Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raigad News: पनवेलमध्ये पावसाळी पर्यटन ठरतंय जीवघेणं! यंदा 5 जणांचा मृत्यू, सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

पावसाळा सुरू होताच पनवेल, खारघर आणि परिसरातील धबधबे, धरणे व नदीकाठांवर पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. मात्र अपुरी सुरक्षा व्यवस्था आणि पर्यटकांची बेफिकिरी यामुळे यंदाच्या पावसाळ्यात आतापर्यंत पाच जणांचा जीव गेला असून, प्रभावी सुरक्षा उपाययोजनांची मागणी पुन्हा जोर धरू लागली आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 27, 2026 | 02:46 PM
Raigad News: पनवेलमध्ये पावसाळी पर्यटन ठरतंय जीवघेणं! यंदा 5 जणांचा मृत्यू, सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

Raigad News: पनवेलमध्ये पावसाळी पर्यटन ठरतंय जीवघेणं! यंदा 5 जणांचा मृत्यू, सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

Follow Us
Follow Us:
  • पनवेल, खारघर आणि परिसरातील धोकादायक पर्यटनस्थळांवर यंदाच्या पावसाळ्यात पाच जणांचा बुडून मृत्यू झाला आहे.
  • पांडवकडा, गाडेश्वर धरण आणि भोकरवाडी परिसरात कायमस्वरूपी सुरक्षा व्यवस्था उभारण्याची मागणी जोर धरत आहे.
  • प्रशासनासोबतच पर्यटकांनीही धोकादायक ठिकाणी जाणे, सेल्फी काढणे आणि नियमांचे उल्लंघन टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पनवेल: पावसाळा सुरू होताच पनवेल, खारघर आणि परिसरातील पांडवकडा, गाडेश्वर धरण, विविध धबधबे व नदीकाठ पर्यटकांनी गजबजून जातात, मात्र या पर्यटनस्थळांवरील अपुरी सुरक्षा व्यवस्था आणि पर्यटकांची बेफिकिरी यामुळे दरवर्षी दुर्घटना घडत असून, यंदाच्या पावसाळ्यातही पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तरीही या धोकादायक ठिकाणी कायमस्वरूपी आणि प्रभावी सुरक्षा व्यवस्था उभारण्यात प्रशासनाला अद्याप यश आलेले नाही.

पर्यटकांसाठी महत्त्वाची बातमी! वसईतील धबधबे, किनारे अन् निसर्ग पर्यटनस्थळांवर बंदी; उल्लंघन केल्यास होणार कडक कारवाई

यंदाच्या पावसाळ्यात पांडवकडा येथे दोन, गाडेश्वर धरण परिसरात दोन आणि भोकरवाडी परिसरात एका व्यक्तीचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनांमुळे संपूर्ण परिसर हादरला असतानाही सुट्टीच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर पर्यटक धोकादायक ठिकाणी जात असल्याचे चित्र कायम आहे. अनेकजण जीव धोक्यात घालून खोल पाण्यात उतरतात, कड्यांवर चढून छायाचित्रे व चित्रफिती काढतात आणि प्रशासनाच्या सूचनांकडे दुर्लक्ष करतात.

नागरिकांनी नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक

प्रशासनाकडून धोक्याचे फलक, काही ठिकाणी बॅरिके अधूनमधून बंदोबस्ताची आणि पोलिस व्यवस्था केली जाते, मात्र गर्दीच्या तुलनेत ही व्यवस्था अपुरी असल्याची टीका स्थानिक नागरिकांकडून होत आहे. अनेक ठिकाणी प्रशिक्षित बचाव पथक, सीसीटीव्ही यंत्रणा, ध्वनिक्षेपकाद्वारे सतत सूचना, जीवनरक्षक साहित्य आणि कायमस्वरूपी सुरक्षा कर्मचारी नसल्याचे दिसून येते.

स्थानिकांच्या मते, प्रत्येक दुर्घटनेनंतर काही दिवस प्रशासनाकडून कडक कारवाई व गस्त घालण्यात येते, मात्र काही दिवसांनी परिस्थिती पूर्ववत होते. त्यामुळे धोकादायक ठिकाणी पुन्हा मोठी गर्दी होऊन जीवितहानीचा धोका वाढतो. केवळ इशारा फलक लावून प्रशासनाची जबाबदारी संपत नाही, तर धोकादायक भागात प्रवेशबंदी, कठोर अमलबजावणी आणि नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

ठळक मुद्दे, आवश्यकता

  • यंदाच्या पावसाळ्यात किमान ५ जणांचा मृत्यू
  • पांडवकडा येथे २, गाडेश्वर धरण परिसरात २, भोकरवाडी येथे १ मृत्यू
  • धोकादायक पर्यटनस्थळांवर कायमस्वरूपी सुरक्षा व्यवस्थेची मागणी
  • सुट्टीच्या दिवशी पोलीस, अग्निशमन व आपती व्यवस्थापन पथक तैनात करणे आवश्यक
धर्मेंद्र प्रधानांनंतर आता नितीन गडकरी टार्गेटवर? उद्धव ठाकरेंच्या एका वक्तव्याने राजकीय चर्चांना उधाण

आनंद घेण्यासाठी पर्यटकांनी जबाबदारी ओळखण्याची गरज

दरम्यान, पावसाळी पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांनीही स्वतःची जबाबदारी ओळखण्याची गरज आहे. मद्यप्राशन करून पाण्यात उतरणे, धोकादायक ठिकाणी सेल्फी काढणे किंवा बंदी असलेल्या भागात प्रवेश करणे हे अनेक दुर्घटनांचे कारण ठरत आहे. त्यामुळे प्रशासनाने प्रभावी सुरक्षा व्यवस्था उभारण्याबरोबरच पर्यटकांनीही नियमांचे पालन केल्यास अशा दुर्घटनांवर मोठ्या प्रमाणात नियंत्रण मिळवता येऊ शकते.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

Web Title: Panvel monsoon tourism safety five drown in pandavkada gadeshwar dam authorities urged to improve security

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 27, 2026 | 02:46 PM

Topics:  

  • NAVARASHTRA
  • panvel
  • raigad

संबंधित बातम्या

बुटांमधून येणाऱ्या दुर्गंधीने वैतागलायत? ‘या’ ३ सोप्या टिप्स वापरा आणि कायमची सुटका मिळवा
1

बुटांमधून येणाऱ्या दुर्गंधीने वैतागलायत? ‘या’ ३ सोप्या टिप्स वापरा आणि कायमची सुटका मिळवा

IRCTCचा मोठा स्ट्राईक! ९ कोटींहून अधिक खात्यांवर कारवाई; तिकीट काळाबाजाराला आळा घालण्यासाठी मोठा निर्णय
2

IRCTCचा मोठा स्ट्राईक! ९ कोटींहून अधिक खात्यांवर कारवाई; तिकीट काळाबाजाराला आळा घालण्यासाठी मोठा निर्णय

गणेशोत्सवासाठी वाहनांची झुंबड; आनेवाडी टोल नाक्यावर एका दिवसात ६० हजार वाहनांचा विक्रमी प्रवास
3

गणेशोत्सवासाठी वाहनांची झुंबड; आनेवाडी टोल नाक्यावर एका दिवसात ६० हजार वाहनांचा विक्रमी प्रवास

KARJAT : रमेश कदम यांच्या आंदोलनाला यश; कर्जतच्या रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याचे काम सुरू
4

KARJAT : रमेश कदम यांच्या आंदोलनाला यश; कर्जतच्या रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याचे काम सुरू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.