माथेरान/संतोष पेरणे : हवामान खात्याकडून पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला असून देशभरासह राज्यातील काही ठिकाणी पावसाचं आगमन होण्यास सुरुवात झाली आहे. मुंबई आणि पुण्यापासून जवळ असलेलं निसर्गमय ठिकाण म्हणजे माथेरान. सध्या माथेराममध्ये पावसाचं आगमन झालं असून पर्यटक मोठ्या प्रमाणात माथेरामध्ये दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. या थंड हवेच्या ठिकाणी पर्यटक निसर्गाचा आमंद घेण्यासाठी येत आहेत. मात्र पावसामुळे आल्हाददायक वातावरण तयार झाले आहे.त्यात आकाशात रंगीबेरंगी रंगांची उधळण दिसत असल्याने येथील पर्यटन हंगामासाठी सुचिन्ह समजली जात आहेत.
माथेरान हे थंड हवेचे ठिकाण सध्या पर्यटकांनी गजबजलेले आहे.त्यावेळी उन्हाचा त्रास होत होत असल्याने पर्यटकांची गर्दी थंड हवेच्या ठिकाण असलेल्या माथेरान मध्ये वाढली आहे.मात्र गेली काही दिवस अवकाळी पावसाने सर्वत्र नुकसानीचे सत्र सुरु केले आहे. मात्र माथेरान सारख्या पर्यटन स्थळी वातावरणात अधिक गारवा निर्माण करण्यात हाच अवकाळी पाऊस मदतीला आला आहे.त्यामुळे माथेरान मध्ये पर्यटकांची संख्या वाढली असून या अवकाळी पावसाचा फायदा माथेरान मध्ये पर्यटक यांना होत आहे.गेली काही दिवस वातावरणात निर्माण झाला प्रचंड उष्मां याला हेच अवकाळी पाऊस पर्यटकांना पावसाचा आनंद देत आहेत. थंड हवेचा आस्वाद घेण्यासाठी आलेले पर्यटक हे अवकाळी पावसाची लक्षणे दिसू लागल्यावर हॉटेल्स मधून बाहेर पडताना दिसतात.
दुसरीकडे माथेरान मध्ये वातावरण थंडगार करण्यात अवकाळी पाऊस मदतीला आला आहे.मात्र या अवकाळी पावसासोबत आकाशात विविध रंगांची उधळण करणारे दृश्य दिसू लागली आहे. १७ मे रोजी सायंकाळी अवकाळी पावसाची सुरुवात होणार असे वातावरण निर्माण झाले आणि त्यानंतर आकाशात विविध रंग आणि लालबुंद आभाळ असे दृश्य अनेकांनी आपल्या मोबाईल मध्ये कैद केले.मावळतीच्या सूर्याची किरणे पाहण्यासाठी गेलेल्या पर्यटकांना आकाशात रंगांची झालेली उधळण पाहून आनंद झाल्याचे पर्यटक सांगत आहेत.