Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Matheran News : रस्त्यांसाठी वन जमीन देण्याचा निर्णय; डोंगरातील आदिवासी वाड्यांची विकासाकडे वाटचाल

Matheran News : अनेक वर्षे रखडलेल्या या रस्त्याच्या कामाला वन विभागाकडून परवानगी मिळाल्यानंतर झाली आहे.वन जमीन मधून रस्ता तयार करण्यास परवानगी मिळत नसल्याने राष्ट्रीय ग्रामीण विकास यंत्रणेला रस्त्याचे काम करता येत नव्हते

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: May 08, 2026 | 06:52 PM
Matheran News

Matheran News

Follow Us
Follow Us:
  • रस्त्यांसाठी वन जमीन देण्याचा निर्णय;
  • डोंगरातील आदिवासी वाड्यांची विकासाकडे वाटचाल
माथेरान/संतोष पेरणे : माथेरान डोंगर रांगेत असलेल्या आदिवासी वाड्यांच्या रस्त्यांसाठी वन जमीन देण्याचा निर्णय झाला आहे.अनेक वर्षे रखडलेल्या या रस्त्याच्या कामाला वन विभागाकडून परवानगी मिळाल्यानंतर झाली आहे.वन जमीन मधून रस्ता तयार करण्यास परवानगी मिळत नसल्याने राष्ट्रीय ग्रामीण विकास यंत्रणेला रस्त्याचे काम करता येत नव्हते.मात्र दोन आदिवासी कार्यकर्त्यांनी आत्मदहन करण्याचा इशारा दिल्यानंतर वन विभागाने जमीन देण्यास परवानगी दिली.त्यानंतर अखेर रस्त्याचे काम सुरू झाले असून मे महिन्यात पाच किलोमीटर रस्त्याचे काम पूर्ण करावे अशी अपेक्षा आदिवासी लोकांनी केली आहे.

कर्जत तालुक्यातील माथेरानचे डोंगर रांगेत असलेल्या आदिवासी वाड्यांच्या रस्त्याला वन विभाग जमीन देत नव्हते. जैतू पारधी आणि गणेश पारधी हे वन विभागाच्या कार्यालयाच्या बाहेर आत्मदहन करणार होते.वन विभागाचे रायगड जिल्हा उपवन संरक्षक राहुल पाटील यांच्याकडे प्रस्ताव पोहचल्यावर त्यांच्या कडून माथेरान डोंगरातील माणगाव ग्रामपंचायत मधील वन जमिनीचा प्रस्तावाला मंजुरी दिले.हा प्रस्ताव २२ एप्रिल रोजी कर्जत येथून पनवेल आणि पनवेल येथून पुढे अलिबाग असा प्रवास करीत उपवन संरक्षक यांच्या कार्यालयात पोहचला होता.हा प्रस्ताव रायगड जिल्हाधिकारी यांच्या अध्यकतेखाली असलेल्या समिती पुढे ठेवण्यात आल्यानंतर मंजूर झाला आहे.

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून काम मंजूर करण्यात आला असून कर्जत कल्याण राज्य मार्ग ७६ ते जुम्मापट्टी हा मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मंजूर आहे.हा रस्ता तीन ग्रामपंचायत मधून जात असून रस्त्याच्या कामाला किरवली पासून सुरुवात झालेली आहे.माणगाव तर्फे वरेडी ग्रामपंचायत मधील मौजे बेकरे गाव हद्दीतील वन जमिनीचे कंपार्टमेंट नंबर ५१ मधील सर्वे नंबर १०२,१०१,९७ मधील पाच प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत.त्यात १६८६ मीटर वन जमीन रस्त्यासाठी देण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे.हा रस्ता तीन मीटर रुंद राहणार असून ०.५०५८ हेक्टर जमीन वन जमीन रस्ता बनविण्यासाठी दिली आहे.या रस्त्याचे कामाचे भूमिपूजन माणगाव तर्फे वरेडी ग्रामपंचायत मधील बेकरेवाडी येथे करण्यात आले.

Matheran News : पर्यटकांसाठी आनंदाची बातमी; पार्कींगसाठी नवी व्यवस्था; वाहतूक कोंडींचा प्रश्न कायमचा मिटला

रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन प्रसंगी गेली अनेक वर्षे रस्ता व्हावा म्हणून पाठपुरावा करणारे आणि आरपारची लढाई म्हणून रस्त्यासाठी आत्मदहन करण्याची तयारी करणारे आदिवासी कार्यकर्ते जैतु पारधी,गणेश पारधी यांच्यासह स्थानिक आदिवासी लोकांनी गर्दी केली होती.रायगड जिल्हा अध्यक्ष ठाकुर समाज संघटनेचे अध्यक्ष मालू निरहुडा,तसेच बाळु भगत,दत्तात्रय निरगुडे, झिमा शिंगाडे,जेष्ठ नागरिक बुधाजी निरगुडे,हरिश्चंद्र पारधी,सदु पारधी ,चाहु पारधी लहु शिंगाडे, मंगल पारधी, लक्ष्मण सांबरी,चंद्रकांत सांबरी, मंगेश निरगुडे,तुषार पारधी , जयेंद्र निरगुडे,चंद्राबाई पारधी, संगिता शिंगाडे ,कैलास शिंगाडे, व पंचक्रोशीतील ग्रामस्थ यांनी गुलाल उधळवून जल्लोष साजरा केला. दरम्यान, भूमिपूजन प्रसंगी सर्वांनी पाच किलोमीटर लांबीचा रस्ता पावसाळ्या पूर्वी तयार व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली.

Karjat News : टाटा पॉवर कंपनीमधील नवीन प्रकल्पाचे सुरुंग स्फोट; आदिवासी ग्रामस्थ जगतायच भितीच्या छायेत

Web Title: Matheran news decision to provide forest land for roads tribal villages in the mountains move towards development

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 08, 2026 | 06:52 PM

Topics:  

  • karjat news
  • Marathi News
  • matheran news
  • navrashtra news

संबंधित बातम्या

World News : स्वीडनने माफी मागावी ;सामी लोकांवरील अन्यायाची कबुली
1

World News : स्वीडनने माफी मागावी ;सामी लोकांवरील अन्यायाची कबुली

Mumbai University : विद्यार्थी–कुलगुरू संवादातून प्रश्नांच्या निराकरणाला गती; तक्रारी समजून घेत प्रभावी कार्यवाही
2

Mumbai University : विद्यार्थी–कुलगुरू संवादातून प्रश्नांच्या निराकरणाला गती; तक्रारी समजून घेत प्रभावी कार्यवाही

Breaking News :आम्हाला तेल विकू दिले नाही तर कोणालाही तेल विकता येणार नाही ;इराणचा इशारा
3

Breaking News :आम्हाला तेल विकू दिले नाही तर कोणालाही तेल विकता येणार नाही ;इराणचा इशारा

Maharashtra Drought :दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर भव्य गरबा-दांडिया रद्द करा; खर्च शेतकरी आणि ग्रामीण भागासाठी वळवा
4

Maharashtra Drought :दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर भव्य गरबा-दांडिया रद्द करा; खर्च शेतकरी आणि ग्रामीण भागासाठी वळवा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.