
Raigad News: नेरळ ग्रामसभेत १६ व्या वित्त आयोगाच्या आराखड्याला विरोध; आधी १५ व्या वित्त आयोगाच्या कामांचा हिशेब द्या, ग्रामस्थांची मागणी
नेरळ ग्रामपंचायत हद्दीत १६ वित्त आयोगाच्या निधी मधून करण्यात येणाऱ्या कामांची यादी निश्चित करण्यासाठी ग्रामसभा लावण्यात आली होती. प्रशासक सुजित धनगर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ग्रामसभेला सचिव ग्रामपंचायत अधिकारी अरुण कारले यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य सुनिता मोरे, पंचायत समितीचे सदस्य भगवान चंचे आदी प्रमुख तसेच स्थानिक ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.
आराखडा सादर करण्याचे आदेश गावाच्या विकासासाठी शासनाकडून मिळणाऱ्या निधीरूपी १६ वित्त आयोगासाठी प्रारूप आराखडा सादर करण्याचे आदेश जिल्हापरिषदेकडून देण्यात आले होते. त्यामुळे नेरळ ग्रामपंचायत कडून जुलै महिन्यात ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र कोरम अभावी तहकूब झालेल्या सभेचे आयोजन केले होते. नेरळ ग्रामपंचायत हद्दीत १६ वा वित्त आयोगात करण्यात येणारी कामे ही माहिती नेरळ ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत अधिकारी अरुण कारले यांनी वाचन केले. त्यावेळी आदिवासी भागासाठी कोणती कामे प्रस्तावित आहेत असा प्रश्न माजी सदस्य सुनील पारधी यांनी उपस्थित केला. (फोटो सौजन्य – AI Created)
१५ वा वित्त आयोगाचे मागील कामाचे पैसे आजदेखील काही ठेकेदारांना अदा करत आहेत, मात्र त्या ठेकेदारांनी कोणती कामे केली है समोर आले पाहिजेत अशी मागणी कर्जत पंचायत समितीचे भगवान चंचे यांनी समोर आणली. तेव्हा कोणती कामे झाली, कोणती कामे बाकी आहेत हे नेरळ ग्रामस्थ यांना समजायला हवी अशी मागणी कैली, शेवटी पंधरावा वित्त आयोगाची माहिती द्या मग पुढील आराखडा अंतिम करू अशी भूमिका नेरळ ग्रामस्थांनी घेतली. १५ ऑगस्ट रोजी अंतिम चर्चा करण्याचे ग्रामसभेत निश्चित करण्यात आले.
१६ वित्त आयोगाच्या आराखड्यात कोणताही निधी देण्यात आला नव्हता आणि त्यामुळे १६ वित्त आयोगाचा निधी मिळावा अशी मागणी केली, तर माजी सदस्य संजय मनवे यांनी नेरळ ग्रामपंचायतचे थकीत वीज बिलासाठी १६ वित्त अयोगाचा निधी वापरण्यात यावा अशी मागणी केली. दरम्यान १६ वित्त आयोगाचा नवीन आराखडा अंतिम करताना अगोदर १५ वा वित्त आयोगातून काय आणि कोणती विकास कामे झाली त्याची माहिती पंचायत समितीचे सदस्य भगवान चंचे यांनी केली, त्यावेळेला प्रशासक आणि ग्रामसेवक यांना माहिती देता आली नाही. त्यामुळे काहीवेळ ग्रामसभेत गौधळ निर्माण झाला आणि शेवटी पंचायत समिती सदस्य भगवान चंचे यांनी हस्तक्षेप केला.