Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raigad News: माथेरानला जाणार असाल तर ही बातमी आधी वाचा! रविवारी पहाटे 5 ते 8.30 वाजेपर्यंत घाटरस्ता बंद, पर्यटकांना मोठा फटका

माथेरानमध्ये आयोजित करण्यात आलेल्या हिल मॅरेथॉन स्पर्धेमुळे रविवारी सकाळी नेरळ-माथेरान घाटरस्त्यावर वाहतुकीवर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे माथेरानला जाणाऱ्या पर्यटकांनी प्रवासाचे नियोजन करूनच घराबाहेर पडावे, अन्यथा वाहतूक कोंडी आणि प्रतीक्षेला सामोरे जावे लागू शकते.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 01, 2026 | 02:21 PM
Raigad News: माथेरानला जाणार असाल तर ही बातमी आधी वाचा! रविवारी पहाटे 5 ते 8.30 वाजेपर्यंत घाटरस्ता बंद, पर्यटकांना मोठा फटका

Raigad News: माथेरानला जाणार असाल तर ही बातमी आधी वाचा! रविवारी पहाटे 5 ते 8.30 वाजेपर्यंत घाटरस्ता बंद, पर्यटकांना मोठा फटका

Follow Us
Follow Us:
  • रविवारी पहाटे 5 ते सकाळी 8.30 वाजेपर्यंत नेरळ-माथेरान घाटरस्त्यावर सर्व प्रकारच्या वाहनांची वाहतूक बंद राहणार आहे.
  • माथेरान हिल मॅरेथॉनमध्ये देशभरातील सुमारे 400 धावपटू सहभागी होणार असून स्पर्धा सीमा रिसॉर्ट येथून सुरू होणार आहे.
  • वाहतूक बंदीमुळे नेरळ स्टेशन आणि माथेरानकडे जाणाऱ्या पर्यटकांची मोठी गर्दी व गैरसोय होण्याची शक्यता आहे.
माथेरान: माथेरान या थंड हवेच्या ठिकाणी पावसाळ्यातील धुक्याचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची गर्दी सुरू आहे. शनिवार रविवार तर हजारो पर्यटक माथेरानला येत असतात. मात्र रविवारी माथेरान घाटरस्त्यात माथेरान हिल मॅरेथान स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेसाठी नेरळ माथेरान घाटरस्त्यातील वाहनांची वाहतूक सकाळी साडे तीन तास बंद राहणार आहे. त्यांचा मोठा परिणाम नेरळ येथे पर्यटकांची प्रचंड गर्दी होण्याची शक्यता आहे. दरम्यान, घाटरस्ता सकाळच्या वेळी बंद राहणार असल्याने पर्यटकांचे मेगा हाल होण्याची शक्यता असून पर्यटकांनी गर्दी पहायला मिळणार आहे.

Amit Shah Pune Visit: अमित शाहांच्या पुणे दौऱ्यापूर्वी पोलिसांची मोठी कारवाई; काँग्रेस कार्यकर्त्यांना धरपकड

माथेरान या ८०० मीटर उंचीवरील हिल स्टेशन वर अनेक स्पर्धा आयोजित केल्या जातात. तेथील जंगलातील रस्त्यांवर धावण्याच्या स्पर्धा आयोजित केल्या जात असतात. आता त्यात माथेरान घाटातून धावण्याची स्पर्धा आयोजित केली असून माथेरान हिल मॅरेथॉनचा दुसरा अंक येत्या रविवारी आयोजित केला आहे. नेरळ माथेरान हा सात किलोमीटर लांबीचा घाटस्त्यातील ही स्पर्धा अर्थ मॅरेथॉन म्हणून आयोजित केली आहे. २१ आणि १५ किलोमीटर लांबीचे अंतर अर्थ मॅरेथॉनसाठी ठेवण्यात आले असून २ ऑगस्ट रोजी ही स्पर्धा होत आहे. या स्पर्धेची सुरुवात कल्याण नेरळ कर्जत रस्त्यावरील सीमा रिसॉर्ट येथून होणार आहे. गतवर्षी ही स्पर्धा दामत गावच्या वेशीवरून सुटली होती आणि नेरळ माथेरान घाट अशी झाली होती. यावर्षी माथेरान हिल मॅरेथॉन चे आयोजकांनी मार्ग बदलला असून यावर्षी पंचवटी येथून सुरू होणार आहे.

पहाटे पाच वाजता स्पर्धेला होणार सुरुवात

देशभरातील ४०० स्पर्धेक सहभागी होणार आहेत, सीमा रिसॉर्ट येथून पहाटे पाच वाजता स्पर्धेला सुरुवात होणार असून स्पर्धक रिसॉर्ट वरून कर्जतकडे धावण्यास सुरुवात करतील. पुढे दोन किलोमीटर अंतरावरील माणगाव फाटा येथून ही स्पर्धक कर्जत कल्याण राज्यमार्ग रस्त्याने नेरळकडे धावण्यास सुरुवात करतील. हुतात्मा चौकातून हे स्पर्धक नेरळ माथेरान घाटातून धावत जुम्मापट्टी असे पुढे माथेरान येथील दस्तुरी येथे पोहोचतील. आणि तेथून पुन्हा माथेरान घाट उतरून हुतात्मा चौकातून रिसॉर्ट येथे एंड पॉईंट येथे पोहचणार आहे.

हे अंतर २१.१ कि. मी. ही अर्थ मॅरेथॉन असून या मॅरेथॉन स्पर्धेला पहाटे ५ वाजता सुरुवात होणार आहे. तर दुसरे स्पर्धा १५ किलोमीटर अंतरावरील असून त्या स्पर्धेसाठी स्टार्ट पॉईट हे रिसॉर्ट असून नेरळ माथेरान घाटरस्त्यातील जुम्मापट्टी येथून १५ किलोमीटर स्पर्धेतील सहभागी खेळाडू परतीचा प्रवास सुरू करणार आहेत. या प्रवासात ते खेळाडू हुतात्मा चौकातून रिसॉर्ट येथील एंड पॉईंट येथे पोहचणार आहेत.

नेरळ-माथेरान घाट रस्त्यावर वाहतूक बंद

रविवारी पहाटे पाचपासून सकाळी साडे आठपर्यंत घाट रस्त्यातील सर्व वाहतूक बंद ठेवली जाणार आहे. या स्पर्धेतील आयोजकांमध्ये रायगड पोलीस असल्याने आणि वाहतूक विभागाने नेरळ माथेरान घाटरस्ता माथेरान हिल मॅरेथॉन स्पर्धेचे काळात बंद राहणार असल्याने माथेरान जाणाऱ्या पर्यटकांचे मेगा हाल होणार आहेत, स्पर्धेचे काळात सर्व वाहने नेरळ माथेरान घाटरस्त्यात बंद असणार आहेत. त्यामुळे रविवार असल्याने होणारी पर्यटकांची गर्दी लक्षात घेता पर्यटकांना नेरळ येथे चांबून राहावे लागणार आहे.

‘सरकार लवकरच डिजिटल प्रॉपर्टी कार्ड जारी करणार’; महसूलमंत्री बावनकुळे यांची महत्त्वपूर्ण घोषणा

पर्यटकांनी खबरदारी घ्यावी..

रविवारी सकाळी नेरळ माथेरान घाटात स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. यासाठी पहाटे पाच ते सकाळी साडे आठ वाजेपर्यंत माथेरान घाटात सर्व प्रकारच्या वाहतूकीसाठी बंदी घातली आहे. रविवारी भरपूर प्रमाणात पर्यटक येतात व वाहतूक कोंड होत असते. टॅक्सी सेवा सकाळी ५ ते ८ पर्यंत बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत आणि त्यामुळे नेरळ स्टेशनवर पण भरपूर प्रमाणात गर्दी जमा होऊ शकते.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

Web Title: Matheran hill marathon 2026 neral matheran ghat road closed tourists advisory traffic update

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 01, 2026 | 02:21 PM

Topics:  

  • Matheran
  • NAVARASHTRA
  • raigad

संबंधित बातम्या

Buldhana News : दुष्काळ जाहीर करण्यासाठी शेतकऱ्यांचे अनोखे आंदोलन; ‘भीक मांगो’ करत सरकारविरोधात आक्रोश
1

Buldhana News : दुष्काळ जाहीर करण्यासाठी शेतकऱ्यांचे अनोखे आंदोलन; ‘भीक मांगो’ करत सरकारविरोधात आक्रोश

अंगारकी संकष्टीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत ट्रॅफिक अलर्ट; वरळीसह दादरमधील वाहतुकीत बदल
2

अंगारकी संकष्टीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत ट्रॅफिक अलर्ट; वरळीसह दादरमधील वाहतुकीत बदल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.