Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Karjat News : नेरळमध्ये पावसाळ्यापूर्वी भीतीचे वातावरण! बिल्डरच्या माती भरावामुळे नैसर्गिक नाला बंद

नेरळ गावालगतच्या ममदापूर ग्रामपंचायतीतील खांडा भागात बिल्डरकडून करण्यात आलेल्या मातीच्या भरावामुळे नैसर्गिक नाला बंद झाल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. पावसाळ्यात अचानक नगर परिसरातील घरांमध्ये पाणी शिरून मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त करत ग्रामस्थांनी ‘अलायन्स ग्रुप’विरोधात कठोर कारवाईची मागणी केली आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: May 29, 2026 | 01:40 PM
नेरळ खांड्यात पावसाळ्यापूर्वी भीतीचे वातावरण! बिल्डरच्या माती भरावामुळे नैसर्गिक नाला बंद

नेरळ खांड्यात पावसाळ्यापूर्वी भीतीचे वातावरण! बिल्डरच्या माती भरावामुळे नैसर्गिक नाला बंद

Follow Us
Follow Us:

कर्जत : नेरळ गावच्या हद्दीवर असलेल्या ममदापूर ग्रामपंचायत मधील खांडा भागातील अचानक नगर मधील रहिवाशी पावसाळा सुरू होण्याआधीच घाबरले आहे.तेथे जमीन विकासक बिल्डरने आजुबाजूच्या लोकांचा कोणताही विचार न करता मातीचा भराव आपल्या जमिनीमध्ये केला आहे.त्याचा परिणाम तेथून पाणी वाहून नेणारा नैसर्गिक नाला बंद होणार आहे.त्यामुळे पावसाचे पाणी तेथेच अडकून पडणार असून पावसाळ्यातील पहिल्याच दिवशी तेथील अनेकांच्या घरात पाणी शिरणार आहे. दरम्यान,अलायन्स ग्रुप या बांधकाम व्यावसायिक विरुद्ध कडक कारवाई करावी अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे.

कर्जत नेरळ कल्याण या राज्यमार्ग रस्त्याने येणारा नाला ममदापूर ग्रामपंचायत मधील खांडा भागातून जातो.येथील नैसर्गिक नाला ‘अलायन्स ग्रुप’ या कंपनीच्या बिल्डर कडून आपल्या जमिनीत केलेल्या मातीच्या भरावामुळे बंद झाला आहे.संबंधित बिल्डरने आपल्या जमिनीमध्ये गृहप्रकल्पाच्या बांधकामासाठी केलेल्या मातीचा भारताचा परिणाम त्या भागात राहणारे स्थानिक लोकांच्या दारातून जाणारा नाला बंद होणार आहे.हा नाला त्या बिल्डर कडून पूर्णपणे बंद केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या मनमानी कारभारामुळे आगामी पावसाळ्यात नेरल खांडा येथील अचानक नगरमधील नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरून मोठ्या प्रमाणावर वित्तहानी व जीवितहानी होण्याची गंभीर शक्यता निर्माण झाली आहे. या समस्येच्या विरोधात येथील स्थानिक ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत.

Karjat News : प्रशासक राजवटीतही भ्रष्टाचार कायम? नेरळमध्ये आणखी एक अवैध नळजोडणी उघड

या संदर्भात अचानक नगर येथील तरहिवाशी यांनी एकत्र येत आवाज उठवला आहे. ग्रामस्थांनी कर्जत तहसीलदार आणि गटविकास अधिकारी आणि नेरळ विकास प्राधिकरण यांच्याकडे पत्राद्वारे लेखी तक्रारी दाखल केल्या आहेत.काही दिवसांवर आलेले पावसाळ्यापूर्वी पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.अचानक नगर येथील रहिवासी यांनी आपल्या घरांच्या बाजूलाच ‘अलायन्स ग्रुप’ या कंपनीच्या बिल्डरने बिल्डिंगचे बांधकाम सुरू केले आहे. बांधकाम करत असताना बिल्डरने ममदापूर गावाकडून येणारा नैसर्गिक नाला पूर्णपणे बंद केला आहे. सद्यस्थितीत प्रत्यक्ष जागेवर मोठ्या प्रमाणावर दगड आणि मातीचे ढीग टाकून नैसर्गिक पाण्याचा प्रवाह अडवण्यात आला आहे.

दरम्यान पावसाळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असल्याने, नैसर्गिक गटांरातून वाहून जाणारे पाणी जाण्यासाठी बिल्डरने कोणतीही पर्यायी व्यवस्था केलेली नाही. यामुळे पहिल्याच पावसात डोंगर आणि उंचावरून येणारे पाणी थेट नागरिकांच्या घरात शिरून घरांचे अतोनात नुकसान होऊ शकते, अशी तीव्र भीती रहिवाशांनी व्यक्त केली आहे. या बिल्डरच्या दादागिरीविरोधात कायदेशीर लढा देण्यासाठी आणि प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी अचानक नगरमधील ग्रामस्थांनी पुढाकार घेत निवेदनातून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याचे मागणी केली आहे.प्रशासनाने तात्काळ हस्तक्षेप करून हा नाला पूर्ववत केला नाही किंवा पाण्याचा निचरा होण्यासाठी सक्षम पर्यायी व्यवस्था करून दिली नाही, तर नेरळ खांडा येथील अचानक नगरमधील सर्व नागरिक तीव्र आंदोलन छेडतील, ज्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासन व संबंधित बिल्डरवर असेल.

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील ‘मिसिंग लिंक’ ठरणार ‘गेम चेंजर’; कर्जत आणि लोणावळा नवे ‘ग्रोथ हब’ म्हणून येणार उदयास

Web Title: Neral khanda mamdapur drain blocked alliance group builder rain flood threat

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 29, 2026 | 01:39 PM

Topics:  

  • Karjat
  • Monsoon Update
  • neral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.