
1

रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा सुटणार? भरत गोगावले यांचा मोठा दावा; ‘आज नाव जाहीर होईल’

FSSAI Action On Pan Masala : पान मसाला खाणाऱ्यांना मोठा झटका! FSSAI कडून ‘या’ गोष्टीवर बंदी; नियमांचे उल्लंघन केल्यास कडक कारवाई
2

FSSAI Action On Pan Masala : पान मसाला खाणाऱ्यांना मोठा झटका! FSSAI कडून ‘या’ गोष्टीवर बंदी; नियमांचे उल्लंघन केल्यास कडक कारवाई

गादीसाठीच्या संघर्षात नव्या दावेदारांची एंट्री, Mirzapur The Movie चा ट्रेलर रिलीज; आता थेट थिएटरमध्ये होणार धुमाकूळ!
3

गादीसाठीच्या संघर्षात नव्या दावेदारांची एंट्री, Mirzapur The Movie चा ट्रेलर रिलीज; आता थेट थिएटरमध्ये होणार धुमाकूळ!

Plastic Currency : प्लास्टिकच्या 1 अब्ज नोटा बनणार… RBI चा मोठा निर्णय, 10 आणि 20 रुपयांच्या ट्रायल करंन्सीला मंजुरी
4

Plastic Currency : प्लास्टिकच्या 1 अब्ज नोटा बनणार… RBI चा मोठा निर्णय, 10 आणि 20 रुपयांच्या ट्रायल करंन्सीला मंजुरी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.