Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 3 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Ashadhi Ekadashi |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raigad News: कर्जत नगरपरिषदेत सर्व सभापतींची बिनविरोध निवड जाहीर, १३ सदस्यांनी हात वर करून निवडीला सहमती

कर्जत नगरपरिषदेमध्ये विविध विषय समिती सदस्य आणि नंतर सभापती पदाची निवडणूक पार पडली. या नगरपरिषदेमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गट-शिवसेना ठाकरे गट परिवर्तन विकास आघाडीची निर्विवाद सत्ता आली.

  • By Priti Hingane
Updated On: Feb 23, 2026 | 08:11 PM
Raigad News: सर्व सभापतींची बिनविरोध निवड जाहीर, १३ सदस्यांनी हात वर करून निवडीला सहमती

Raigad News: सर्व सभापतींची बिनविरोध निवड जाहीर, १३ सदस्यांनी हात वर करून निवडीला सहमती

Follow Us
Follow Us:

Raigad News: कर्जत नगरपरिषदेमध्ये विविध विषय समिती सदस्य आणि नंतर सभापती पदाची निवडणूक पार पडली. या नगरपरिषदेमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गट-शिवसेना ठाकरे गट परिवर्तन विकास आघाडीची निर्विवाद सत्ता आल्यामुळे या निवडणुकीमध्ये विषय समितीचे सर्व सभापती परिवर्तन विकास आघाडीचे निवडून आले. कर्जत नगरपरिषदेमधील चार विषय समित्यांची निवडणूक घेण्यासाठी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते.

पालिका सभागृहात सुरुवातीला सर्व विषय समित्यांसाठी नाम निर्देशन पत्र सादर करण्यात आली. कर्जत नगरपरिषदेच्या सभागृहामध्ये पीठासीन अधिकारी मुख्याधिकारी तानाजी चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. सुरुवात होताच स्थायी समितीमध्ये सात सदस्य असावेत असे विरोधी पक्षाचे गटनेते अॅड. संकेत भासे यांनी मागणी केली. त्यावर या विषयावर मतदान घ्यावे, अशी मागणी नगरसेवक प्रशांत पाटील यांनी केली. त्यावर पाच सदस्य असावेत यासाठी मतदान घेण्यात आले. त्यावेळी १३ सदस्यांनी हात वर करून सहमती दिली.

Thane : शिवसेना भाजप आमनेसामने; सभागृह नेते निवडीनंतर ठाण्यात खडाजंगी

नंतर सात सदस्य असावेत यासाठी मतदान घेण्यात आले. त्यावेळी ८ सदस्यांनी हात वर करून सहमती दर्शविली. त्यामुळे विरोधी पक्षाच्या सर्व नऊ सदस्यांनी सभात्याग केला. नगरसेविका सुवर्णा जोशी या सभेला उपस्थित नव्हत्या. स्वच्छता वैद्यक व सार्वजनिक आरोग्य समिती सभापती -संतोष सुरेश पाटील यांची निवड झाली असून तर सदस्यपदी राधिका पिंट्या पवार, मानसी महेंद्र कानिटकर, जान्हवी सुदेश देवघरे, किशोर पांडुरंग कदम यांची निवड झाली आहे.

अखेर पाणी पुरवठा व जलनिस्सारण समिती सभापती पदी सुचिता देवेंद्र खोत, वीज सार्वजनिक बांधकाम शहर नियोजन व विकास समिती सभापतिपदी महेंद्र बबन चंदन, महिला व बालकल्याण समिती सभापतिपदी हर्षाली उमेश गायकवाड, उपसभापतीपदी अंजली अतुल कडू यांची बिनविरोध निवड झाली तर स्वच्छता वैद्यक व सार्वजनिक आरोग्य समिती सभापतीपदी पदसिद्ध म्हणून उपनगराध्यक्ष संतोष सुरेश पाटील यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले.

Karjat News: कशेळेकरांच्या संघर्षाला यश! कर्जत-मुरबाड महामार्गावरील रस्ता दुरुस्तीच्या कामाला अखेर सुरुवात

यावेळी कार्यालयीन अधिक्षक रवींद्र लाड उपस्थित होते. त्यावेळी सत्ताधारी कर्जत परिवर्तन आघाडी कडून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे तालुकाध्यक्ष दीपक श्रीखंडे, युवक तालुका अध्यक्ष ऍड. स्वप्नील पालकर, शिवसेना उबाठाचे तालुका उप प्रमुख बजरंग श्रीखंडे, कर्जत शहर प्रमुख निलेश घरत, कर्जत पंचायत समिती सदस्य नमिता धारे, तसेच केतन बेलोसे आदी उपस्थित होते.

Web Title: Uproar in the house but the result is in favor of the ruling party

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 23, 2026 | 08:11 PM

Topics:  

  • Karjat
  • raigad
  • Raigad Politics

संबंधित बातम्या

Raigad News: महाडकरांना मोठा दिलासा! 20 दिवसांत पर्यायी जलवाहिनीचे काम पूर्ण, शहराचा पाणीपुरवठा पुन्हा सुरळीत
1

Raigad News: महाडकरांना मोठा दिलासा! 20 दिवसांत पर्यायी जलवाहिनीचे काम पूर्ण, शहराचा पाणीपुरवठा पुन्हा सुरळीत

Raigad News: माथेरानला जाणार असाल तर ही बातमी आधी वाचा! रविवारी पहाटे 5 ते 8.30 वाजेपर्यंत घाटरस्ता बंद, पर्यटकांना मोठा फटका
2

Raigad News: माथेरानला जाणार असाल तर ही बातमी आधी वाचा! रविवारी पहाटे 5 ते 8.30 वाजेपर्यंत घाटरस्ता बंद, पर्यटकांना मोठा फटका

Raigad News: नेरळ साकव पुलाचे काम अर्धवट; सुरक्षा कठडे नसल्याने नागरिकांचा जीव धोक्यात, ठेकेदाराच्या निष्काळजीपणावर संताप
3

Raigad News: नेरळ साकव पुलाचे काम अर्धवट; सुरक्षा कठडे नसल्याने नागरिकांचा जीव धोक्यात, ठेकेदाराच्या निष्काळजीपणावर संताप

रेल्वे रुळावर लोखंडी बॉक्स, लोकलला बसला जोरदार धक्का; ट्रेन मॅनेजरच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे  वाचले प्राण
4

रेल्वे रुळावर लोखंडी बॉक्स, लोकलला बसला जोरदार धक्का; ट्रेन मॅनेजरच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे वाचले प्राण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.