Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 18 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raigad News: १९ गावांच्या हद्दवाढीवरून पनवेलमध्ये वाद पेटला! ग्रामस्थांनी घेतली हरकत, प्रशासनाकडे मांडल्या मागण्या

पनवेलच्या १९ गावांच्या हद्दवाढीला ग्रामस्थांनी विरोध केला आहे. मूलभूत हक्कांवर परिणाम होण्याची भीती व्यक्त करत ग्रामस्थांनी हरकत नोंदवली आहे. याप्रकरणी विविध गावांतील नागरिकांच्या शिष्टमंडळाने पनवेल महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त गणेश शेटे यांची भेट घेऊन हद्दवाढीबाबत चर्चा केली.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Nov 18, 2026 | 01:46 PM
Raigad News: १९ गावांच्या हद्दवाढीवरून पनवेलमध्ये वाद पेटला! ग्रामस्थांनी घेतली हरकत, प्रशासनाकडे मांडल्या मागण्या

Raigad News: १९ गावांच्या हद्दवाढीवरून पनवेलमध्ये वाद पेटला! ग्रामस्थांनी घेतली हरकत, प्रशासनाकडे मांडल्या मागण्या

Follow Us
Follow Us:
  • स्थानिक ग्रामस्थांच्या मालमत्ता, रोजगार, पारंपरिक व्यवसाय आणि मूलभूत हक्कांवर परिणाम होण्याची भीती
  • १९ गावांच्या ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांसमोर मांडल्या हरकती
  • महापालिकेच्या हद्दवाढीला ग्रामस्थांचा विरोध
पनवेल ग्रामीण: महानगरपालिकेच्या हद्दीत नव्याने समाविष्ट होणाऱ्या १९ गावांच्या हद्दवाढीचा विषय आता चर्चेत आला आहे. या निर्णयामुळे स्थानिक ग्रामस्थांच्या मालमत्ता, रोजगार, पारंपरिक व्यवसाय आणि मूलभूत हक्कांवर परिणाम होण्याची भीती व्यक्त करत ग्रामस्थांनी हरकत नोंदवली आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी, १७ नोव्हेंबर रोजी विविध गावांतील नागरिकांच्या शिष्टमंडळाने पनवेल महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त गणेश शेटे यांची भेट घेऊन हद्दवाढीबाबत चर्चा केली.

Raigad News: नेरळच्या विकासकामांवरून मोठा वाद! एमएमआरडीएकडे तक्रार दाखल, जुन्या तारखांनी विकासकामांना मंजुरी दिल्याचा आरोप

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीअंतर्गत रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या पर्यावरण विभागाचे पनवेल तालुका अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते अजित म्हात्रे (बेलपाडा) यांनी गव्हाणे आणि वडघर जिल्हा परिषद गटांच्या समावेशाला हरकत घेतली आहे. ३ नोव्हेंबर रोजी झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत यासंदर्भात ठराव मंजूर करण्यात आल्याचा उल्लेख करताना स्थानिक नागरिकांच्या हरकती, तक्रारी आणि सूचना जाणून घेण्याची पुरेशी प्रक्रिया राबवण्यात आली नसल्याचा आक्षेप त्यांनी घेतला आहे. त्यामुळे संबंधित ठराव रद्द करून नागरिकांना विश्वासात घ्यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.  (फोटो सौजन्य – AI Created)

या शिष्टमंडळात अजित म्हात्रे (बेलपाडा), रोहन पाटील (माणघर), विशाल भोईर (उलवे), प्रकाश डाऊर (दापोली), श्रीधर पाटील (कोंबडभुजे), राहुल कोळी (कोंबडभुजे), किरण केनी (चिंचपाडा), सुधाकर कोळी (गणेशपुरी), रतीश गायकवाड (उलवे), जयवंत माधवी (उलवे) आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कोकण अध्यक्ष मधुकर कडू यांचा समावेश होता. हद्दवाढीमुळे ग्रामीण भागाला नागरी सुविधांचा लाभ मिळण्याची अपेक्षा असली, तरी त्याबदल्यात करांचा बोजा वाढणार का, गावठाण आणि शेतीचे अस्तित्व टिकणार का, स्थानिक व्यवसायांवर निर्बंध येणार का, असे अनेक प्रश्न ग्रामस्थांसमोर आहेत. त्यामुळे हद्दवाढीचा निर्णय घेण्यापूर्वी सर्व संबंधित गावांतील ग्रामस्थांना विश्वासात घेऊन त्यांच्या शंकांचे निरसन करावे, अशी मागणी शिष्टमंडळाने चर्चेदरम्यान मांडली.

प्रवेशद्वारावर रोखल्याने शिष्टमंडळ आक्रमक!

चर्चेसाठी आलेल्या शिष्टमंडळातील सर्व सदस्यांना अधिकाऱ्यांच्या दालनात प्रवेश देता येणार नसल्याचे सांगत प्रवेशद्वारावरच रोखण्यात आल्याने सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. यावेळी सभागृह नेते ॲड. प्रकाश विणेदार यांनी संवाद साधण्याचा प्रयत्न केला असता, ‘आम्हाला तुमच्याशी बोलायचे नाही,’ असे उत्तर सदस्यांनी दिले. मागील महासभेत सभागृहात उपस्थित प्रकल्पग्रस्तांचा उल्लेख ‘माकड’ असा केल्याचा आरोप असून, त्याच वक्तव्याचा रोष यावेळी व्यक्त झाल्याचे पाहायला मिळाले.

Raigad News: मोदींचा दौरा रद्द, पण खोदलेला रस्ता तसाच! संतप्त ग्रामस्थांनी रोखले प्रकल्पाचे काम, नेमकं काय घडलं?

स्थानिक भूमिपुत्रांच्या १५ मुद्द्यांकडे प्रशासनाचे वेधले लक्ष

दरम्यान, मनसेचे पनवेल शहराचे उपशहराध्यक्ष रोहन लक्ष्मण पाटील (माणधर) यांनीही १९ गावांच्या महानगरपालिका हद्दवाढीच्या अधिसूचनेला हरकत नोंदवली आहे. त्यांच्या अर्जामध्ये गावठाणाबाहेर बांधलेल्या घरांचे नियमितीकरण, घरपट्टी व पाणीपट्टीतील संभाव्य वाढ, सिडको आणि महानगरपालिकेकडून दुहेरी कर आकारणी, पाणीपुरवठ्याची जबाबदारी, स्थानिक फेरीवाल्यांचे संरक्षण, दगडखाणींचे भवितव्य आणि स्थानिक भूमिपुत्रांना रोजगारात प्राधान्य अशा १५ मुद्द्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले आहे.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

Web Title: Panvel municipal corporation expansion villagers oppose inclusion of 19 villages raise 15 key concerns hj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 18, 2026 | 01:46 PM

Topics:  

  • Marathi News
  • NAVARASHTRA
  • raigad

संबंधित बातम्या

QUAD & ASEAN Summit 2026: मनिला येथे जागतिक नेत्यांची मांदियाळी! मोदी-ट्रम्प क्वाड बैठकीत एकत्र; भारतासाठी काय आहे खास?
1

QUAD & ASEAN Summit 2026: मनिला येथे जागतिक नेत्यांची मांदियाळी! मोदी-ट्रम्प क्वाड बैठकीत एकत्र; भारतासाठी काय आहे खास?

Raigad News: मोदींचा दौरा रद्द, पण खोदलेला रस्ता तसाच! संतप्त ग्रामस्थांनी रोखले प्रकल्पाचे काम, नेमकं काय घडलं?
2

Raigad News: मोदींचा दौरा रद्द, पण खोदलेला रस्ता तसाच! संतप्त ग्रामस्थांनी रोखले प्रकल्पाचे काम, नेमकं काय घडलं?

Maharashtra Cooperative Sangh Bharti: महाराष्ट्र राज्य सहकारी संघात भरती! १११ रिक्त पदांसाठी कंत्राटी भरती जाहीर; आजच अर्ज करा
3

Maharashtra Cooperative Sangh Bharti: महाराष्ट्र राज्य सहकारी संघात भरती! १११ रिक्त पदांसाठी कंत्राटी भरती जाहीर; आजच अर्ज करा

NCS Portal: निवृत्तीनंतर रिकामे बसू नका! अनुभवाच्या जोरावर मिळवा हवी ती नोकरी; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
4

NCS Portal: निवृत्तीनंतर रिकामे बसू नका! अनुभवाच्या जोरावर मिळवा हवी ती नोकरी; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.