Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

E-Toilet आहे की मृत्यूचा सापळा? माथेरानमध्ये पुन्हा ई-टॉयलेटमध्ये पर्यटक अडकला; ३८.७० लाखांच्या प्रकल्पावर प्रश्नचिन्ह

माथेरानमधील नगरपरिषदेच्या ई-टॉयलेटमध्ये पर्यटक अडकण्याची दुसरी घटना समोर आली आहे. सुमारे ३८.७० लाख रुपये खर्चून उभारलेल्या या प्रकल्पाच्या दर्जावर आणि नगरपरिषदेच्या कारभारावर नागरिकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून, ई-टॉयलेट खरेदी प्रक्रियेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोपही करण्यात येत आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jul 27, 2026 | 05:05 PM
E-Toilet आहे की मृत्यूचा सापळा? माथेरानमध्ये पुन्हा ई-टॉयलेटमध्ये पर्यटक अडकला; ३८.७० लाखांच्या प्रकल्पावर प्रश्नचिन्ह

E-Toilet आहे की मृत्यूचा सापळा? माथेरानमध्ये पुन्हा ई-टॉयलेटमध्ये पर्यटक अडकला; ३८.७० लाखांच्या प्रकल्पावर प्रश्नचिन्ह

Follow Us
Follow Us:
  • माथेरान मधील इ टॉयलेट मध्ये अडकले पर्यटक
  • इ टॉयलेट बनले मृत्यूचे सापळे
  • निकृष्ट काम आणि भ्रष्टाचाराचे आरोप
 

माथेरान: माथेरान शहरात नगरपरिषदेने बसवलेल्या ई-टॉयलेटमध्ये पर्यटक अडकण्याची दुसरी घटना समोर आली असून, या प्रकारामुळे पर्यटक आणि स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोट्यवधींच्या खर्चातून उभारण्यात आलेल्या या ई-टॉयलेटच्या दर्जावर आणि नगरपरिषदेच्या कारभारावर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

माहितीनुसार, प्रशासकीय काळात माथेरान नगरपरिषदेने सुमारे 38 लाख 70 हजार रुपये खर्च करून ई-टॉयलेटची खरेदी केली. मात्र, बाजारभावापेक्षा अधिक किंमत देऊन ही खरेदी करण्यात आल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. तसेच या खरेदी प्रक्रियेत भ्रष्टाचार झाल्याचा संशय व्यक्त करत संबंधित माहिती मागवूनही पालिकेकडून ती देण्यास टाळाटाळ होत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.

Raigad News: माथेरानमध्ये घोड्यांच्या विष्ठेवरून पर्यावरणाचा प्रश्न; हरित लवाद काय निर्णय देणार? 16 ऑगस्टला महत्त्वाची सुनावणी

महिला पर्यटक ई-टॉयलेटमध्ये अडकली

काही दिवसांपूर्वी इको पॉईंट येथील ई-टॉयलेटमध्ये एक महिला पर्यटक गेल्यानंतर आतील दरवाज्याचे हँडल तुटल्याने ती आतमध्येच अडकून पडली. बाहेर उभ्या असलेल्या तिच्या पतीला महिलेने आरडाओरडा करून ही बाब सांगितली. त्यानंतर स्थानिक व्यावसायिक रेखा पाटील आणि भरत कांरडे यांना बोलावण्यात आले. घटनेचे गांभीर्य ओळखून रेखा पाटील यांनी अडकलेल्या महिलेला धीर दिला, तर भरत कांरडे यांनी प्रसंगावधान राखत बाहेरील दरवाज्याचे हँडल तोडून महिलेची सुखरूप सुटका केली. काही मिनिटे उशीर झाला असता मोठी दुर्घटना घडली असती, अशी प्रतिक्रिया स्थानिकांनी व्यक्त केली.

व्हिडिओद्वारे व्यक्त केला संताप

सुटका झाल्यानंतर संबंधित महिला पर्यटकाने सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करत आपल्यावर ओढवलेल्या प्रसंगाची माहिती दिली. “काळ आला होता, पण वेळ आली नव्हती,” असे म्हणत तिने हाताला झालेली दुखापत दाखवली आणि नगरपालिकेच्या निष्काळजी कारभारावर टीका केली. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणीही तिने केली. महिलेच्या पतीनेही सोशल मीडियावर पोस्ट करून निकृष्ट दर्जाच्या ई-टॉयलेटबाबत संताप व्यक्त केला.

‘ई-टॉयलेट की मृत्यूचा सापळा?’

या घटनेनंतर माजी मुख्याध्यापिका कल्पना पाटील यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. “हे ई-टॉयलेट नसून मृत्यूचा सापळाच आहे. महिलेच्या पतीच्या लक्षात ही बाब आली नसती तर गुदमरून मृत्यू होण्याची शक्यता होती. नगरपालिकेने तातडीने कारभार सुधारावा, अन्यथा नागरिकांना रस्त्यावर उतरावे लागेल. दिल्लीसारख्या घटना माथेरानमध्ये घडू नयेत,” असा इशारा त्यांनी दिला.

दरम्यान, ई-टॉयलेटमध्ये पर्यटक अडकण्याची ही दुसरी घटना असल्याने या सुविधेच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, संबंधित यंत्रणेची तातडीने तांत्रिक तपासणी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

माथेरान मिनी ट्रेनला हायड्रोजन इंजिनची जोड; ब्रिटिश काळातील वाफेच्या इंजिनाचाच नवा फंडा

Web Title: Matheran e toilet tourist trapped again civic body faces corruption allegations

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 27, 2026 | 05:05 PM

Topics:  

  • maharashtra
  • Matheran

संबंधित बातम्या

Maharashtra Sarkar : महाराष्ट्रातील ‘आदर्श दस्त नोंदणी कार्यालयां’ ची केंद्र सरकारकडून दखल, इतक्या लाखांचे मिळणार अनुदान …
1

Maharashtra Sarkar : महाराष्ट्रातील ‘आदर्श दस्त नोंदणी कार्यालयां’ ची केंद्र सरकारकडून दखल, इतक्या लाखांचे मिळणार अनुदान …

Farmers Protest Maharashtra: कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ५० हजारांची मदत द्या; येडशीत शेतकऱ्यांचा रास्ता रोको
2

Farmers Protest Maharashtra: कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ५० हजारांची मदत द्या; येडशीत शेतकऱ्यांचा रास्ता रोको

शेतकऱ्यांसमोर नवे संकट..! प्रतिकूल हवामानाचा भात पिकाला फटका, भाताचा उत्पादन खर्च वाढला; तांदळाच्या दरवाढीची शक्यता
3

शेतकऱ्यांसमोर नवे संकट..! प्रतिकूल हवामानाचा भात पिकाला फटका, भाताचा उत्पादन खर्च वाढला; तांदळाच्या दरवाढीची शक्यता

Tukaram Mundhe FDA: ‘पुढची बदली…’ FDA मधून बदली झाल्यास कोणता विभाग हवा? तुकाराम मुंढे यांनी स्पष्टच सांगितलं…
4

Tukaram Mundhe FDA: ‘पुढची बदली…’ FDA मधून बदली झाल्यास कोणता विभाग हवा? तुकाराम मुंढे यांनी स्पष्टच सांगितलं…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.