Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mansoon Update : टेकडीवरील खोदकाम बेतलं स्थानिकांच्या जीवावर ; गावकऱ्यांच्या घरात चिखलाचा खच

कर्जत तालुक्यातील किरवली गावाच्या मागे असलेल्या टेकडीवर अनेक महिने खोदकाम सुरू आहे.त्या खोदकामाबद्दल स्थानिक रहिवाशी यांनी महसूल विभागाला पत्र देवून माती वाहून येण्याची भीती व्यक्त केली होती.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: May 26, 2025 | 05:23 PM
Mansoon Update : टेकडीवरील खोदकाम बेतलं स्थानिकांच्या जीवावर ; गावकऱ्यांच्या घरात चिखलाचा खच
Follow Us
Close
Follow Us:

संतोष पेरणे / कर्जत : कर्जत तालुक्यातील किरवली गावाच्या मागे असलेल्या टेकडीवर अनेक महिने खोदकाम सुरू आहे.त्या खोदकामाबद्दल स्थानिक रहिवाशी यांनी महसूल विभागाला पत्र देवून माती वाहून येण्याची भीती व्यक्त केली होती.मात्र महसूल विभागाने त्याकडे दुर्लक्ष केल्याने किरवली गावातील अनेकांचे घरामध्ये पाणी आणि माती शिरली आहे.दरम्यान या नुकसानीची माहिती घेण्यासाठी महसूल विभागाचे मंडळ अधिकारी आणि तलाठी पोहचले आहेत.

कर्जत तालुक्यातील किरवली महसूल गावाच्या हद्दीमध्ये टेकडी खोदण्याचे काम चालू आहे. गावाच्या वरच्या बाजूला पोकलन मशीनचे साहाय्याने खोदकाम केले जात असताना ते खोदकाम तत्काळ बंद करावे अशी मागणी या गावातील ग्रामस्थांनी महसूल विभागाला लेखी पत्र देवून केली होती. किरवली गावाच्या मागे डोंगर पोखरून रस्ते बनवणे आणि जमीन सपाटीकरण करण्याची कामे केली जात होती. याच परिसरात २००५ मध्ये डोंगर (दरड) कोसळला होता आणि त्या भुस्खनन मध्ये घरांचे मोठे नुकसान झाले होते.त्यामुळे त्या भागात कोणतेही प्रकारचे खोदकाम करण्यास परवणागी देवू नये अशी मागणी करणारे निवेदन तहसिलदार यांना देण्यात आले होते.त्या अर्जावर दीपक सोणावळे,प्रकाश सोनवले,शरद गायकवाड, विजया सोणावले,रंजना सोनावळे, नीलिया गायकवाड, सुवर्णा गायकवाड,किरण गायकवाड, कल्पेश गायकवाड यांच्या सह्या आहेत.मात्र प्रशासनाने त्या अर्जकडे दुर्लक्ष केल्याने डोंगराची माती येणाऱ्या पहिल्याच पावसात खाली आली असून अनेकांचे घरामध्ये ही माती गेली आहे.

Mansoon Update : प्रशासनाचा हलर्जीपणा अन् नदीला पूर, गावकऱ्यांनी व्यक्त केला संताप

स्थानिक रहिवाशी यांनी गावाच्या मागील बाजूस असलेल्या डोंगराचे खोदकाम चालू असल्यामुळे गावातील वस्ती मध्ये जिवीतहानी होवू शकते.तरी तेथे एका विकासकाने बांधकाम करण्यासाठी डोंगर फोडून तयार केलेला मातीचा भराव वाहून खाली आला आहे. मातीचा भराव पाण्याच्या प्रवाहामध्ये येऊन वस्तीमध्ये साचले आहे ही माहिती मिळताच त्या भागाची पाहणी करण्यासाठी तहसीलदार डॉ धनंजय जाधव यांनी आदेशाने मंडळ वैशाली पाटील,तलाठी वैशाली मांन्टे, तलाठी आकाश काळे तसेच कोतवाल सुनील गायकवाड यांनी जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. किरवलीचे ग्रामस्थ राहुल गायकवाड, रोशन गायकवाड, शैलेंद्र जाधव, कल्पेश गायकवाड,हे यावेळी उपस्थित होते.या पाण्यासोबत आलेल्या माती मुळे किरवली गावातील ३४ हून अधिक घरांचे नुकसान झाले आहे.

Rain Update : कोकणात पावसाचा हाहाःकार; अंगावर विज पडल्याने तरुणाचा मृत्यू

मान्सून यावर्षी लवकरच आगमन केलं असून यंदा मे महिन्यातच  पावसाला दमदार  सुरूवात झाली आहे.त्यात ढग फुटी सदृश पाऊस झाल्यानंतर पहिल्याच पावसात तालुक्यातील सर्व नद्यांना पूर आले आहेत.कर्जत तालुक्यात उन्हाळयात कोरडी असलेली चिल्हार नदी एका दिवसाच्या पावसात दुथडी भरून वाहत आहे.उन्हाळयात कोरडया नदीमध्ये पाण्याचा साठा असावा यासाठी चिल्हार नदीमध्ये अंत्राट वरेडी गावाच्या हद्दीत असलेल्या के. टी.बंधारा बांधण्यात आला होता.या बंधाऱ्यांच्या लोखंडी प्लेटी पावसाळा सुरू होण्याची लक्षणे असताना काढण्यात आलेले नव्हते.त्याचा फटका स्थानिक ग्रामस्थांना बसला आहे.बंधाऱ्याच्या लोखंडी प्लेट काढण्यात आल्या नसल्याने नागपूरचे पाणी थेट गावामध्ये घुसले आहे. त्यामुळे पहिल्याच पावसात मोठी पूरपरिस्थिती निर्माण झाली.त्याचवेळी शेतकऱ्यांच्या शेत जमिनीचे नुकसान तर झालेच पुरामुळे नदीकाठावरील घरांना धोका निर्माण झाला आहे.

 

 

 

Web Title: Mansoon update excavation on the hill threatens the lives of locals mud spills into the houses of villagers in karjat

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 26, 2025 | 05:23 PM

Topics:  

  • heavy rain update
  • karjat news
  • raigad

संबंधित बातम्या

Satara News : नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य, आवश्यक तेथे तात्काळ स्थलांतरण करा; जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना
1

Satara News : नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य, आवश्यक तेथे तात्काळ स्थलांतरण करा; जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना

Karjat News : मुसळधार पावसाने कर्जतला झोडपलं; शेतकऱ्यांच्या घरांचं नुकसान
2

Karjat News : मुसळधार पावसाने कर्जतला झोडपलं; शेतकऱ्यांच्या घरांचं नुकसान

Mumbai Rain Update : मिठी नदीला पूराचा धोका, NDRF दाखल, नागरिकांचंही स्थलांतर
3

Mumbai Rain Update : मिठी नदीला पूराचा धोका, NDRF दाखल, नागरिकांचंही स्थलांतर

Mumbai Rains News: मुंबईसह महाराष्ट्रात 3 जिल्ह्यात शाळा-कॉलेज बंद, पावसाने सामान्यांचे झाले हाल; तलाव भरले
4

Mumbai Rains News: मुंबईसह महाराष्ट्रात 3 जिल्ह्यात शाळा-कॉलेज बंद, पावसाने सामान्यांचे झाले हाल; तलाव भरले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.