Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 18 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raigad News: वनखात्याच्या कात्रीत अडकले माथेरानचे विकासकाम! वाड्यांना जोडणाऱ्या रस्त्याचा प्रकल्प रखडला

माथेरान डोंगरातील त्या सर्व आदिवासी वाड्या देश स्वातंत्र्य होण्याच्या १०० वर्षे आधीपासून अस्तित्वात आहेत. मात्र त्या ठिकाणी रस्त्याची कामांसाठी अनेक समस्या येत आहेत. त्यामुळे आता ग्रामस्थांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आ

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jan 04, 2026 | 01:49 PM
Raigad News: वनखात्याच्या कात्रीत अडकले माथेरानचे विकासकाम! वाड्यांना जोडणाऱ्या रस्त्याचा प्रकल्प रखडला

Raigad News: वनखात्याच्या कात्रीत अडकले माथेरानचे विकासकाम! वाड्यांना जोडणाऱ्या रस्त्याचा प्रकल्प रखडला

Follow Us
Follow Us:
  • स्थानिक स्वराज्य संस्थेचे निवडणुकीत बहिष्कार टाकणार
  • नवीन रस्ता अर्धवट अवस्थेत राहण्याची शक्यता
  • रस्त्यात चार ठिकाणी नाल्यावर पूल बांधावे लागणार
कर्जत: कर्जत तालुक्यातील माथेरानच्या डोंगरात असलेल्या ३ आदिवासी वाड्यांना जोडणारा रस्ता बनविला जात आहे. वन जमिनीतून रस्ता बनविण्यासाठी वन विभागाची परवनगी घेण्यासाठी तब्बल वर्ष उलटलं आहे. मात्र अजूनही चारपैकी एकालाही ग्रामपंचायतीमधील रस्ता बनविण्यासाठी वन विभागाने जमीन बनविण्यासाठी परवानगी दिलेली नाही. दरम्यान राष्ट्रीय ग्रामीण विकास यंत्रणांकडून तयार केलेला प्रस्ताव मंजूर होत नसल्याने आता त्या भागातील आदिवासी लोकांनी स्वतःच्या रस्त्यासाठी स्वतः प्रस्ताव करण्यास सुरुवात केली आहे. एका भागातील रस्ता वन विभागाच्या कात्रीत सापडल्याने माथेरान डोंगरातील आदिवासी वाड्या अखंडपणे जोडले जाण्याची शक्यता कमी आहे.

राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना मोठा दिलासा; दोन लाखांपर्यंतच्या पीक कर्जांना मुद्रांक शुल्क माफ

माथेरानच्या डोंगरात १३ आदिवासी वाड्या असून नेरळ माथेरान घाटरस्त्यातील जुम्मापट्टी धनगरवाडा पासून किरवली वाडीपर्यंत असलेल्या १३ किलोमीटर मार्गात या आदिवासी वाड्या वसल्या आहेत. अनेक धनगर समाजाचे लोकांची वस्ती तेथे वास्तव्य करीत आहेत. वन विभागाची दळी जमिनीवर या वाड्या वसल्या आहेत. वन विभाग रस्ता तयार करण्यासाठी जमीन देत नसल्याने येथील आदिवासी आपल्या रस्त्याचा प्रश्न सोडवण्यासाठी स्वतः एकत्र येऊन पायवाट बनवीत होते. (फोटो सौजन्य – Pinterest)

काही वाड्या केल्यात ना मंजूर

सध्या आषाणे वाडी आणि सावरगाववाडी मध्ये रस्त्यांची कामे सुरु असून तशाप्रकारे हे काम पुढे पुढे जाणार आहे. परंतु ग्रुप ग्रामपंचायत माणगाव वरेडी बेकरेवाडी असलंवाडी, नान्याचा माळ, मन्याधणगर वाडा, बेकरेधणगर वाडा, वनविभाग अधिकारी अलिबाग कार्यालयाने ना मंजूर केली आहे. त्यामुळे नवीन रस्ता अर्धवट अवस्थेत राहण्याची शक्यता आहे.

स्थानिक ग्रामस्थांचा पाठपुरावा

हा प्रस्ताव वन विभागाने मंजूर करावा यासाठी आदिवासी कार्यकर्ते जैतू पारधी आणि गणेश पारधी हे स्थानिक ग्रामस्थ अलिबाग येथे जाऊन पाठपुरावा करीत आहेत. मात्र बनविलेला वन प्रस्ताव फेटाळल्याने आता हे आदिवासी कार्यकर्ते यांनी स्वतः आर्थिक भार उचलून प्रस्ताव बनविला आहे.

स्वातंत्र्यापूर्वीच अस्तित्वात आल्या वाड्या

माथेरान डोंगरातील त्या सर्व आदिवासी वाड्या देश स्वातंत्र्य होण्याच्या १०० वर्षे आधीपासून अस्तित्वात आहेत. मात्र वन कायदा अस्तित्वात आला आणि त्या ठिकाणाच्या वाड्यांची जमीन वन विभागाच्या मालकीची झाली. वन जमिनीवर वसलेल्या या आदिवासी वाड्यांमध्ये जाण्यासाठी पक्के रस्ते बनविले जात नव्हते, मात्र शासनाने रस्ता बनविण्यासाठी निधी मंजूर केल्यावर वन जमीन मिळविण्यासाठी प्रयत्न झाले.

रस्ते कामात या वाड्यांचा समावेश

वन जमिनीचे प्रस्ताव किरवली, उमरोली आणि आसल या ग्रामपंचायतमधील वन जमिनीचे प्रस्ताव जिल्हा उपवन संरक्षक यांच्या कार्यालयाने मंजूर केले आहेत. त्यामुळे राष्ट्रीय विकास यंत्रणांनी मंजूर केलेल्या १३ किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. या मार्गात किरवली बाडी, सावरगाववाडी, बोरीचीवाडी, मना धनगर वाडा, जुम्मापट्टी धनगरवाडी या वाड्या आहेत.

MNS leader joins Shiv Sena : मनसेचा विश्वासू शिलेदार आता शिंदेंचा साथीदार; शिंदे यांच्या उपस्थितीत केला शिवसेनेत प्रवेश

आदिवासी वाड्या

किरवली वाडी, आषाणेवाडी, सावरगाववाडी, बौरीचीवाडी, मना धनगर वाडा, धामणदांड, चिंचवाडी, सागाचीवाडी, आसलवाडी, नाण्याचा माळ, बेकरेवाडी, जुम्माफ्ट्टी धनगरवाडी या वाड्या आहेत, सध्या आषाणे वाडी आणि सावरगाव वाडी

  • रस्त्याचे एकूण अंतरः १३.५ किलोमीटर
  • रस्त्यात चार ठिकाणी नाल्यावर पूल बांधावे लागणार
  • लहान साकय यांची निर्मिती
  • किरवली ग्रामपंचायत, उमरोली ग्रामपंचायत (वावरले ग्रामपंचायत), आसल ग्रामपंचायत मंजुरी न मिळालेले वन जमिनीचे प्रस्ताव
  • सागाची वाडीपासून धनगर वाडा जुम्मापट्टी

निवडणुकीत बहिष्कार

आमच्या हक्काचा रस्ता देश स्वतंत्र झाल्यानंतर ७५ वर्षांनी बनला आहे. मात्र वन जमिनीतून रस्ता बनविण्याचा ३/२ प्रस्ताव मंजूर न केल्यास या भागातील रस्ता होणार नसलेल्या पाच आदिवासी वाडीतील आदिवासी समाज स्थानिक स्वराज्य संस्थेचे निवडणुकीत बहिष्कार टाकणार आहेत. – गणेश पारधी, आदिवासी कार्यकर्ते

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Matheran road development work stuck in the forest department clearance raigad news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 04, 2026 | 01:49 PM

Topics:  

  • Karjat
  • Matheran
  • raigad

संबंधित बातम्या

Karjat Protest : कर्जतमध्ये आंदोलन तीव्र; 22 दिवसांनंतरही दखल नाही, उपोषणकर्त्यांचा जलसमाधीचा इशारा
1

Karjat Protest : कर्जतमध्ये आंदोलन तीव्र; 22 दिवसांनंतरही दखल नाही, उपोषणकर्त्यांचा जलसमाधीचा इशारा

Matheran Leopard News : माथेरानमध्ये बिबट्याची दहशत; हनिमून पॉईंटजवळ पाळीव कुत्र्याची शिकार, घटना CCTV मध्ये कैद
2

Matheran Leopard News : माथेरानमध्ये बिबट्याची दहशत; हनिमून पॉईंटजवळ पाळीव कुत्र्याची शिकार, घटना CCTV मध्ये कैद

Matheran News : माथेरानमध्ये दूषित पाणी थेट नळातून? साथीच्या आजारांचा धोका, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
3

Matheran News : माथेरानमध्ये दूषित पाणी थेट नळातून? साथीच्या आजारांचा धोका, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

Matheran News : माथेरान नगरपरिषदेच्या बांधकाम परवानग्या संशयाच्या भोवऱ्यात; महसूल मंत्र्यांनी चौकशीचे दिले आदेश
4

Matheran News : माथेरान नगरपरिषदेच्या बांधकाम परवानग्या संशयाच्या भोवऱ्यात; महसूल मंत्र्यांनी चौकशीचे दिले आदेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.