Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Neral Power Outage: तीन दिवसांपासून नेरळचा वीजपुरवठा खंडित; महेंद्र थोरवे मैदानात, अधिकाऱ्यांना फटकारले

नेरळ परिसरात सलग तीन दिवसांपासून वीजपुरवठा खंडित असल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. या पार्श्वभूमीवर आमदार महेंद्र थोरवे यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन वीजपुरवठा सुरळीत होईपर्यंत नेरळ सोडणार नसल्याचा इशारा देत संबंधित अधिकाऱ्यांना कडक तंबी दिली.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jul 24, 2026 | 04:48 PM
तीन दिवसांपासून नेरळचा वीजपुरवठा खंडित; महेंद्र थोरवे मैदानात, अधिकाऱ्यांना फटकारले

तीन दिवसांपासून नेरळचा वीजपुरवठा खंडित; महेंद्र थोरवे मैदानात, अधिकाऱ्यांना फटकारले

Follow Us
Follow Us:
  • नेरळमध्ये तीन दिवसांपासून वीज पुरवठा खंडित
  • आमदार महेंद्र थोरवे आक्रमक
  • वीज पुरवठा सुरळीत होत नाही तोवर नेरळ सोडायचे नाही
  • अधिकाऱ्यांना दिली तंबी
कर्जत: गेली तीन दिवस नेरळ गाव आणि परिसरात वीज पुरवठा खंडित झाला आहे.नेरळ मध्ये पाण्यापासून अनेक समस्यांना येथील रहिवाशी यांना सामोरे जावे लागत असून नेरळ मधील वीज ग्राहकांचे प्रश्न समजून घेण्यासाठी आमदार महेंद्र थोरवे नेरळ येथे पोहचले.नेरळ येथे आमदार महेंद्र थोरवे यांनी नेरळ मधून वीज पुरवठा सुरळीत होत नाही तोवर महावितरणच्या अधिकाऱ्यांनी नेरळ मधून निघून जाऊ नये अशा इशारा आमदार महेंद्र थोरवे यांनी अधिकाऱ्यांना दिला आहे.

नव्याने उप विभागीय कार्यालय स्थापन होऊन कामकाज सुरू झालेल्या नेरळ मध्ये गेल्या तीन दिवसांपासून वीज पुरवठा खंडित आहे. नेरळ गाव आणि परिसर तीन दिवसापासून विजेअभावी अंधारात असल्याने वीज ग्राहकांचे प्रचंड हाल झाले आहेत.आज संतप्त वीज ग्राहक यांनी सकाळी थेट महावितरण कार्यालय गाठले.नव्याने निर्माण झालेली सहाय्यक अभियंता कार्यालयावर धडक देत आपला संताप व्यक्त केला. या प्रसंगी आमदार महेंद्र थोरवे यांनी घटनास्थळी धाव घेत स्थानिक वीज ग्राहक यांच्या समस्या जाणून घेतल्या.यावेळी आमदार थोरवे यांनी महावितरणच्या कारभारावर जोरदार ताशेरे ओढले आणि अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.

NEET पेपरफुटीविरोधात कर्जत पेटलं! धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी विद्यार्थ्यांचा एल्गार !

नेरळ गाव आणि परिसराचा वीजपुरवठा खंडित झाला असून पुरवठा देखील कमी दाबाने होत आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत आमदार थोरवे यांनी महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी नेरळ गाव आणि परिसरातील वीज सुरळीत होत नाही तोवर महावितरणच्या एकाही अधिकाऱ्याने किंवा कर्मचाऱ्याने घरी जायचे नाही. तसेच, कर्जत चे उप अभियंता चंद्रकांत केंद्रे यांना नेरळ मध्ये येऊन तत्काळ सर्व माहिती घ्यावी आणि उपाययोजना करावी अशी सूचन केली. वीज पुरवठा सुरळीत होत नाही तोपर्यंत अधिकाऱ्यांनी नेरळ सोडायचे नाही असे निर्देश आमदार थोरवे यांनी दिले.

आमदारांच्या या आक्रमक भूमिकेनंतर महावितरण कामाला लागले असून आजच नेरळ आणि नेरळ परिसरात वीजपुरवठा सुरू करण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांकडून देण्यात आले आहे.यावेळी माजी सभापती अमर मिसाळ,शहर शिवसेना शाखेचे किसन शिंदे, विशाल साळुंखे, वीज ग्राहक समितीचे रंजन दातार ग्रामपंचायत माजी सदस्य आदी उपस्थित होते.

कर्जतमधील राजनाला कालव्याचे मोठे नुकसान; 2 हजार हेक्टर शेतीच्या पाणीपुरवठ्यावर संकट, शेतकऱ्यांकडून तातडीच्या दुरुस्तीची मागणी

Web Title: Neral power outage third day mla mahendra thorve warns officials over electricity crisis

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 24, 2026 | 04:48 PM

Topics:  

  • Karjat
  • maharashtra

संबंधित बातम्या

‘खोटं बोलू नका, रोजच लोडशेडिंग आहे’; कैलास पाटलांनी सरकार अन् महावितरणला धरले धारेवर
1

‘खोटं बोलू नका, रोजच लोडशेडिंग आहे’; कैलास पाटलांनी सरकार अन् महावितरणला धरले धारेवर

माळेगावात घरासमोरील कंपाउंड पाडल्याने वाद चिघळला; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल, आरोपींना अटक
2

माळेगावात घरासमोरील कंपाउंड पाडल्याने वाद चिघळला; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल, आरोपींना अटक

National Carrom Selection : कॅरमपटूंना इटलीतील अजिंक्यपद खेळण्याची नामी संधी! निवड चाचणीसाठी महाराष्ट्राचा संघ सज्ज
3

National Carrom Selection : कॅरमपटूंना इटलीतील अजिंक्यपद खेळण्याची नामी संधी! निवड चाचणीसाठी महाराष्ट्राचा संघ सज्ज

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुन्हा चर्चेत; विद्यार्थ्यांच्या मेसच्या थाळीचे दर १० रुपयांनी वाढले
4

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुन्हा चर्चेत; विद्यार्थ्यांच्या मेसच्या थाळीचे दर १० रुपयांनी वाढले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.