Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raigad News: माथेरानमध्ये ई-रिक्षा बंद; श्रमिक रिक्षा संघटनांचा ठाम पवित्रा

माथेरान शहरात पर्यावरण पूरक ई-रिक्षा चालवल्या जातात. माणसाने माणसाला ओढण्याची अमानवी प्रथा बंद करण्यासाठी माथेरान शहरात कायदेशीर लढाई लढल्यानंतर पर्यावरण पूरक ई-रिक्षा सुरू झाल्या.

  • By Priti Hingane
Updated On: Feb 24, 2026 | 09:17 PM
Raigad News: माथेरानमध्ये ई-रिक्षा बंद; श्रमिक रिक्षा संघटनांचा ठाम पवित्रा

Raigad News: माथेरानमध्ये ई-रिक्षा बंद; श्रमिक रिक्षा संघटनांचा ठाम पवित्रा

Follow Us
Close
Follow Us:

Raigad News: माथेरान शहरात पर्यावरण पूरक ई-रिक्षा चालवल्या जातात. माणसाने माणसाला ओढण्याची अमानवी प्रथा बंद करण्यासाठी माथेरान शहरात कायदेशीर लढाई लढल्यानंतर पर्यावरण पूरक ई-रिक्षा सुरू झाल्या. मात्र उर्वरित ७४ हातरिक्षा चालकांचे श्रम कमी करण्यासाठी त्यांना पर्यावरणपूरक ई-रिक्षा देण्यात याव्यात, असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. मात्र माथेरान सनियंत्रण समितीकडून केवळ २० हातरिक्षा चालकांना पर्यावरणपूरक ई-रिक्षा देण्यात यावी, असे आदेश दिले आहेत. मात्र हा निर्णय मान्य नसल्याने माथेरान शहरातील श्रमिक रिक्षा संघटनांनी आज २३ फेब्रुवारीपासून पर्यावरणपूरक ई-रिक्षा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान आजपासून हे आंदोलन सुरू झाले असून माथेरान सनियंत्रण समिती आणि शासन काय निर्णय घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Karjat News : शिलार धरणाला एक हाती विरोध; संतप्त शेतकऱ्यांचा तहसिलदार कार्यालयावर धडक मोर्चा

माथेरान शहरात ब्रिटिश काळापासून माणसाने माणसाला ओढणारी हातरिक्षा सुरू आहे. ही अमानवी प्रथा बंद करण्यासाठी २०२२ मध्ये पर्यावरणपूरक ई-रिक्षा सुरू झाली. सुरुवातीला सात रिक्षांचा पायलट प्रकल्प संपल्यानंतर आता २० अशा पर्यावरणपूरक ई-रिक्षा माथेरानमध्ये हातरिक्षा चालकांच्या हाती देण्यात आल्या आहेत. सुप्रीम कोर्टाने ई-रिक्षा देऊन पुनर्वसनाचा निर्णय दिला असून ६ महिन्याच्या आत या निर्णयाच्या अंमलबजावणीचे आदेश दिले.

६ महिने लोटले तरी शासनाकडून हातरिक्षाचालक यांच्या हाती पर्यावरणपूरक ई-रिक्षा देण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे १० फेब्रुवारी रोजी माथेरानमध्ये श्रमिक रिक्षा संघटनांनी एक पर्यावरणपूरक ई-रिक्षा बंद ठेवून आंदोलन सुरू केले. त्यावेळी महसूल अधीक्षक, मुख्याधिकारी आणि नगराध्यक्ष यांच्या विनंतीनंतर दोन दिवसांसाठी ही आंदोलन स्थगित करण्यात आले होते.

CM Sundar Shala : आता EVM ठरवणार शाळेचा मुख्यमंत्री कोण? सडवली शाळेचा अनोखा उपक्रम

१२ फेब्रुवारी रोजी झालेल्या सनियंत्रण समितीच्या बैठकीत माथेरान मध्ये आणखी २० ई रिक्षा सुरू करण्यास परवानगी देण्यात आली. त्यात २० मधील १३ हातरिक्षा देण्याचा आणि उर्वरित ७ ई-रिक्षा या लायसन्स असलेल्या हातरिक्षा चालकांना देण्याचा निर्णय झाला. मात्र हा निर्णय श्रमिक रिक्षा संघटनांना मान्य नसल्याने आज २३ फेब्रुवारी पासून माथेरान मधील सर्व ई-रिक्षा बंद ठेवल्या. आजपासून पुढे निर्णय होईपर्यंत माथेरान शहरातील सर्व ई-रिक्षा बंद राहणार आहेत. या निर्णयाचा फटका विद्यार्थ्यांना सर्वाधिक बसणार आहे. सध्या दहावीची परीक्षा सुरू झाली असून विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर जाण्यासाठी ई रिक्षा मदतगार ठरत होत्या. परंतू या बंदमुळे विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागणार आहे.

Web Title: Raigad news e rickshaws banned in matheran strong stance of rickshaw workers organizations

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 24, 2026 | 09:17 PM

Topics:  

  • Matheran
  • raigad

संबंधित बातम्या

CM Sundar Shala : आता EVM ठरवणार शाळेचा मुख्यमंत्री कोण? सडवली शाळेचा अनोखा उपक्रम
1

CM Sundar Shala : आता EVM ठरवणार शाळेचा मुख्यमंत्री कोण? सडवली शाळेचा अनोखा उपक्रम

Raigad News: कर्जत नगरपरिषदेत सर्व सभापतींची बिनविरोध निवड जाहीर, १३ सदस्यांनी हात वर करून निवडीला सहमती
2

Raigad News: कर्जत नगरपरिषदेत सर्व सभापतींची बिनविरोध निवड जाहीर, १३ सदस्यांनी हात वर करून निवडीला सहमती

Karjat Panchayat Samiti: कर्जत पं.स. मध्ये महिला सभापती? पुरुषांची मक्तेदारी मोडली जाणार
3

Karjat Panchayat Samiti: कर्जत पं.स. मध्ये महिला सभापती? पुरुषांची मक्तेदारी मोडली जाणार

MATHERAN : माथेरानमध्ये वनअधिकार कायद्याचे नियम धाब्यावर ; कुंपणामुळे प्राण्यांचा अधिवास धोक्यात
4

MATHERAN : माथेरानमध्ये वनअधिकार कायद्याचे नियम धाब्यावर ; कुंपणामुळे प्राण्यांचा अधिवास धोक्यात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.