माथेरान मिनी ट्रेनला हायड्रोजन इंजिनची जोड
ब्रिटीश काळात 1907 मध्ये मध्य रेल्वे वरील नेरळ येथून माथेरान साठी मिनी ट्रेन सुरू झाली.1984 पर्यंत रेग्युलर मिनी ट्रेन ही वाफेपासून तयार होणाऱ्या ऊर्जेवर चालायची.नंतर जर्मन बनावटीची वाफेवरील इंजिने एक एक करून हेरिटेज म्हणून रेल्वेने आपल्या म्युझियम मध्ये ठेवून घेतली. त्यातील एक इंजिन नवी दिल्ली येथील रेल भवन बाहेर तर एक इंजिन मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे तर एक इंजिन नेरळ जंक्शन येथे आणि एक इंजिन माथेरान रेल्वे स्थानकात शोभेचे बाहुले बनून उभी आहेत.1853 मध्ये भारतात रेल्वे सुरू झाली त्यावेळी देखील वाफेवर चालणाऱ्या इंजिनवरच चालवली जात होती.
ही रेल्वे माथेरान मार्गावर चालवताना इंजिन मधून पडणारे आगीचे लोळ यामुळे नेरळ माथेरान दरम्यान चे प्रवासात आग लागून जंगल नष्ट होत होते.आता प्रधानमंत्री यांनी हिरवी झेंडी दाखवून सुरू झालेल्या हायड्रोजन रेल्वे चे इंजिनात निर्माण होणारी ऊर्जा ही कोळशापासून तयार होणार आहे.आणि गाडी पुढे जात असताना इंजिन मधून पाणी बाहेर पडणार आहे. ब्रिटिश काळात देखील वाफेवरील इंजिन अशाच प्रकारे कोळशावर चालवली जात होती. त्यामुळे हायड्रोजन इंजिन मध्ये नेमके वेगळे काय? असा प्रश्न पडतो.
मिनी ट्रेन डिझेलवर..
सध्या नेरळ ते माथेरान दरम्यानची मिनिट्रेन इंजिन हे डिझेल या इंधनाचा वापर होतो.भविण्यात हायड्रोजन इंजिनाचा वापर सुरू झाल्यास धूर, कार्बन उत्सर्जन आणि ध्वनीप्रदूषणात मोठी घट होईल. त्यामुळे पर्यावरणाचे संरक्षण होण्याबरोबरच पर्यटकांना अधिक स्वच्छ, शांत आणि सुखद प्रवासाचा अनुभव मिळणार आहे.
अर्थसंकल्पात घोषणा..
भारतीय रेल्वेने २०२३-२४ च्या केंद्रीय अर्थसंकल्पात ‘हायड्रोजन फॉर हेरिटेज’ योजनेची घोषणा केली होती. या योजनेअंतर्गत ऐतिहासिक रेल्वेमार्गावर हायड्रोजर्नवर चालणारी इंजिने सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याच योजनेत माथेरान हिल रेल्वेचा समावेश करण्यात आल्याने या प्रकल्पाला विशेष महत्व प्रापत झाले आहे. दरम्यान, देशातील पहिल्या हायड्रोजन रेल्वेच्या शुभारंभानंतर हेरिटेज रेल्वेमार्गावरही हे तंत्रज्ञान वापरण्याच्या हालचाली यांना वेग आला आहे. त्याच पार्श्वभूमीवर माथेरान मिनिट्रेन देखील हायड्रोजन इंजिनाची जोड मिळणार असल्याने प्रवासी वर्गात आनंद आहे.
हेरिटेज नामावलीमध्ये कधी?
सह्याद्रीच्या निसर्गरम्य कुशीत नागमोडी वळणे घेत धावणारी ही मिनिट्रेन देशातील ऐतिहासिक हेरिटेज रेल्वेमागींपैकी एक मानली जाते.दरवर्षी हजारो देशी-विदेशी पर्यटक या रेल्वेच्या प्रवासाचा आनंद घेत असतात. आता आधुनिक, प्रदूषणमुक्त आणि पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाची जोड मिळाल्याने या रेल्वेचे आकर्षण आणखी वाढण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.






