Raigad News: केलकम कंपनीच्या कामगारांचे देणे द्या अन्यथा.... शिवसेना ठाकरे गटाचा साधना कंपनीला इशारा
रोह्यातील धाटाव एमाआ़डीसी हद्दीतील कारखान्यतील कामगार संसार उघड्यावर पडल्याचं कळताच शिवसेना ठाकरे गाटाने या कामागारांना पाठींबा देत असल्याचं समोर आलं आहे. केलकम कंपनी ही साधना कंपनी व्यवस्थापनाने घेण्याचा ठरवले असून सदर कंपनीतील भंगार हलविण्याचा हालचाली सुरु झाल्या होत्या. सदर घटनेची कुणकुण लागताच उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसेनेचे नेते आक्रमक झाले आहे. कामगारांचे पगार थकवून भंगाराचे सामान हलविणाऱ्य़ांना कार्यतकर्त्यांनी चांगलेच फैलावर घेतले आहे. जर कारखाना हलवला तर केलकम कंपनीतील कामगारांचा देणी देणार कोण ? याकरिता साधना कंपनीचा डाव उधळवण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते.
जोपर्यंत केलकम कंपनीच्या कामगारांचे पैसे , तसंच ग्रामपंचायत कर ठेकेदारांकडून दिला जाणार नाही तोपर्यंत कारखान्यातील भंगार हलू देणार नाही असा इशारा ठाकरे गटाचे रोहा तालुका प्रमुख समीर शेडगे यांनी दिला आहे. केलकम कंपनी बंद पडल्यामुळे कामगारांचे मोठे नुकसान झाले. जिल्ह्यातील अनेक कुटुंब उध्वस्त झाली. कामगांच्य़ा या समस्येकडे कोण्या राजकीय नेत्यांनी कामगारांचे लक्ष दिले नाही. या आधी देखील अशीच परिस्थिती पेप्सी कारखान्या्च्या कामागारांवर आली होती.
पेप्सी कंपनी बंद पडली त्यावेळी कामगारांना वाऱ्यावर सोडत पोलीस बंदोबस्तमध्ये कारखाना हलवले. आज पेप्सी कंपनीचे कामगार देशोधडीला लागले त्यामुळे पेप्सीची झाले. हीच परिस्थिती आता पुन्हा निर्माण होताना दिसत आहे. मात्र असं असलं तरी केलकम कंपनीचे होऊ देणार नाही पूर्णपणे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना कामगारांच्या पाठीशी राहणार असून लवकर पोलिसांना निवेदन देखील देणार आहोत असे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे रोहा तालुका प्रमुख समीर शेडगे म्हणाले आहेत. या वेळी धाटाव विभाग प्रमुख नितीन वारंगे व शाखाप्रमुख निलेश वारंगे आणि शिवसैनिक यावेळी उपस्थित होते.